Maharashtra Mlc Elections 2026: Mahayuti Rebellion And Key Contests In Five Constituencies saam tv
महाराष्ट्र

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Maharashtra MLC Elections: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. काही ठिकाणी महायुतीत दिलजमाई झाली असून, काही मतदारसंघांत बंडखोरी कायम आहे.

Suprim Maskar

  • महायुतीतील काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांमध्ये दिलजमाई

  • काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे.

  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न

राज्यातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांतील निवडणुकांसाठीची प्रमुख लढतीचं चित्र आता स्पष्ट झालयं. अनेक मतदारसंघातील मित्रपक्षांमध्ये दिलजमाई झाली असली तरी अनेक ठिकाणी बंडखोरीही कायम आहे. महायुतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर अनेक मतदारसंघांत बंडखोरांनी तलवार म्यान केली असली, तर काही ठिकाणी मात्र बंडखोरी मोडून काढण्यात नेतृत्वाला अपयश आलयं. त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत कोण-कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे,पाहूयात.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिलीय.तर शिंदेसेनेनं मंगेश चिवटेंना अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर सचिन सानपांना शिंदेसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलयं. तर दुसरीकडे मविआकडून जयंत आसगावकर मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांच्या भांडणाचा लाभ आसगावकरांना होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. याउलट चित्र पुणे पदवीधर मतदारसंघात पाहायला मिळालं.पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध मविआ अशी थेट लढत आहे.

महायुतीतील भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव यांच्या थेट लढत होणार आहे. मात्र दादांच्या राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या स्मिता जाधव यांना फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात अर्ज माघारीनंतरही महायुती विरुद्ध मविआ अशी प्रमुख पक्षात होणार आहे.

नागपूर पदवीधरमध्ये महायुतीकडून भाजपचे सुधाकर कोहळे विरुद्ध मविआचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत आहे... मात्र शरद पवाराच्या राष्ट्रवादीचे निलेश कराळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानं लढतीत चुरस पाहयला मिळालयं. शिंदेसेनेच्या या जागेवर विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय.

मात्र भाजप बंडखोर संगीता शिंदे-बोंडे, शेखर भोयर, सुमित पवार यांच्यावर कारवाई करूनही त्यांनी माघार न घेतल्यानं शिंदेसेनेचे डोकेदुखी वाढलीय. त्यात शिंदेसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडेंची ही भर पडलीय. दुसरीकडे मविआतील काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे आणि ठाकरेसेनेचे दत्तायत्र लहानेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दादाच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्याविरोधात बंडखोर करणाऱ्या एम.के. देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर माघार घेतली. मात्र मविआतून ठाकरेसेनेचे दिलीप घुगे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील याचं मोठं आव्हान सतीश चव्हाणांपुढे असणार आहे.

एकंदरित महायुतीत भाजपनं मित्रपक्षांमधून होणारी बंडखोरी थांबवली असली तरी पक्षातील बंडखोरी काही ठिकाणी कायम आहे... त्याउलट शिंदेसेनेला मित्रपक्षांची आणि स्व: पक्षातील बंडखोरीही अमरावती शिक्षक मतदारसंघात थांबवता आली नाही. त्यामुळे अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता विधानपरिषदेच्या पाचही मतदारसंघांतील अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट झालयं.. त्यामुळे बंडखोरांमुळे महायुती आणि मविआच्या अधिकृत उमेदवारांना तोटा होणार की फायदा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: आता फक्त २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत "ड्राय डे" घोषित

SCROLL FOR NEXT