Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रिपदाचा दर्जा

Priya More

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रिपदाचा दर्जा

मराठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे - राज ठाकरे

हिंगोली भाजप आमदार तानाजी मुटकुळे याना हृदयविकाराचा त्रास, संभाजीनगरात उपचारासाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाली आहे, तब्येत स्थिर आहे.

शरद पवारांना टोला

चार वेळा आपण मुख्यमंत्री होतात त्यावेळी का केले नाही? आता निवडणुकीचे तोंडावर असे सांगता. हे पहिले तुम्हाला का सुचले नाही. जर सुचले असते तर आरक्षणाचा मुद्दा तेव्हाच मार्गी लागला असता.
संजय शिरसाठ

Sangli News: राज्यात 10 आक्टोंबरनंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार - शरद पवार

10 ऑक्टोंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल,असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलय,तसेच आचारसंहिता 10 ऑक्टोबरला लागल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही,असे देखील स्पष्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन आपल्यावर आणि उद्धव ठाकरेंवरच बोलतात,पक्ष फोडण्याची भाषा करतात,गृहमंत्री म्हणून ते अशी भाषा वापरतात,अशी टीका देखील शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर केली,सांगलीच्या मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या नूतन इमारीचे इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Dhule News: 

धुळ्यात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्मारक समिती व धुळे महानगरपालिकेच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील पहिले 30 फुटी संभाजी राजे स्मारकाचे नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे, यावेळी धुळे शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे,

धुळे शाळेतील पांझरा नदी काठावर असलेल्या संभाजी महाराज उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला असून, याठिकाणी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघावयास मिळाली आहे...

Kolhapur News: राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळं काँग्रेसला बळ मिळेल - सतेज पाटील 

राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळं काँग्रेसला बळ मिळेल

सतेज पाटील यांचे वक्तव्य

महाविकास आघाडीला बळ मिळेल

लोकसभा निवडणुकीत सामान्य माणूस आमच्या बरोबर होता

आताही विधानसभा निवडणुकीत तो आमच्याबरोबर राहिल

Nashik News: नाशिकमध्ये इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या दोन गटांमध्ये गोंधळ

नाशिकमध्ये इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान श्रीरामपूर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये गोंधळ

काँग्रेसच्या दोन गटांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात घोषणाबाजी करणे योग्य नाही

आमदार लहू कानडे यांचे वक्तव्य

Nashik News: नाशिकमध्ये ओबीसी नेते श्रावण देवरे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नाशिकमध्ये ओबीसी नेते श्रावण देवरे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने श्रावण देवरे यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उपनगर पोलिसांनी राहत्या घरातून श्रावण देवरे यांना घेतलं ताब्यात

मराठा आंदोलन श्रावण देवरे यांच्या घरी पोहोचण्याआधीच पोलिसांनी श्रावण देवरे यांना घेतलं ताब्यात

Nagpur News: केंद्रीय मंत्री किरण रिजुजी यांनी दीक्षाभूमीला दिली भेट

केंद्रीय मंत्री किरण रिजुजी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींकलेश याना अभिवादन

तथागत गौतम बुद्ध यांच्यासमोर नतमस्तक झाले

दीक्षाभूमी संदर्भात माहिती सुद्धा जाणून घेतली

Political News: आचारसंहितेच्या आधीच १२ आमदारांच्या नेमणुकीबाबत होणार अंतिम निर्णय

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नेमणूक प्रकरण

आचारसंहितेच्या आधीच १२ आमदारांच्या बाबत होणार अंतीम निर्णय.

गेल्या साडे ४ वर्षांपासून १२ आमदारांच्या नेमणूकीवरून जोरदार राजकारण.

निवडणूक जाहिर होण्यापूर्वीच महायुतीकडून यावर होणार निर्णय.

महायुतीत जागावाटपात कठीण असणार्या १२ जागांची बंडखोरी रोखण्यासाठी या आमदारांची नेमणूकीचा रामबाण उपाय.

अपघात झालेल्या वाहनात मी नव्हतोच: मंत्री संजय राठोड

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला पहाटे दरम्यान कोपरा येथे अपघात झाला. या संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवून त्यात अपघात झालेल्या वाहनात मी नव्हतो आणि मी पूर्ण पणे सुखरूप आहे. ज्या वाहनाचा अपघात झाला. त्यात आपण नव्हतो, असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असल्याने दुसऱ्या वाहनाने प्रवास करीत होतो,असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.या अपघाताची चौकशी करण्यात येणार असून, खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी यवतमाळ पाठविण्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराजांच्या दोन्ही हातात दोन शस्त्र असणारा हा देशातला पहिला पुतळा

कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. याचे अनावरण आज सायंकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही हातांमध्ये दोन शस्त्र या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये दाखवण्यात आलेली आहेत. महाराजांच्या दोन्ही हातात दोन शस्त्र असणारा हा देशातला पहिला पुतळा असणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी साम टीव्ही सोबत बोलताना दिलेली आहे.

शरद पवार अभ्यासू नेते आहेत. त्यांनी याबद्दल अभ्यास केला असणार. आरक्षण मर्यादा वाढवली तर आनंदच पण ते कोर्टात देखील टिकायला हवं
हिरामण खोसकर

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षातील प्रवेश देखील खडतर ठरण्याची शक्यता

कोणत्याही अटी किंवा शर्तीशिवाय पक्षात प्रवेश करण्याची राष्ट्रवादी कॅाग्रेसची हर्षवर्धन पाटील यांना अट घालण्यात आली.

- ⁠इंदापुर मधून विधानसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन नाही

- ⁠तुम्हाला पक्षात यायचे आहे, त्यामुळे तुम्हीच पक्षात येणार असल्याचे जाहीर करा. राष्ट्रवादीची हर्षवर्धन पाटील यांना सुचना.

अरबी समुद्रात जाऊन संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम व सरचिटणीस धनंजय जाधव यांनी आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणी केली.

SSC Exam : सोमवारपासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास येत्या सोमवारपासून सुरवात होणार आहे.

दहावीची परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकामध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू - शरद पवार

मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकामध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही. 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे..तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही? 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही.
शरद पवार

Nashik  : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष

- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष

- नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष

- ढोल ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष

- शिवसैनिकांनी पेढे वाटून साजरा केला आनंद

- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे मानले आशीर्वाद

Maharashtra Politics : संदीप नाईक यांना पदावरून काढण्याची मागणी.

भाजपच्या माजी नगरसेवकाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना पदावरून काढण्याची मागणी.

संदीप नाईक यांच्याकडून वारंवार त्रास देण्यात येत असल्याचा केला आरोप.

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या ऐवजी सर्वसमावेशक जिल्हाध्यक्ष द्या.

माजी नगरसेवक भरत जाधव यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी.

संदीप नाईक यांच्या उमेदवारीला देखील विरोध करत संदीप नाईकांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचा दिला इशारा.

नवी मुंबई भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर.

MIM चा मविआला 28 जागांसाठीचा प्रस्ताव,

गेल्या दोन महिन्यांपासून MIM पक्ष हा महाविकास आघाडी बरोबर येण्यासाठी इच्छुक आहे, असं प्रसार माध्यमाद्वारे ऑफर देणाऱ्या एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आता महाविकास आघाडीकडे 28 जागांसाठीचा प्रस्ताव दिला आहे अशी चर्चा आहे.

Indapur News: इंदापूर शहरातील भाजप कार्यालयाचे पोस्टर काढले

इंदापूर शहरातील भाजप कार्यालयाचे पोस्टर काढले

मोदी, शहा, फडणवीस बावनकुळे यांचे फोटो हटविले

काल रातोरात शहरातील भाजप कार्यालयाचे सर्व फोटो व फ्रेम काढून टाकल्या

आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांची भूमिका मांडणार

पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार

Mumbai News: कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल.

३० जणांविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बुक माय शो च्या तक्रारीवर करण्यात आला गुन्हा दाखल.

संशयितांची नाव, मोबाईल क्रमांक, त्यांच्या संकेतस्थळांची तसेच समाज मध्यमांवरील खात्यांची माहिती केली बुक माय शो ने पोलिसांकडे सुपूर्द.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Chavan News: 'मलाही जिवंत ठेवा, मी संपलो तर...', अशोक चव्हाण यांच्या विधानाने खळबळ

Breaking News : आदिवासी आंदोलन पेटलं; आमदारांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Muktainagar News : जेवणाचा डबा घेऊन शेतात गेलेल्या मुलाने वडिलांना पाहून फोडला हंबरडा; तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Harshvardhan Patil: फडणवीसांचा प्रस्ताव, शरद पवारांची ऑफर, भाजप सोडताना पाटील काय काय म्हणाले?

VIDEO : शरद पवारांच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT