मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?
शायना एन सी यांच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित
तर शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी यांनी मंचावरूनच मानले राज ठाकरे यांचे आभार
माहीम विधानसभेत शिंदे गट आणि मनसे आमनेसामने आहेत.
तर शिवडी विधानसभेत मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजपने दिला आहे पाठिंबा
विक्रमगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार व पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर निकम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले व जिजाऊ संघटनेत प्रवेश केला प्रकाश निकम यांची बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला अपयश आले होते. यामुळे एकनाथ शिंदे यांनी निकम यांची शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी केली आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात सापडली १४ लाखांची रोकड...
विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नामपूर रस्त्यावर करण्यात आली कारवाई
स्थिर नियंत्रण पथक ( SST ) पथकाच्या वाहन तपासणीत आढळली रक्कम
घटनास्थनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी दाखल..
कारमधून नेली जात होती १४ लाखांची रोकड...
सापडलेली रक्कम कुठल्या कामासाठी नेत असल्याची पोलिसांतर्फे चौकशी सुरू
विधानसभा निवडणुक पार्शवभूमीवर रक्कम सापडल्याने खळबळ
पूजा खेडकर प्रकरण सुनावणी अपडेट
दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली आहे.
पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन संदर्भात होणार होती सुनावणी
यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिलं आहे
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आजची सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती
'लाडकी बहीण योजना ज्यांनी जाहीर केली. त्यांनीच आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरले होते. काकांचा विश्वासघात केला, अस म्हणत सुषमा अंधारेंनी अजित पवारांना डिवचलं आहे.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दिलीप मोहितेंना आमदार मंत्री करतो, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं त्यावरुन सुषमा आंधारेंनी अजित पवारांच्या आश्वासनाला लक्ष करत विश्वास कुणावर ठेवता, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी डिवचलंय. आज खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
भाजप महिला पदाधिकाऱ्यांवर समाज माध्यमांवर अश्लील कमेंट केल्याने वाद
भाजप महिला पदाधिकारी यांनी संबंधित इसमाला पोलीस ठाण्यात चप्पलनी मारहाण
निवडणुकीत फेसबुकवर एकमेकांच्या विरोधात खालच्या थराची टीका टिप्पणी
ऐन निवडणुकीत कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
पोलिस ठाण्यात एकमेकांवर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपपासून अलिप्त असणाऱ्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अखेर निर्णय घेतलाय.. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय. खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संगीता ठोंबरे या विधानसभेच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होत्या.. भाजप आणि महाविकास आघाडी कडून त्यांनी प्रयत्न केले, त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती. मात्र अखेर संगीता ठोंबरे यांनी निर्णय घेतला असून त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. कारवाईत परराज्यातील दारू, ०४ वाहनासह ४० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घोटावडे गावच्या हद्दीत, आंबटवेट रोडवर सापळा लावला असता चारचाकी वाहनामधून दारू एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यात येत होती. यामध्ये विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल होते. किरण ज्ञानोबा साळुंके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या घणाघाती टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
पायाखालची जमिन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. इतिहास जमिनीशी , भूगोलाशी आधारीत आहे. 2006 साली पक्ष निर्मितीच्या वेळी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा म्हटलं होतं. कोकणात चमत्कार घडवून दाखवतो आम्हाला निवडून द्या. तुमचा शत्रु जमिनीवरून जमिनी हडप करण्यासाठी येतोय. राजकारणी नाहीत. जमिनीतील दलाल आहेत. जमिनी घेण्यासाठी आपली माणसे तुमच्याकडे येतात. नाणार ,बारसू प्रस्ताव आला पाच हजार एकर जमिन आली कुठून? राज ठाकरेंचा सवाल
राजकारणी नाहीत हे जमिनीचे सौदागर आहेत. कोकणातील जमिनी विकू नका. राज ठाकरेंचा कोकण वासियांना सल्ला
मुलुंड मध्ये निष्काळजीपणामुळे एक पाच वर्षाच्या मुलाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. कबीर अर्जुन कनोजिया असे या मृत्यू पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. काल दुपारी हा मुलगा जवळील गॅरेज मध्ये खेळत होता. खेळता खेळता त्याने एक उभ्या असलेल्या मोटर कार चा दरवाजा उघडून गाडीत जाऊन बसला. गाडी आतून त्याला उघडता आली नाही आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात विषयांची कमतरता नाही. दुपारची सभा लावल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. फटाके आहेत की लोकसंख्या एक लावला की दोनशे फुटतात. कोकणात आलं की कोकण भूरळ घालतं. परदेशातील सौंदर्य पाहून इकड पाहिल्यावर खंत वाटते. चुकीची माणसं निवडून दिल्यानं दुर्भाग्य, त्यांनी स्वत: काही केलं नाही. उद्योग धंदे नसल्याने अनेक तरुण मुंबई पुण्याकडे जात आहेत.
मुंबई पुण्याचे परदेशी निघून जातात. 750 किलोमीटर समुद्र किनारा महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.
गोवा राज्य पर्यटनावर सुरू आहे, इतकं सुंदर कोकण करता येईल त्याची कल्पना करता येणार नाही.
नरेंद्र मोदींना २०१४ ला अजित पवारला पराभूत करायचं होतं, म्हणून त्यांनी बारामतीत सभा घेतली होती. आता त्यांना मला निवडून आणायचे आहे. मला बारामतीत भाजपच्या कुठल्याही नेत्यांची निवडून येण्यासाठी गरज नाही , मी एकटा पुरेसा आहे असं अजित पवारांनी म्हटलंय . यावेळी प्रचाराला भाजपचे नेते बारामतीत का येत नाहीत या प्रश्नावर अजित पवारांनी हे उत्तर दिलंय.
पुस्तकात दिल्याप्रमाणे छगन भुजबळ तसं काहीही बोलले नाहीत. निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो. बटेंगे तो कटेंगे अशा गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही - अजित पवार
अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रिती बंड पक्षातून निलंबित..
माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील ,नाना नागमोते,प्रवीण अळसपुरे,आशिष धर्माळे यांचे ही निलंबन..
पक्ष विरोधी कारवाईचा ठेवण्यात आला ठपका..
बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी दिली असताना प्रीती बंड निवडणूक रींगनात.
चुकून आघाडी सरकार बहुमतात आले. तर उद्धव ठाकरे आपल्या मुलाला ,शरद पवार त्यांच्या मुलील मुख्यमंत्री करण्यासाठी इच्छुक आहेत, तर काँग्रेसमध्ये एक डझन लोक मुख्यमंत्री बनण्यासाठी आपले कपडे शिवून तयार बसले आहेत.जे त्यांच्या मुलांचे कल्याण करण्यासाठी बसले आहेत,ते तुमचं काय कल्याण करणार, अमित शाह यांची टीका
पालघर - महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे पालघर उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध . प्रचार रॅलीसाठी गेलेल्या गावितांना मुरबे येथील ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत केला निषेध . वाढवण बंदर विरोधात गावित यांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप . काळे झेंडे दाखवत गावित यांची प्रचार रॅली रोखली .
लाडक्या बहिणींसाठी मी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. आचारसंहिता संपात डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.
नागरिकांना पाणी प्रश्नावर तक्रार करण्यासाठी Waterpil126@punecorporati on.org ईमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली माहिती
नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, पर्यायी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते अशी याचिका वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनने दाखल केली होती
नेमलेल्या समितीने दिलेल्या शिफारसीनुसार तक्रार करण्याची सूचना देण्यात आली
या समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार नागरिकांना पाणी प्रश्नावर तक्रार करण्यासाठी ईमेल आयडी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे
शरद पवार म्हणतात मोदींनी महाराष्ट्रसाठी काय केले आहे. मी पण बनियाचा मुलगा आहे,माझ्याकडे सगळा हिशोब आहे, तो घेऊन आलो आहे. 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विकसित करण्यासाठी 15 हजार कोटी दिले आहेत. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे सरकारने आणली आहे. ती वाढवून आणखी देण्याचे काम केले जाणार आहे. शरद पवार शेतकरी शेतकरी म्हणतात, नरेंद्र मोदी सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर कोट्यवधी रूपये दिले.
बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी मोठा लढा दिला. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींनी देखील आरक्षणाच्या विरोधात काम केले आणि आता त्यांचे चिरंजीव देखील तेच काम करीत आहेत. जाती जातीतील एकता तोडण्याचे काम सुरु आहे. ओबीसी एकत्र राहिले तर त्यांची ताकद वाढेल, त्यामुळे त्यांना एकत्र न येऊ देण्याचं काम काँग्रेस करत आहे.
आमच्या बहीण-मुलींना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या आहेत. विधानसभामध्ये महिलांना हक्क दिला. विरोधक आमची खिल्ली उडवत होते. आज महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचे नाव लावावे लागत आहे. आमची सरकार महिलांसाठी जे करत आहे ते काँग्रेसला सहन होत नाही. लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात पोहचले होते, असा हल्लाबोल मोदींनी केला.
धुळ्यातून 2024 विधानसभा निवडणुकीची सुरूवात करत आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राला जी गती मिळाली आहे तिला थांबू देणार नाही. विरोधकांच्या गाडीला ना चाक आहेत, ना बसायला सीट आहे. लोकांना लुटणारे महाविकास आघाडीत येतात तेव्हा विकास थांबवतात. महाआघाडीने लुटमार केली. समृध्दी महामार्ग होण्यात अडचणी निर्माण केल्या. आपल्या आशीर्वादाने हे सर्व बदलले...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. धुळ्यात प्रचारसभेत ते भाषण करत आहेत. त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे.
लोकांच्या आग्रहास्तव भोर विधानसभा मतदार संघात किटली या निशाणी वर मी अपक्ष उमेदवारी करत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ रायरेश्वराचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करत अन् आदिवासी क्रांतिकारकांच्या लढ्यास सलाम करत मी या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रवीणजी तरडे यांनी खास उपस्थिती लावत प्रचाराला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय भोर येथे झालेल्या या सभेत निशाणी किटली घरा घरांत पोचविण्याची जबाबदारी उपस्थितांनी घेतली.
येत्या १० तारखेला प्रसिद्ध होणार महायुतीचा जाहिरनामा
महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार कार्यक्रम
महायुतीच्या जाहीरनाम्या १० आश्वासन दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला (AMU) अल्पसंख्याक संस्थानचा दर्जा कायम
CJI धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील ७ न्यायधिषांच्या घटनापीठाने ४:३ असा दिला निकाल
घटनेच्या कलम 30 नुसार धार्मिक समुदायाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि ती चालवण्याचा अधिकार आहे - SC
2005 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने AMU ला अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता
AMU ही अल्पसंख्याक संस्था नाही अस हायकोर्ट म्हणाल होत
हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केल होत
त्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक ओझर विमानतळ येथे आगमन...
- ओझर विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळे येथे सभेसाठी झाले रवाना
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर...
- महाराष्ट्रातील पहिली सभा धुळे येथे तर दुसरी सभा नाशिकच्या तपोवनातील मोदी ग्राउंड येथे होणार...
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौरा कडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष..
छगन भुजबळ यांच्यावर दावे केलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा.
ज्यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत बोलणं झालं. त्यावेळी माझ्यासोबत दुसरे काही लोकही होतं.
हे सर्व राजकारणाचे प्रश्न आहे. पुस्तक १८ महिन्यापासून लिहितोय. त्यामधील एक भाग महाराष्ट्रवर आहे. वस्तूस्थिती लोकांसमोर ठेवली.
छगन भुजबळ यांच्याबद्दल मला खूप आदर. जे पुस्तकात हे ते आहे. या पुस्तकात कुणाचेही काही नाही. दोन्ही पक्षाचे मत आहे.
लोक काही मोजके मुद्दे घेतात. छगन भुजबळ आणि इतर नेतेही बाकीच्या विषयावर बोलले आहेत.
पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव यांच्या त्यांचे समर्थक माजी नगरसेवक महादेव धोत्रे,ऋषीकेश भालेराव यांनी भालकेंची साथ सोडली. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना समर्थन दिले. कालच मंगळवेढा येथील समविचारी आघाडीने भालकेंची साथ सोडली त्यानंतर आज पंढरपुरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे शहरातून करणार आहेत. धुळे शहरातील दसरा मैदान येथे त्यांची सभा संपन्न होणार असून, सकाळी 10:30 वाजेला पंतप्रधान नरेंद्र मोदीयांची धुळे शहरात प्रचारसभा पार पडणार आह. या ठिकाणी सभेला एक लाखांपेक्षा अधिकचा जनसमुदाय असेल असा दावा आयोजकांनी व्यक्त केला आहे. तर 3000 पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि मालेगाव ग्रामीण या मतदार संघाच्या प्रचारासाठी मोदी हे आज सभा घेत आहेत, या सभेमध्ये मोदी नेमकं काय बोलनार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
सांगलीच्या मिरजेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात चिन्हावरून एकमेकांना मुश्किल टोलेबाजी करण्यात आली.विशाल पाटलांनी बोलता बोलता,मशाल सोबत विशाल आहे,आणि हातात घडयाळ बांधले आहे,आणि हाताने हातात मशाल घेतली आहे,असं विधान केले.यावरून स्टेजवरील नेत्यांनी विशाल पाटलांना,तुतारी ऐवजी घडयाळ बोलल्याचे निदर्शनास आणून दिली.यावेळी जयंत पाटलांनी,जे तुमच्या मनात आहे,ते बोलुन दाखवलं,अश्या शब्दात मिश्किल टोला विशाल पाटलांना लगावला,
तसेच भाषणा दरम्यान आमच्या तुतारी वाजवणारया माणसाची ओळख,आपल्या खासदारांना चांगली व्हावी,असं सांगत तुतारी वादकांना थेट तुतारी वाजवायला लावत, आमचं घड्याळ चोरीला गेले आहे,असं स्पष्ट केलं.मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गडाच्या उमेदवार तानाजी सातपुते यांचे प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये हा प्रसंग घडला.
धनगर गेली आणि मेंढरं राहीली’ हे आमदार सुनील शेळके यांचे विधान धनगर बांधवांचा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान करणारे आहे. ज्या दिवशी धनगर समाजांच्या काठीचा फटका त्याला पडेल तेव्हा तो जागेवर येईल.हे विधान जातीयवादी असून कायदेशीर सल्ला घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मावळ विधानसभा निवडणूकीतील सर्वपक्षीय अपक्ष उमेद्वार बापू भेगडे यांनी सांगीतले.
पुरंदर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.
फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचार संहितेच्या काळात बॅनर लावणे तसेच होर्डिंग लावणे यावर राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे.
त्यामुळे या संदर्भातील व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार असा सवाल सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
शहरात एकीकडे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे कॉलमुळे विमान प्रशासनाला हैराण करून सोडल्याची घटना मागील काही दिवसात घडल्या त्यातच आता बुधवारी कात्रज परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयालाही धमकीचा ई-मेल आला आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या (महिला आघाडीचा) प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला.एकेकाळी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती राहिलेल्या हंसा खोब्रागडे नाना पटोले यांच्या खंदे समर्थक मानले जातात. जिधर नाना.. उधर जाना.. अशा प्रकारचे श्लोगन देत भाजपमधून त्या नाना पटोलेंसोबत काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. अनेक वर्षापासून ते कॉंग्रेस विविध पदांवर काम करीत होत्या.मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी पदाचा राजीनामा देत कॉंग्रेस ला रामराम ठोकलं.
कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. काही गाड्या माझा पाठलाग करत आहेत काही लोक अपहरणाचा कट रचत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मागे भाजप नेते रावसाहेब दानवे असल्याचा त्यांचा आरोप आहे. या मतदारसंघात तुमची मुलगी निवडणुकीत उभी आहे, तुम्ही निवडणुकीसारखे निवडणूक लढा मला पराभूत करा हरकत नाही. मात्र असं कमरे खालचा मारू नका असं हर्षवर्धन जाधव म्हणालेत. गुंडगिरी ,मारण्याची धमकी खून करण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याला शोभत नाही, त्यामुळे असले धंदे करू नका पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी आणि माझ्या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे..
भुलेश्वर परिसरातून २.३ कोटींची रोकड जप्त
१२ संशयितांना घेण्यात आलं ताब्यात
गोपनीय माहितीच्या आधारावर
एल टी मार्ग पोलिसांची कारवाई
निवडणूक आयोगाला दिल्या पोलिसांनी सूचना
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची मोठी कारवाई
बिश्नोई गँगकडून सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक कक्षाला धमकीचा मेसेज आलाय.
आठ दिवसात पंधरा लाख प्रवाशांनी केला प्रवास
एसटीला 17 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न
दिवाळीच्या काळात राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
पुणे विभागाने सोडलेल्या बसमधून 15 लाख प्रवाशानी प्रवास केला असून पुणे विभागात 17 कोटी 80 लाख रुपयांची उत्पन्न मिळाले आहेत.
यंदा प्रवासी संख्या वाढली असली तरी उत्पन्नामध्ये घट झाली असल्याचे दिसून आले.
पुणे विभागातून दिवाळी काळात 24 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान 15 लाख 7 हजार प्रवेशानी एस टी मधून प्रवास केला
ऐरोलीमधील शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा भाजपासह शिवसेना ठाकरे गटाला धक्का.3 माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजय चौगुले यांना दर्शविला पाठिंबा. माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेवक जब्बार खान आणि माजी नगरसेवक रामदास पवळे यांचा विजय चौगुले यांना पाठिंबा. माजी नगरसेकांसह काही पदाधिकाऱ्यांनी देखील चौगुले यांना दिला पाठिंबा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते सुरज वाजगे यांच्या कार वर रात्रीच्या वेळी दोन अज्ञातांनी दगडफेक केली असून यात वाजगे यांच्या कार चे मोठे नुकसान झाले आहे.मात्र चालक आणि वाजगे यातून सुखरूप बचावले आहेत.सूरज वाजगे रात्री जुन्नर वरून नारायणगाव कडे प्रवास करत होते.या वेळी हा हल्ला झालाय.यावेळी खासदार अमोल कोल्हेंनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
सारंगी महाजन यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, निवडणुकीचे औचित्य साधून ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बदनाम केले जात असल्याचे गोविंद मुंडे यांनी माध्यमांची बोलताना सांगितले. परळीच्या जिरेवाडी भागात माझी जमीन होती व त्या जमिनीचा व्यवहार मला अंधारात ठेवून फसवणूक करून करण्यात आला, असे सारंगी महाजन म्हणाल्या होत्या. त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोपही केले होते.
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाविषयी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार
सुप्रीम कोर्टाचे ७ न्यायाधिशांचे घटनापीठ देणार निकाल
अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांच्या संस्थेचा दर्जा दिला जाऊ शकत नाही कारण ते केंद्रीय विद्यापीठ आहे असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता
त्याविरोधात अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि तत्कालीन यूपीए सरकार हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते
सुप्रीम कोर्टाच्या ७ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर अनेक दिवस सुनावणी केल्यानंतर निकाल राखून ठेवला होता
आज मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं घटनापिठ हा निकाल सुनवणार आहे
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
पूजा खेडकरविरोधात युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा अशी मागणी केली आहे
पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळते आहे
पूजा खेडकरने खोटी कागदपत्र देत अनेक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे
- नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार
- नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावर आज पंतप्रधान मोदींची सभा
- मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
- जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची दुपारी १ वाजता जाहीर सभा
- मोदींच्या सभेसाठी तब्बल १ लाख लोक जमवण्याच महायुतीचं नियोजन
- तर सभे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसपीजी कमांडो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
- शहरातील वाहतूक मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल
- सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची असणार करडी नजर
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांंविरुद्ध मोठी कारवाई.
पोलिसांकडून रात्री नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या चार महिन्यांंत मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या 2 हजार 500 जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात 500 जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे.
संबंधित वाहनचालकांंचे परवाने किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार.
तसेच वाहन चालविण्यास बंदी असणार आहे.
या कारवाईमुळे मद्यपी वाहनचालकांची आता झिंग आता उतरणार आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद गांधी आणि दापोली मतदारसंघातील मनसे उमेदवार संतोष अबगुल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गुहागरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वतंत्र लढत अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जोरदार मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघ या ठिकाणच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सकाळी 10 वाजता राज ठाकरे गुहागरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
जालन्याच्या परतूर शहरात आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. परतूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आसाराम बोराडे यांच्या प्रचारार्थ आज परतूर शहरात उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलीय. सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं असून या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आज परतूर मध्ये होणाऱ्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार या कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री सव्वा अकरा वाजता अमित शहा कोल्हापुरात दाखल झाले. आज सकाळी ते सांगली जिल्ह्यातील सभांसाठी रवाना होणार आहेत. तर दुपारी साडेचार वाजता ते पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं सभेसाठी दाखल होणार आहेत. अमित शहा आपल्या सभांमध्ये महाविकास आघाडी संदर्भात नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी आज शिवाजीनगर येथे सायंकाळी घेणार सभा
सकाळी 10 वाजल्यापासून खासदार सुप्रिया सुळे यांचा पुण्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी रोड शो... रोड शो ची सुरुवात शिवाजीनगर मतदार संघातून होणार
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुनील टिंगरे याच्यासाठी वडगावशेरीत दुपारी 12 वाजता सभा
केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांचा धडाका असेल. कोल्हापूरवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केलेय.
पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमने सामने आला आहे. जाहीर सभांमधून एकमेकावर टीका केली जात आहे. २ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भागीरथ भालके यांच्या प्रचारात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यांच्या उमेदवाराला आम्ही मोजत नाही, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली होती. खासदार प्रणिती शिंदे यांच्या या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. पंजाब मध्ये जावून सलूनच दुकान काढून माझंच दूकान चांगलं आहे असं म्हणत असतील तर ते दूकान चाललं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं म्हणत त्यांनी खासदार शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.