Shalini Vikhe Patil Big Statement Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आम्ही सोडणार नाही, सुजय जशास तसं उत्तर देईल; शालिनी विखे आक्रमक

Shalini Vikhe Patil Big Statement: अहमदनगरमधील जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनेवर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी आणि सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनी विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.

Priya More

जयश्री विखे -पाटील यांच्याबाबत भाजप नेते वसंत देशमुख यांनी भर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सुजय विखे-पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. जिल्ह्यामध्ये आंदोलनं आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.

यासंदर्भात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी आणि सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनी विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात निषेध आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी धांदरफळ येथील कार्यक्रमानंतर झालेल्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेचा निषेथ केला. 'सुजय विखे मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. तो जशास तसे उत्तर देईल.', अशी प्रतिक्रिया शालिनी विखे यांनी दिली.

शालिनीताई विखे पाटील नेमकं काय म्हणाल्या -

चांगलं काम काही लोकांना बघवत नाही त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहेत.

वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे.

खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहे ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे.

सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो.

सुजय विखेंचे सर्व भाषण मुद्देसूद असतात, मी आई म्हणून ऐकत असते.

आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहेत.

डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात परंतू कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतो.

आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेला आहे याचा विचार सुद्धा केला पाहिजे.

ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचा दूध पिलेला नाही, जशास तसे उत्तर देईल.

आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाहीत. ठोशास - ठोसा देण्याचे कर्तव्य आपलं आहे.

खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये.

वसंतराव देशमुख यांच्याकडून गेलेल्या चुकीच्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे सुजयने निषेध केलेला आहे.

न्यायाधीश या प्रकरणात न्याय देतीलच परंतू इथून पुढे लोणी गावात कोणी वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही सोडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SHRAVAN : तुम्हाला माहित आहे का? श्रावणात नॉन - व्हेज का खात नाहीत?

Food Inflation : सर्वसामान्यांना झटका! अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं, पाहा कोणत्या वस्तूंचे भाव भडकले

Maharashtra News Live Update: हर्णे बंदरात टायगर कोळंबीची बंपर आवक, मच्छीमारांची लगबग

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! ५८०० रुपयांनी सोनं महागलं, ७२ तासांत किती किमती वाढल्या?

Shiv Sena SC Case Live : ठाकरेंना धनुष्यबाण अन् 'शिवसेना' नाव परत मिळणार? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

SCROLL FOR NEXT