Mass resignations by 82 office bearers intensify internal conflict in Thackeray faction in Parbhani. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला; 82 पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, सामूहिक राजीनाम्यांनी राज्यात खळबळ

Thackeray Group Internal Rift : अंतर्गत वाद आणि नेतृत्वबदलांनंतर परभणीत ८२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे ठाकरे गटात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • परभणीत ठाकरे गटाला मोठा धक्का

  • 82 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

  • गंगाप्रसाद आनेराव यांच्या हटवण्यामुळे नाराजी

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला परभणीत मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठ्या राजकीय हालचाली होत आहे. येथील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विधानामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू होती. त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राइक करत येथील जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची हकालपट्टी केली. मात्र आता त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. पक्षातील 82 पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीमाने दिले आहेत. या सामुहिक राजीमान्यांनुळे खळबळ उडाली आहे.

माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याच नाराजीतून त्यांनी राजीनामे दिले आहेत. गंगाप्रसाद आनेराव हे शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीला गैरहजर असल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता त्यांच्या समर्थनार्थ 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान गंगाप्रसाद आनेराव हे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय आहेत. संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असताना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंनी कारवाई करत आनेराव यांना पदावरून हटवले होतं. मात्र आता त्याचे उलटे पडसाद पाहायला मिळत आहे. येत्या आठ दिवसात उद्धव ठाकरेंनी निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही सदस्य पदाचा देखील राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५२,६०० रुपये मूळ वेतन अन् ५ फिटमेंट फॅक्टर, ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

Milk Benefits For Skin: उन्हाळ्यात काळी त्वचा होईल पांढरीफटक, फक्त या ३ पद्धतीने लावा कच्चे दूध

SCROLL FOR NEXT