ATUL SAVE'S BROTHER AND NEPHEW ASSAULTED saam tv
महाराष्ट्र

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Atul Save Brother Nephew Attacked Over Farm Road: मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे शेतीच्या हद्दी आणि रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

माधव सावरगावे, साम टीव्ही

राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांना शेती तसेच रस्त्याच्या वादातून एका गटाने मारहाण केल्याची घटना पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नायगाव खंडेवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसारत खळबळ उडाली आहे. या मारहाणीत अमेय अजित सावे (वय35) आणि अजित मोरेश्वर सावे (वय 70) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघेही खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी परिसारत शेतीच्या हद्दी तसेच रस्त्याच्या वापरावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून दोन्ही बाजूमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर एका गटाकडून अमेय सावे आणि अजित सावे यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अमेय सावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मारहाणीचे नेमके कारण आरोपींची संख्या आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल जल आहे की नाही, तसेच नेमक्या किती जणांविरोधात कारवाई केली जाणार आहे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT