Maharashtra Politics NCP Party And Symbol Hearing in Election Commission  saam tv
महाराष्ट्र

NCP Crisis News: '.... म्हणून संपूर्ण कट रचला गेला', शरद पवार गटाचा अजित पवार गटावर सर्वात मोठा आरोप

Sharad Pawar Vs Ajit Pawar: हा पक्षाच्या संघटनेचा किंवा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला असल्याचा मोठा दावा शरद पवार गटाने केला.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली, ता. २४ नोव्हेंबर २०२३

NCP Party And Symbol Hearing:

राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणुक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून सध्या निवडणुक आयोगासमोर यावर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना अजित पवार गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला असून अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे शरद पवार गटाचा युक्तीवाद?

सुनावणीदरम्यान शरद पवार (Sharad Pawar) गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद करताना अजित पवार गटाव गंभीर आरोप केले. "आतापर्यंत शरद पवार हेच कायम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळं त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही.." असे शरद पवार गटाचे वकील म्हणाले.

शरद पवारचं पक्षाचे अध्यक्ष...

तसेच हा पक्षाच्या संघटनेचा किंवा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला असल्याचा गंभीर आणि महत्वाचा मुद्दा शरद पवार गटाने उपस्थित केला. "2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करत निवडणुकीला समोर गेले होत यामध्ये 54 आणि 44 आमदार विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती.." असे देवदत्त कामत म्हणाले.

पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट...

अजित पवार (Ajit Pawar) यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहिली नाही.. असे देवदत्त कामत यांनी अधोरेखीत केले. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. म्हणुन त्यांनी प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधला. असा गंभीर आरोपही यावेळी केला.

दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या आठव्या अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवार यांची अध्यक्ष म्हणुन निवड करतांना प्रस्तावक म्हणून प्रफुल पटेल होते. आता मात्र शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीला ते बेकायदेशी संबोध आहे ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून पितांबर मास्टर यांनी पार पाडल्याचे देवदत्त कामत यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT