MAHARASHTRA WEATHER UPDATE: PRE-MONSOON RAIN LIKELY FROM JUNE 1, MONSOON ARRIVAL DELAYED TILL JUNE 10 Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रातील हवामानात बदल होत असून १ जूनपासून अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र हा मान्सूनपूर्व पाऊस असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात १ जूनपासून अनेक भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज

  • शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

  • मान्सूनचे आगमन १० जूननंतर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update Today 1st June राज्यातील हवामानात हळूहळू बदल होत असून जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान १ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज असला तरी किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे IMD ने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ(Vidarbha Rain Alert) , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. कोकण किनारपट्टीवरही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या तुलनेत तापमानात काही प्रमाणात घट होणार असली तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सध्या होत असलेल्या वादळी पावसाचा मान्सूनशी थेट संबंध नाही. मान्सून अद्याप केरळात पूर्णपणे दाखल झालेला नसल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात त्याचे आगमन किमान १० जूनपर्यंत होणार नसल्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनची नियमित प्रगती लक्षात घेऊनच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काल मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात डिस्कळ, ललगुण आणि बुध परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांच्या मते, अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेची तीव्रता कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT