Maharashtra Monsoon Session  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session : अंबादास दानवे यांच्यावर मोठी कारवाई, सभापतींनी केलं निलंबित; प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानं कारवाई, VIDEO

Ambadas Danve Warn Prasad Lad: विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांना त्यांनी सोमवारी शिवीगाळ केली होती.

Sandeep Gawade

लोकसभेत राहुल गांधींनी हिंदू धर्मांवरून सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पडसाद सोमवारी राज्याच्या विधानपरिषदेत उमटले होते. विधान परिषद विरोधी पक्ष नेते ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी आपला शिवसेनेचा बाणा कायम ठेवत लाड यांना दम भरला. त्यावरून आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर सोमवारी जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधींनी, धर्मगुरू व महापुरुषांची महापुरुषांनी घाबरू नका, दुसऱ्याला भीती दाखवू नका, अशी शिकवण दिली होती. मात्र, भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे असल्या आरोप केला होता. त्यावर विधान परिषेदत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी निषेध प्रस्ताव मांडला. यावरून अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन जुंपल्याचे पाहायला मिळालं. दानवेंनी लाड यांना शिवीगाळ केली. दोन्ही नेत्यांना वाद झाल्यानंतर सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचं कामकाज स्थगित केलं होतं.

विधान परिषदेतचं अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी लाड यांना दम भरला होता. माझ्यावर कोणी बोट उचललं तर मी त्याचा बोट तोडून टाकण्याची ताकद माझ्या मनगटात आहे, असल्यांचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आज कारवाई करत दानवेंचं ५ दिवसांचं निलंबन करण्यात आलं.

अंबादास दानवे यांचे निलंबन म्हणजे ठरवून केलेलं षडयंत्र : उद्धव ठाकरे

अंबादास दानवे यांना निलंबित करणाऱ्याचा एकतर्फी निर्णय घेण्यात आला, हे लोकशाहीला मारक आहे. दानवेंना बाजू मांडायला देण्याची गरज होती. ठरवून षडयंत्र रचून विरोधकांना निलंबित करण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची जनता डोळे उघडून हे पाहत आहे. आमच्या विजयाचा बातम्या मागे पडव्यात यासाठी हे प्रकार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: गोदावरीला महापूर; नांदूर-माध्यमेश्वर धरणातून 94 हजार क्यूसेक विसर्ग, निफाड-सिन्नर मार्ग बंद

Health Care: जेवल्यानंतरही सतत काहीतरी खावंसं वाटतं? 'या' ७ कारणांमुळे वाढू शकते भूक

SCROLL FOR NEXT