MSRTC’s new ‘Rajmata Jijau’ bus with 55-seat 3x2 seating arrangement added to the ST fleet. saam tv
महाराष्ट्र

शिवनेरी, शिवशाहीनंतर आता एसटीच्या ताफ्यात येणार 'राजमाता जिजाऊ' बस; काय आहेत खास सुविधा, कधीपासून सुरू?

MSRTC Rajmata Jijau Bus: शिवनेरी आणि शिवशाही नंतर MSRTC नवीन 'राजमाता जिजाऊ' बस सेवा सुरू करणार आहे. बस व्यवस्था, विशेष वैशिष्ट्ये आणि सेवा कधी सुरू होईल हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • एसटीच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ नावाची नवी बस सेवा

  • ३x२ पद्धतीची ५५ आसन व्यवस्था असलेली अत्याधुनिक बस

  • गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांचा आरामदायी प्रवास हा उद्देश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जिजाऊ बस येणार आहे. शिवनेरी, शिवशाही, हिरकणी यांसारख्या लोकप्रिय बस सेवांनंतर आता राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. गर्दीच्या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना सीट मिळावी. त्यांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ ची आसन व्यवस्थेची ५५ सीट्स असलेली अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत.

या नव्या बसला 'राजमाता जिजाऊ' यांचे नाव देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सन्मानजनक करण्यासाठी ही सेवा सुरू केली जातेय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे राजमाता जिजाऊ साहेब यांची प्रेरणाशक्ती होती. यामुळेच त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात.

म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे नाव राजमाता जिजाऊ असे ठेवण्यात आलंय. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बस गाड्यांना गौरवले असल्याचं सरनाईक म्हणाले. सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी आहे. आता नव्या बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गावर उभे राहणाऱ्या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार असल्याचा असेही सरनाईक म्हणालेत.

मार्च २०२६ पासून या बस टप्प्याटप्प्याने राज्याच्या विविध आगारांमध्ये दाखल होतील. सुरुवातीला राज्यभरातील अतिशय वर्दळीच्या आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर या गाड्या सोडण्यात येतील. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना ही 'राजमाता' बस सेवा सुरू होणार आहे. दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर ही बस सेवा सुरू करण्याचा मानस एसटीचा आहे. दरम्यान एसटीच्या या निर्णयामुळे खाजगी बस गाड्यांकडे वळलेला प्रवासी पुन्हा एकदा लाल परीची सवारी करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

नव्या बसमधील सुविधा

या आधुनिक बसमध्ये ३ बाय २ अशा पद्धतीची आसन रचना असणार, यामुळे एकाच वेळी ५५ प्रवासी प्रवास करू शकतील. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना उभे राहावे लागणार नाही. बसमध्ये पुरेशी जागा असेन. ही बस आकर्षक भगव्या आणि पांढऱ्या रंगात सजलेली असेल. या बसमध्ये आरामदायी आसनांसह आपात्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा आणि प्रवाशांच्या सामानासाठी प्रशस्त डिक्कीची सोय करण्यात आलीय. महिला प्रवाशांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या बसमध्ये आरक्षित जागांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT