दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेचे नाव होतं.आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता घरच्या बाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो.याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत. आपली औकात बघून आदित्यने बोलावं.रामदास कदम
भाजपला विनंती. आपले मतभेद असतील. आपण त्यासाठी कुणाला बोलायला लागेल तर बोलू. त्यासाठी मी बोलायला तयार आहे. पण त्याअगोदर सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे.उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
महायुतीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची वेळच येणार नाही, कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पंतप्रधानांपासून योगी आदित्यनाथांपर्यंत सगळेच महाराष्ट्रभर फिरत आहेत. पण त्यांना उत्तर प्रियंका गांधींच्या सभेतून मिळणार आहे. अडीच वर्षांपूर्वीच राजकारण महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाही. जनता शांत आहे पण मताद्वारे व्यक्त होईल असं मत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केलं आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे
Pankaja Munde News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आल्या असता, यावेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या साहित्याची तपासणी निवडणूक पथकाने केली आहे, कुठलाही विरोध न करता पंकजा मुंडे यांनी निवडणूक पथकला आपलें कामं करू दिले, शिंदखेडा येथे पंकजा मुंडे या भाजप उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचाराला आल्या असता पंकजा यांची शिंदखेडा येथे सभा संपन्न होतं आहे, याही निवडणुकीत पंकजा काय बोलनार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, बटेंगे तो कटेगे या विधानावरून सुरु झालेल्या मतभेद युद्धवर पंकजा काय बोलताय याकडेही लक्ष लागले आहे.
तासगाव विधानसभा परिषदेचे शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची जाहीर सभा तासगाव मध्ये होत आहे. यावेळी धनगर समाजाच्या वतीने शरद पवार आणि रोहित पाटील यांच्या गळ्यात ढोल घालण्यात आला.
Maharashtra Marathi News Live Updates : मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील चेरपोली घाटात दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई नाशिक ला जाणारी वाहतूक कोंडी झाली होती नंतर विरूद्ध दिशेने वाहन चालकांनी आपली वाहने टाकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या ठिकाणी महामार्गावर रस्त्याचे काम सुरू होते मात्र रस्ता दुरुस्ती करत असतान ठेकेदाराने व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे गेल्या एका तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे
२००६ साली महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणणार बोलला.. २०१४ साली प्रसिद्ध झाली...
पण गेल्या दहा वर्षात कोणाला वेळ नाही मिळाला त्याबाबत धन्यवाद
विषय बदलले नाही प्रश्न तेच आहे.. आणि त्यावर प्रश्न विचारता आहोत
पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना
हडपसर मध्ये मगरपट्टा परिसरात एका इमारतीला लागली आहे
तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आगीची घटना
आगीचं कारण स्पष्ट
अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल आग विझवण्याचे काम सुरू
मुंबईच्या JFA लाॅ फर्म आणि JSA आॅफिस कमला मिल लोअरपरळ च्या कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याच्या ईमेलने खळबळ
गुरूवारी दुपारी हा धमकीचा मेल लाॅफर्मला आला
JFA लाॅ फर्मच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद या ईमेल आयडीवरून हा धमकीचा मेल आला
यात JFA लाॅ फर्मचं कार्यालय आणि बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याचे म्हटले होते
या घटनेची गंभीर दखल घेत कार्यालयातील कर्मचार्याने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली
Devendra Fadanvis on Batenge toh katenge: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू ऐक्याचे आवाहन करणाऱ्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमधून याला विरोध करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणाचे कौतुक केलेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणाबाजीत काहीही चुकीचे दिसत नसल्याचे सांगत हा आपल्या देशाचा इतिहास असल्याचे सांगितले.
मला योगीजींच्या घोषणेमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. या देशाचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा हा देश जाती, प्रांत आणि समुदायांमध्ये विभागला गेला तेव्हा, हा देश गुलाम झाला, असे फडणवीस म्हणाले.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील एका मुलीची परीक्षेची फी भरली म्हणून त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली.
Maharashtra Marathi News Live Updates : शिवसेनेचा शिंदे गटाचा हा बाण बाळासाहेबांचा नाही हा बाण मोदी आणि शहाचा आहे.अशी टीका उस्मानाबाद येथील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांनी केली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण आणि शिवसेना ठाकरे गटाची मशाल अशी लढत आहे. भाजपमधून उमेदवार आयात करत शिवसेना शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे उमेदवार भाजपचा आणि मोदी, शहा, फडणवीस यांचं असल्याचा टोला कैलास पाटील यांनी लगावला. प्रचारा निमित्त गावभेट दौऱ्या दरम्यान ते बोलत होते शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे आणि ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्यात सामना आहे.
Nanded News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांच्या आज नांदेडमध्ये दोन प्रचार सभा होणार आहेत.भाजपाच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोट निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आज भोकर तालुक्यातील बारड येथे प्रचार सभा होणार आहे.सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा राज्यातील दोन अधिकाऱ्यां सोबत पन्नास पोलीस कर्मचारी या बंदोबस्ता साठी तैनात करण्यात आले आहेत.बारड येथिल सभा संपल्या नंतर नांदेड उत्तर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाचा समाचार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- नागपूर ग्रामीणमधील अतिदुर्गम भागातील मतदारांनी निवडून आयोगाने घरापर्यंत पोहचून दिली मतदानांची संधी...
- नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार
- नागपूर ग्रामीणमध्ये १४१६ तर नागपूर शहरात २०२१ मतदार गृह मतदान करणार
- निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यांना केली गृह मतदानाची सोय
- गृह मतदानाचा आजचा शेवटचा दिवस
- उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये घेणार तीन सभा
- मनमाड मालेगाव आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
- मनमाड आणि नाशिक शहरात होणाऱ्या सभाकडे विशेष लक्ष
- शहरात उद्धव ठाकरेंचे तीन उमेदवार आहेत रिंगणात
- निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने ते काय बोलणार याकडे लक्ष
- तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील आज नाशिकमध्ये विविध मान्यवरांसोबत करणार चर्चा
- शहरातील व्यवसायिक, व्यापारी डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत करणार चर्चा
ख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या होणार 3 सभा
दापोलीचे शिवसेना उमेदवार आणि आमदार योगेश कदम यांची माहिती
दापोली, गुहागर आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची होणार सभा - योगेश कदम
12 वाजता दापोलीत होणार जाहीर सभा,
2 वाजता गुहागरमध्ये होणार सभा
4 वाजता राजापूरमध्ये होणार सभा
त्यानंतर सिंधुदुर्गत सभा होणार
रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत
Maharashtra Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या अचानक पडलेले या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला यामुळे दिलासा मिळाला परंतु ग्रामीण भागातील भात शेतीला याचा फटका बसला. अनेक ठिकाणी अजूनही भात कापणीचे काम चालू आहे त्यामुळे या पडणाऱ्या पावसामुळे याचा फटका भात शेतीला होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे.
दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली तरी, शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. आता आठवडाभरातच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली त्यात एकट्या कारंजा बाजार समितीत गत गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. तर वाशिम बाजार समितीतही आठवडाभरात ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. याबाजार समितीत गुरुवारला १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे बाजार समितीच्या लिलावातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचाराची तोफ धडाडणार असून मनमाड,मालेगाव, नाशिक येथे त्यांच्या प्रचारसभा होत आहे मनमाड येथे शिवसेना उमेदवार गणेश धात्रक व मालेगाव येथे अद्वय हिरे यांच्यासाठी या प्रचार सभा होत आहे,मनमाड येथे पहिली सभा होत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य केलेल्या दिपोत्सववामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीघाटावर आज पहाटे लखलख तेजाची न्यारी दुनिया पहायला मिळाली. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या दीपोत्सवात कोल्हापूरकरांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने पंचगंगा घाट पहाटे उजळून निघाला. जोडीलाच विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आणि भक्तिगीतांचा सुरेल संगम... आजचे हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीघाटावर गर्दी केली होती. आज काढलेल्या रांगोळ्यांमध्ये आणि देखाव्यांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा देखावा हा लक्षवेधी होता तसेच रांगोळीच्या माध्यमातून राजकीय संदेश देखील देण्यात आले होते.
आम्ही भाजपसोबत असलो तरी आमची विचारधारा शिव, शाहू ,फुले आंबेडकरांची आहे. एखाद्या पक्षासोबत असलो म्हणजे त्यांच्या विचारधारेशी सहमत असायाला लागत नसल्याच सांगत चाकणकर यांनी आपली भूमिका भाजप पेक्षा वेगळी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.