ऐकलंत... मावळचे आमदार सुनील शेळकेंनी थेट विधानसभेतच आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली... या प्रकरणात आता सरकारने पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलेत... त्यासंदर्भात सुनील शेळकेंनी माहिती दिलीय...
मात्र या प्रकरणाची सुरुवात झालीय 2023 मध्ये... 26 जुलै 2023 ला पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरात सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या..या प्रकरणात 7 आरोपींना अटक केली... तर याच आरोपींकडून 9 पिस्तूल, 42 काडतुसं आणि धारदार कोयते पोलिसांनी ताब्यात घेतले.. हे आरोपी पुणे, जालन्यासह मध्यप्रदेशातील असल्याचं समोर आलंय.. आणि या आरोपींचं टार्गेट होतं सुनील शेळकेंची हत्या...हाच मुद्दा शेळकेंनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आणि योगेश कदमांनी SIT ची घोषणा केली...
अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या सुनील शेळकेंच्या हत्येचा कटात राज्याबाहेरील आरोपी सहभागी असल्याने शेळकेंच्या जीवावर कोण उठलंय? आरोपींचा खरा सुत्रधार नेमका कोण? आणि आरोपींना सुनील शेळकेंची हत्या का करायची होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर SIT ने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सत्य शोधायला हवं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.