maharashtra navnirman sena vice president hits crop insurance company employees near yavatmal saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Navnirman Sena : मनसैनिकांचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा, यवतमाळमधील शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचा-याला चाेपले

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचा पंचनामा देखील झाला. तरीही अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही.

Siddharth Latkar

- संजय राठोड

MNS News :

यवतमाळ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला खरा परंतु नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (maharashtra navnirman sena) उपजिल्हाध्यक्ष आणि मनसैनिकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पीक विमा कंपनीच्या कर्मचा-यांना चाेप दिला. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचा पंचनामा देखील झाला. तरीही अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विमापासून वंचित राहिले.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप दिला. शेतकऱ्याकडून पैसे घेऊन पीकविमाचा मोबदला दिला जात असल्याचा आरोप वरघट यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT