सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.
शिवसेना गटाचे दिलीप घुगे हेही निवडणुकीत सहभागी आहेत.
अंतिम निकालासाठी अधिकृत मतमोजणीची आकडेवारी तपासणे आवश्यक
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीदरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मोठी उलटफेर झालीय. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी भक्कम पकड निर्माण केलीय.
प्रतापसिंह पाटील यांनी तब्बल चार हजार मतांची मोठी आघाडी घेतलीय. दरम्यान मराठवाड्यात महायुतीचे सतीश चव्हाण पिछाडीवर पडले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. सध्या मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरूय. पुढील दोन ते अडीच तासांत या मतदारसंघाचा अंतिम निकाल स्पष्ट होईल.
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला झालेल्या टपाली (पोस्टल) मतपत्रिकांच्या मोजणीत वैध ठरलेल्या मतांची मोजणी पूर्ण झाली. यामध्ये महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 174 मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटलांना 147 मते मिळाली. त्यामुळे टपाली मतदानात सतीश चव्हाण यांनी 27 मतांची किरकोळ आघाडी घेतली होती.
तर ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांना 37 आणि रविराज साबळे यांना 25 मते मिळाली. प्रत्यक्ष मतदानाची मोजणी सुरू झाल्यानंतर चित्र पूर्ण बदलं. एकूण 35 हजार मतांची मोजणी पूर्ण झालीय. यात प्रतापसिंह पाटील यांनी मुसंडी मारत महायुतीचे सतीश चव्हाण यांना मागे टाकलंय. तब्बल चार हजार मतांची निर्णायक आघाडी मिळवलीय.
दरम्यान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 5 जागांसाठी मतमोजणी सुरूय. काही ठिकाणी अटीतटीची लढत होताना दिसतेय. तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीनुसार 5 जागांपैकी 3 जागांवर महायुती तर 2 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मराठवाड्यात शरद पवारांच्या पक्षाचे प्रतापसिंह पाटलांनी घेतलेल्या मोठ्या आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.