Monsoon Rain Holidays For Schools HT
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Rain: राज्यात जोर'धार'; गडचिरोली,रायगड, नागपूरमधील शाळा,महाविद्यालयांना सुट्टी

Monsoon Rain Holidays For Schools: राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. अतिवृष्टी होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Bharat Jadhav

मंगेश भांडेकर, साम प्रतिनिधी

राज्यात नैऋत्य मोसमी पावसाने थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये तर पूर परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. अतिवृष्टी होत असलेल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दक्षता म्हणून शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी दिलीय. रायगड आणि गडचिरोली येथे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय.

मागील ३ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. येथील वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती आदी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलीय. पाणलोट क्षेत्रातील नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने ३७ मार्ग बंद झालेत. शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरू असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना उद्या २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर केलीय. याबाबतचे आदेश त्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दिलेत.

दरम्यान जिल्हा प्रशासनाद्वारे कोटगल बॅरेज येथील ७० नागरिकांना आणि पारडी येथील १९ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच विनाकारण बाहेर पडू नये, पुलावरून पाणी वाहत असताना पुढे जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यातील शाळांना सुट्टी

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना आज पावसाने चांगलंच झोडपलं. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २२ जुलैला महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत या ४ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत.

नागपुरातही शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाकडून पावसाचा धोका वर्तविण्यात आल्यानंतर २२ जुलै रोजीही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ, नये यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय.

भंडाऱ्यातही उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी

भंडाऱ्यात जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा कहर पाहता भंडारा जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT