Maharashtra MLA Disqualification Case Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra MLA Disqualification Case: आमदार अपात्रता निकालानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra MLA Disqualification Case: मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra MLA Disqualification Case

मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचं राजकारण झालं तर अशाच त्यांना वाचवले जाणार. भाजपाला आपलं संविधान बदलायचं असल्याचा दावा त्यांनी केला.

बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही. भाजपला स्वतःचं संविधान घ्यायचं आहे हे स्पष्ट झालं आहे. अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नसल्याचंही ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेला आहे. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे.जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झाल्याचा घणाघात त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anda Curry Recipe: आज रविवार आहे, घरीच बनवा गावरान स्टाईल अंडा करी, सोपी आहे रेसिपी

Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Blood Sugar Test Timing: ब्लड शुगर चेक करण्याची योग्य वेळ कोणती? झोपेतून उठल्यानंतर की नाश्ता केल्यानंतर?

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, सरकारकडून आले स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

SCROLL FOR NEXT