Maharashtra Police Officer Abuses BJP MLA Harish Pimple Saam Tv
महाराष्ट्र

Crime : महाराष्ट्रात काय चाललेय? पोलिसाने भाजपच्या आमदारलाच दिल्या शिव्या, ऑडिओ क्लिप व्हायरल

BJP MLA Harish Pimple News: चक्क पोलीस अधिकाऱ्यांनी भाजप आमदाराला फोनवर शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची करा अन्यथा राजकीय आमदाराची इज्जत राहणार नाही, असे म्हणत गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Maharashtra Police Officer Abuses BJP MLA Harish Pimple: अकोल्यातले भाजपचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातीलच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने भाजप आमदाराला शिवीगाळ केल्याचा हा प्रकार आहे. शिवीगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केला आहे.. कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुराचं वाहन सोडून देण्यात आलं, असल्याचे भाजप आमदार पिंपळे यांनी म्हटले. ठाणेदार अर्थातच पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याची तक्रार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमधून केली.

थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत, शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे. आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ कठोर कारवाईची पाऊले उचलावी, अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही, अशा शब्दात गृहमंत्र्याकडे त्यांनी मागणी केली आहे. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपमध्ये एक व्यक्ती भाजप आमदाराला असभ्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे समोर आलेय.

भाजप आमदारानं ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं?

आपण, हरीश पिंपळे मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचा आमदार. माझाच कार्यकर्ता हरीश वाघ याने फोन करून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक केल्या जात असल्याची माहिती अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली होती. त्यानंतर बार्शीटाकळी पोलिसांनी पैसे घेत गुरांचे वाहन सोडून दिले. या संपूर्ण प्रकारानंतर आपण स्वतः अर्थातच आमदार हरीश पिंपळे यांनी ठाणेदाराला फोन केला. तर ठाणेदाराने आपल्यालाही शिवीगाळ केल्याचं गृहमंत्र्यांना सांगितलं. गृहखातं आपल्याकडे आहे, अशा शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. कारवाई झाली नाही तर राजकीय आमदारांची यापुढे इज्जत राहणार नाही. त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी कळकळीची विनंती, अपेक्षा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिप द्वारे केली आहे.

शिवीगाळ प्रकरणी भाजप आमदाराच्या आरोपानंतर बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. नेमक पोलिसांकडून आमदाराला झालेली शिवीगाळ प्रकरण कुठल्या स्तरावर जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यात पोलिसावर काय कारवाई होतं? हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT