pandharpur, maharashtra navnirman sena protests to reduce lpg gas cylinder price saam tv
महाराष्ट्र

LPG Gas Cylinder : दिवाळीपर्यंत पाचशे रुपयांनी गॅसचा दर कमी करा : मनसेची मागणी

Maharashtra Navnirman Sena : पंढरपूरात आज मनसेने छेडले आंदाेलन.

भारत नागणे

Pandharpur News : मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या (raksha bandhan 2023) निमित्ताने घरगुती गॅसच्या दरात (domestic gas cylinder price) 200 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात पुरेशी नाही, आणखी दोनशे रुपयांनी कपात करावी अशी मागणी करत पंढरपूर जवळच्या मोंडनिंब येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी गॅस टाकीला राखी बांधून अनोखे आंदोलन केले.(Maharashtra News)

मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महिला व कार्यकर्त्यांनी राखी पोर्णिमेचे औचित्य साधून मोदी सरकार विरोधात अनोखे आंदोलन केले. या आंदाेलनात मनसेचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणाले गेल्या नऊ वर्षात गॅस दरात मोठी वाढ केली आहे. केंद्र सरकारने केवळ दोनशे रुपयांची कपात केली आहे. ही कपात पुरेशी नाही. दिवाळी पर्यंत किमान पाचशे रुपयांनी गॅसचे दर कमी करावेत अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT