Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? वाचा राज्याचा आजचा हवामानाचा अंदाज

Weather Forecast News in Marathi : राज्यात आज कमान आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे, तर काही ठिकाणी अद्याप उन्हाचा चटका कायम आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather update News in Marathi : दिवाळीनंतर राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, तर सांताकृजमध्ये सर्वाधिक तापामान (weather update in marathi)नोंदवण्यात आले. राज्यात काही ठिकाणी रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठीकठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. स्वेटर, गरम कपडे कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात कधी थंडी येणार?

राज्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच मुंबईतील हवा उष्णच राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील हवामानात अद्याप थंडावा आलेला दिसत नाही. मुंबईसह उपनगरात तापमानात अद्याप म्हणावी तसी घट झालेली दिसत नाही. राज्यातील काही भागात हवामात कमालीची घट जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, कोकणात दुपारी उन्हाचा प्रचंड कडाका असल्याचे जाणवते. दुसरीकडे विदर्भा आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री हवेत थंडावा जाणवत आहे. राज्यात सर्वांनाच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता कमीच आहे. १५ नोव्हेंबरनंतर थंडीला सुरुवात होईल.

राज्यात कुठे थंडी, कुठे उन्हाचा चटका -

मागील दोन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे, त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पारा १५ अंश सेल्सिअसवर आलाय. निफाडमधील तापमान १३ अंशावर पोहचलेय. पण दुसरीकडे कमाल तापमानातील वाढ कायम आहे, मुंबईतील सांताक्रूझ येथे शुक्रवारी उच्चांकी ३६ अंश तापमान नोंदवले गेले. आज राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चढ उतार कायम राहणार -

मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सध्या उन्हाचा चटका अधिक आहे. तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा घसरत आहे. राज्यात आज तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT