MLA Disqualification Saam Digital
महाराष्ट्र

MLA Disqualification: आमदारांचा उद्याचा निकाल...थोडी खुशी थोडा गम, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं

MLA Disqualification News: शिवसेना आमदार अपात्रतेची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीचा निकाल उद्या १० जानेवारी रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा या मोठ्या राजकीय घडामोडींकडे लागल्या आहेत.

Sandeep Gawade

MLA Disqualification Result

आमदार अपात्रतेसंबंधी अध्यक्ष काय निकाल देतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी हा निकाल थोडी ख़ुशी थोडा गम अशा प्रकारचा असू शकतो. सत्ता संघर्षाबाबद ज्या गटाला वाटतं असेल त्या गटाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दादा मागता येईल, असं मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे. शिवसेना आमदार अपात्रतेची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीचा निकाल उद्या १० जानेवारी रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा या मोठ्या राजकीय घडामोडींकडे लागल्या आहेत.

निकाल देताना घटनापीठाच्या निर्णयानुसार अध्यक्ष निर्णय देतील. घटनापीठाच्या निर्णयानंतर अध्यक्ष टिपाटिपणी करू शकतात. जर गटाला वाटलं अध्यक्षाची टिपाटिपणी योग नाही तर ते दाद मागू शकतात. निकालाबाबद अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय कधी देईल हे सांगता येत नाही, कारण न्यायालयाला दोन्ही बाजू पुन्हा ऐकूण घ्याव्या लागतील. मात्र या निकालानंतर पुन्हा घटनापीठ स्थापन करण्याची गरज नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या निकाल पत्रात राजकीय पक्षात कुठल्या पक्षाच्या अध्यक्षाला व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे हे महत्त्वाचं आहे. न्यायालयाने अध्यक्षांना तपासण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार कोणत्या गटाच्या अध्यक्षाचा व्हीप रेकॉडिंग झाला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाला अधीन राहून अध्यक्ष आपले स्वतंत्र मत नोंदवू शकतात. त्यावर निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय सुनील प्रभू हे त्यावेळी अधिकृत प्रतोत होते नंतर भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केली. मात्र न्यायाल्याने एक मुभा दिली आहे की कोणत्या गटाच्या प्रतोदाची रेकॉडिंगवर नोंद झाली त्या गटाची बाजू अध्यक्ष घेऊ शकतात, असं निकम यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT