जीबीएसचे नवीन तीन रुग्ण आढळले आहेत तर एकाचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंत ७२ रुग्णांना बरे झाले आहेत. राज्यातील जीबीएस आत्तापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईच्या BKC संकुलातील एका अपघातात एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
सिमेंट मिक्सरने १० वर्षाच्या मुली चिरडलंय. यात तिचा सहा वर्षाचा लहान भाऊ जखमी झालाय.
शॉर्टसर्किट झाल्याने एसीला आग लागल्याने धांदल उडाली. आग लागल्याची घटना कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने आगीवर नियंत्रण लवकर मिळवता आले. महानगरपालिका आणि एमआयडीसी येथील अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणलीय.
मावळच्या तळेगाव दाभाडे येथील नवीन नगरपरिषदेच्या इमारतीला आग लागली आहे. सध्या या इमारतीचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. वेल्डिंगचे काम करत असताना त्यांच्या ठिणग्या उडून त्या इमारतीच्या जवळ असलेल्या पोत्यांवर पडल्या. त्यामुळे आग लागली. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
कित्येक महिन्यापासून बारदाना आभावी नाफेड केंद्र बंद आहेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी विना पडून आहे. सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. 7 फेब्रुवारी सोयाबीन खरेदी साठी शेवटची तारीख ठेवली आहे मात्र अद्याप पर्यंत बारदाना उपलब्ध नसल्याने लाखो क्विंटल सोयाबीन खरेदी होने बाकी आहे.या सरकारच्या धोरणा विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकारांनी, सोयाबीन खरेदीसाठी एक महिना मुदत वाढ द्या अन्यथा सर्व सोयाबीन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देण्यात येईल असा गंभीर इशारा दिला आहे.
:बीडच्या पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी शिवारात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आलाय. बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून मेंगडेवाडी शिवारात बिबट्या दिसून येत आहे. अशातच आज शेतामध्ये जाणाऱ्या सोजरबाई बोबडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. दरम्यान या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याची माहिती वनविभागाला देण्यात आलीय. वनविभागाच्या माध्यमातून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
भारताच्या खो-खो संघांनं यंदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेत्या संघात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रेश्मा राठोड जंगी स्वागत बदलापुरात करण्यात आलं. विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच रेश्मा बदलापूर शहरात आली. त्यावेळी ती ज्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेत शिकली, त्या शाळेने रेश्माची जंगी मिरवणूक काढली.
- पुण्यात तेरा महिन्यात टोळक्यांकडून 93 ठिकाणी वाहनांची तोडफोड
- 75 गुन्हे उघड करताना 168 आरोपींना बेड्या
- तोडफोडीच्या 93 घटनांमध्ये 58 विधीसंघर्षीत बालक ताब्यात
5 वर्षाच्या चिमुरडीचा खून - लैगिक अत्याचार केल्याचा संशय.
जत तालुक्यातील करजगी येथील धक्कादायक घटना.
शेजाऱ्याने खेळण्याच्या बहाण्याने पत्राच्या शेडमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा संशय.
संशयित व्यक्तीस पोलिसांनी घेतले ताब्यात, तर घटनास्थळी जत व उमदी पोलिस दाखल.
पोस्टमार्टेम अहवालानंतर लैंगिक अत्याचार झाला की याची खात्री होईल - पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती.
मेहेकर तालुक्यातील सर्वात मोठे धरण पेनटाकली असून त्या धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या पेनटाकली गावाचे अद्याप पर्यंत पुनर्वसन करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी जीवाची बाजी कावावी लागत आहे.
त्यामुळे पेनटाकली गावाचे तातडीने स्थलानंतर करण्यात यावे या मागणीसाठी गावच्यात असंख्य महिलानी धारणात आमरण उपोषण सुरु केके आहे.
जिल्हाधिकारी यांनी तात्काल लक्ष देऊन मागणी पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे..
भिवंडीतील गोकुळ नगर परिसरात कचऱ्याच्या कुंडीजवळ आढळले एक महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक
भिवंडी शहरातील गोकुळ नगर परिसरात कचऱ्याच्या कुंडीजवळ एक महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अर्भकाला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामात अडचण निर्माण केली असल्याने लाभधारक झाले आक्रमक
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पारधी तांडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने 27 विहिरी मंजूर करून दिलेले आहेत
परंतु त्या कामासाठी गावातील माजी सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांनी अडवणूक करत असल्याचा आरोप
आज पारुंडी तांडा येथील विहीर लाभधारक व काही ग्रामस्थ यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे
बीड महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार.
माझ्या जीवितच काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार.
बीड मधील भागचंद महाराज झांजे यांनी दिली तक्रार.
छ्त्रपती संभाजीनगर - शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये धुडगूस. घटना सीसीटिव्हीमधे कैद
हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवन दिले नाही म्हणून हॉटेलची तोडफोड..
लाठ्या- काठ्या, हॉकी स्टिकन आणि रॉडने हॉटेल कर्मचारी, मॅनेजरला बेदम मारहाण.
आठ ते दहा जणांच्या टोळक्याला घेऊन जाऊन हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना केली बेदम मारहाण
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले नांदेड येथील जगप्रसिद्ध गुरुद्वाराचे दर्शन.
आज एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
नांदेड मध्ये आज त्यांची थोड्याच वेळात आभार सभा होणार आहे.
- नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेलची होणार तपासणी
- जिल्ह्यातील सर्वच लोकांची सिकलसेल ची तपासणी केली जाणार
- नंदुरबार जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा असून या जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांची सिकलसेल ची तपासणी होणार आहे.
- आतापर्यंत तीन लाख 80 हजार लोकांची तपासणी झाल्या असून एकूण 11 लाख लोकांची तपासणी करणार आहेत.
- सिकलसेल ची तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले असून चार कौन्सिलर देखील राहणार आहेत.
- सिकलसेलची तपासणी बाबतीत कुठलीही माहिती हवी असल्यास हेल्पलाइन नंबर देणार आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गांजा तस्करी करुन विक्री करणाऱ्या दोघांना अटक
दोन्ही आरोपीकडून चार किलो 800 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत दोन लाख रुपये आहे
नितीन भाऊसाहेब गोपाळ ,लकी छोटु पवार राहणार धुळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
गांजा कुठून आला आणि कुठे विक्रीसाठी जात होता या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे
- पुण्यातील बंड गार्डन येथील मोबोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पुणे महापालिकेची मोठी कारवाई
- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोफत हॉटेल कंपाऊंड मधील अनेक अतिक्रमण हटवली
- या कारवाईसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात
- कारवाईसाठी परिसरातील रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद
- अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य असलेल्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांना हटवलं
- व्यवसायिक आणि रहिवासी संघटनाचा या कारवाईला होता विरोध
- मात्र कोर्टाच्या आदेशाने कारवाई करण्यात येत असल्याचं प्रशासनाचे म्हणणं
नाशिक - बांगलादेशी घुसखोरांविरोधात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
- देशात अवैधरीत्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरांना अटक
- नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
- अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक
- शहरातल्या वेगवेगळ्या भागातून 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक
अंधेरीत वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या घरांवर तोडक कारवाई
अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सहार जंक्शन येथील 29 घरांवर महापालिकेची तोडक कारवाई
पाच जेसीबी आणि महापालिकेच्या 40 कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली झोपड्यांवर तोडक कारवाई
महापालिकेने झोपडीधारकांचे पुनर्वसन करून केली तोडक कारवाई
तोडक कारवाईमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
छत्रपती संभाजीनगर - छावा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगरात होणार दाखल
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला करणार अभिवादन
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे देखील राहणार उपस्थित
दुपारी 12 वाजेला शहरातील नुपूर चित्रपटगृहात पार पडणार कार्यक्रम
क्रांती चौकात अभिनेता विकी कौशल याच्या स्वागताची जय्यत तयारी
ढोल-ताशांच्या गजरात होणार आगमन
अभिनेता विकी कौशल याला बघण्यासाठी तरूण-तरुणांची क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी
माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी बंधाऱ्यातून चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे.
चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झाले असून पाण्यामध्ये आळ्या आणि किडे तयार झाले आहेत.
दूषीत पाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यासंदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केली होती.
बातमीची दखल घेऊन शासनाने माघ यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोडले आहे.
शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अॅक्शन मोडवर.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा उतरला रस्त्यावर.
साईभक्तांना अडवणारे एजंट तसेच अवैध व्यवसाय करणा-यांची धरपकड मोहीम सुरु.
सकाळ पासून शंभर हुन आधिक जणांना घेतले ताब्यात.
अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट वाहने, फेरीवाले, पथ विक्रेते, कमीशन ऐजंट त्याच बरोबर संशयित फिरणाऱ्या महिला आणि पुरुषांची धरपकड मोहीम.
वाहतुकीला अडथळा ठरणारी अवैध प्रवासी वाहने केली जप्त.
शिर्डी वाहतूक शाखा आणि आरटीओनी केली जप्त.
दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत कारवाईचा धडाका.
पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी बाबत चौकशी सुरु
एकाचवेळी पुणे, फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे
विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे
नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला.
संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीला.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता तर नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांची खांदे पालट होणार .
देशाच्या सेवेसाठी आपले योगदान देणारे तिवसा शहरातील आर्मी सैनिक शहीद सागर हीमाणे हे घरी सुट्टी वर आले असता नागपूरवरून रेल्वेनी परत सेवा द्यायला जम्मू काश्मीर येथे जात असताना मध्य प्रदेश येथील ईटारसी नजिक रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला.तर त्याचा अंत्यविधी आज तिवसा येथील हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय ईतमामात झाला, यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत त्याला अखेरची शासकीय मानवंदना दिली, यावेळी शहीद सागर हिमाने अमर रहे. अमर रहे.. अशा घोषणा देण्यात आल्या, सागर हिमाने यांचा तरुण वयातच रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने हजारो नागरिक त्यांच्या अंत्यविधीत सहभागी झाले होते, सागर हिमाने यांच्या कुटुंबाला मात्र प्रचंड अश्रूअनावर झाले होते.
धडगाव ग्रामीण रुग्णालयाची रुग्णीवाहिका घाटात बंद....
भंगार रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना सहन करावा लागतोय त्रास....
घाटात रुग्णवाहिका बंद होत असल्याने रुग्णांच्या जीवास हानी झाल्यास जबाबदार कोण....
शहादा ते धडगाव घाटात कधीही बंद पडते भंगार रुग्णवाहिका.....
धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून मेंटेनन्स नाही....
सर्विसिंगच्या नावाखाली फक्त ऑइल बदली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आणि समोर....
भंगार रुग्णवाहिकेत चालकासोबतच रुग्णांचे जीव धोक्यात घालून प्रवास....
बुलढाणा शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार
पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाण्याच्या टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरू
तसेच फिल्टर प्लांटसुद्धा स्वच्छ करण्याचे काम सुरू
नगर पालिका प्रशासनाने दिली माहिती
पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन
अमरावती - नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस..
राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबिन खरेदी विना...
सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी..
अमरावती मधील नाफेड केंद्रावर लागल्या सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा..
नाफेड मध्ये सोयाबीनला मिळतोय 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव...
तर खाजगी बाजार पेठेमध्ये सोयाबीनचे दर 3 हजार 500 पर्यत.
सोयाबीन खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांच होणार मोठे नुकसान
नाशिक - नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या ८ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात .
नाशिक शहरातील विविध भागातून ८ बांगलादेशी तरुणांना घेतले ताब्यात
मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली कारवाई.
- पुण्यात शहरात वाहन तोंडफोडीच्या सत्र सुरूच
- बिबवेवाडीनंतर येरवडा भागात वाहन तोडफोडची घटना
- पोलीस घटनास्थळी दाखल
- गेले काही दिवसापासून पुणे शहरात गाडी तोडफोड सत्र सुरूच आहे
- सामान्य लोकांच्या दुचाकी चार चाकी वाहनांची तोडफोड केली जाते
- काल शहरात बिबेवाडी परिसरात तोडफोड झाल्यानंतर आज पुढच्या घटना समोर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
मारहाण करणारे आरोपी अद्याप फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या का पाहतोस? असा जाब विचारत मारहाण
सोलापुरात स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेचा सोलापूर पोलिसांनी नोंदवून घेतला आहे जवाब
सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तन्वीर शेख आणि अन्य 10 जणांवर दाखल करण्यात आला गुन्हा
लाडक्या बहिणीकडील कारची सोमवारपासून तपासणी, चार चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळणार
आठ महिलांनी पैसे परत केले होते त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी घेतली माघार
पुणे जिल्ह्यात चार चा केस ने लाडक्या बहिणींना महागात पडणार असून जिल्ह्यातील आत्तापर्यंत समारं 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी वाहने असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे येत्या समोर पासून तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर वाहने असल्याचे निष्पन्न होतात योजनेतून त्या बहिणींची नावे रद्द करण्यात येणार आहेत.
- पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त कायम
- कोथरूड मधील लक्ष्मी कवच सोसायटीमध्ये सोलापूरकर याच निवास स्थान आहे
- खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे
- आणि राजकीय संघटना शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते
- त्यामुळे आता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहू लागणारे
- मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोथरूड पोलिसांकडून गेले दोन दिवस राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर चोळज बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय.
- नाशिकच्या सिडको परिसरात तीन ते चार जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना
- सिडको परिसरात एका व्यक्तीकडून तीन ते चार जणांवर प्राणघातक हल्ला
- हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, रात्री उशिराची घटना
- हल्ला करणारा व्यक्ती मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती
- घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात केली होती गर्दी
- हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
- विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी राबवला होता पोलीस आपल्या दारी उपक्रम
- शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक
- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील घटना
- शेतकरी माणिक अंकुश काळे यांनी घराजवळील शेतामध्ये वाळत घातलेली 20 क्विंटल तूर चोरी
- श्रीगोंदा तालुक्यातून तीन जणांना अटक केली आहे तर चार जण फरार झाले आहे.
- आरोपींकडून चोरी केलेली तूर आणि एक मालवाहू टेम्पो असा एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कर्जत आणि भिवपूरी रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड
तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा खंडित
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती
नाशिक - पालकमंत्री पदाचा वाद, नाशिकच्या विकासकामांना खीळ
- महायुतीतील घटक पक्षांच्या वादाचा फटका शहरातील विकास कामांना
- आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतरी
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची हजारो कोटींची अत्यावश्यक कामं पालकमंत्री पदाच्या गोंधळामुळे ठप्प
- तर जिल्हा नियोजन समितीच्या १३२१ कोटींचा निधी बैठकी अभावी अधांतरी
- पालकमंत्री वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडल्याने विकासकामांना ब्रेक
- मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण? याबाबत निश्चिती नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.