Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: पुण्यात राहुल गांधी करणार रोड शो

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 27 October 2024: आज रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीचा जागावाटप निर्णय आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune News: पुण्यात राहुल गांधी करणार रोड शो

पुण्यात राहुल गांधी करणार रोड शो

पुणे काँग्रेस कडून राहुल गांधींना पत्र

पुण्यातील मविआ उमेदवारांसाठी एकत्रित राहुल गांधीचा होणार रोड शो

राहुल गांधींची सभा होणार नाही

रोड शोची तारीख लवकरच होणार निश्चित

बाईट अरविंद शिंदे शहराध्यक्ष काँग्रेस

Mumbai News: शशिकांत खेडेकरांनी घेतली अजित पवारांची भेट, सिंदखेडराजा विधानसभेसाठी इच्छुक

शशिकांत खेडेकरांनी घेतली अजित पवारांची भेट, सिंदखेडराजा विधानसभेसाठी इच्छुक

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकमेव सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता.

या मतदारसंघासाठी महायुतीमध्ये अनेक इच्छुक, पण शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा

Mumbai News: काँग्रेसने लाडक्या बहिणीसह निष्ठावंत नेत्यांवर केला अन्याय - राजेश क्षीरसागर

महायुतीतील सर्व नेत्यांच्या सहकार्यामुळे उत्तर मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झाली

भाजपचे खासदार धनंजय महाडिक माझे प्रचार प्रमुख असतील ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट

काँग्रेसने लाडक्या बहिणीसह निष्ठावंत नेत्यांवर केला अन्याय

काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे ऐवजी काँग्रेसने तिसऱ्याच उमेदवाराला संधी देऊन ओढवून घेतली नाराजी

महायुतीचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची टीका

Ratnagiri News: रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उलथापालथीला वेग

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उलथापालथीला वेग

अखेरच्या क्षणी उमेदवारी न मिळाल्याने उदय बने नाराज

उदय बने सध्या शांततेच्या भुमिकेत, 30 आँक्टोबरला भुमिका जाहिर करणार

उदय बने उद्धव ठाकरे सेनेकडून रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख दावेदार

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून भाजपातून उद्धव ठाकरे गटात आलेले बाळ माने महाविकास आघाडीचे उमेदवार

उदय बने उद्धव ठाकरे गटाशी 45 वर्ष एकनिष्ठ, शांत आणि संयम ठेवत भुमिका जाहिर करणार

Mumbai News:  सोनिया दुहान राष्ट्रवादी कॅाग्रेस कार्यालयात

सोनिया दुहान राष्ट्रवादी कॅाग्रेस कार्यालयात

अजित पवार आणि सोनिया दुहान यांच्यात चर्चा सुरू

सोनिया दुहान यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता कॅाग्रेसमध्ये प्रवेश

Mumbai News: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतरही झीशान सिद्दिकीची सुरक्षा टांगणीला

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतरही मुलगा झीशान सिद्दिकीची सुरक्षा अजूनही टांगणीला

झीशानच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिस सुरक्षारक्षकाला करण्यात आल निलंबन

कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने पोलिस सुरक्षारक्षक विशाल ठाणगे निलंबित

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर दुसऱ्या पोलिस अंमलदाराचे निलंबन

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झीशानच्या सुरक्षेत करण्यात आली होती वाढ

मात्र सुरक्षे संदर्भात झीशानने केली होती पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

पोलीस उपायुक्तांनी अकस्मात पडताळणी केली असता सुरक्षा रक्षक कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित

१२ ऑक्टोबर खेरवाडी परिसरात बाबा सिद्धीक यांची गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या

हत्येवेळी बाबा सिद्दिकी यांचा पोलीस सुरक्षा रक्षक श्याम सोनवणे याचे देखील करण्यात आला आहे निलंबन

Nashik News: निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी

नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास

- भाजपाचे यतीन कदम यांनी देखील या जागेवर दावा करत घेतली होती अजित पवार यांची भेट

- गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत सुरू होत्या चर्चा

Pune News: पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वय बैठक राष्ट्रवादी कार्यालयात सुरू

पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वय बैठक राष्ट्रवादी कार्यालयात सुरू

बैठकीला महाविकास आघाडीतील पक्षाचे शहराध्यक्ष उपस्थित

उमेदवार ठरल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची नाराजी

नाराजीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

महविकास आघाडीचे अनेक उमेदवार देखील बैठकीला उपस्थित

विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन

Satara News:  फलटणची जागा महायुतीत अजित पवार गट लढवणार

फलटणची जागा महायुतीत अजित पवार गट लढवणार

दीपक चव्हाण यांच्या विरोधात भाजपकडून सचिन कांबळे इच्छुक होते

मात्र जागा अजित पवार गटाला गेल्याने सचिन कांबळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

राष्ट्रवादीकडून भाजपला तसा प्रस्ताव

फलटणची जागा महायुतीत अजित पवार गटच लढणार

दोन दिवसापूर्वी रणजित निंबाळकर आणि अजित पवार यांच्यात झाली बैठक

अजून फलटणच्या जागेचा तिढा सुटलेला नाही

Mumbai News: भाजप नेते सत्यजित कदम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

भाजप नेते सत्यजित कदम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

सत्यजित कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

कोल्हापूर उत्तर साठी शिवसेने कडून अनेक घडामोडींना वेग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ही उपस्थित

राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार

Pune News: पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कोट्यवधींचा गुटखा जप्त

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर कोट्यवधींचा गुटखा जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडला गुटख्याचा साठा

एक कोटी पाच लाख रुपयांचा गुटखा असल्याची माहिती

जवळपास दोनशेच्या वर गुटक्याचे पोती करण्यात आली आहेत जप्त

पुणे- बेंगलोर महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्याजवळ चेक पोस्ट दरम्यान तपासणीत सापडला गुटख्याचा ट्रक

ट्रक मधील दोघांना राजगड पोलिसांनी घेतलं ताब्यात

MH 05 DK 1867 क्रमांकाचा ट्रक गुटखा घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना आज पहाटे पकडण्यात आला

Pune News: भाजपा - शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून तणाव

भाजपा - शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून तणाव

शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे बंडखोरी करणार

खडकवासला विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार बंडखोरी करणार

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही रमेश कोंडें मागे हटायला तयार नाहीत

Pune News:  पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वय बैठक

पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वय बैठक

बैठकीला महाविकास आघाडीतील पक्षाचे शहराध्यक्ष राहणार उपस्थित

उमेदवार ठरल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची नाराजी

नाराजीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

शहरातील काही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी पुकारला आहे बंड

बंडाचा फटका महाविकास आघाडीला बसू नये म्हणून घेण्यात येत आहे समन्वय बैठक

Pune News: इच्छुक उमेदवार संभाजी झेंडे हे अजित पवार यांच्या भेटीला

पुरंदर विधानसभेतून माविआ मधून इच्छुक उमेदवार असलेले संभाजी झेंडे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात आले आहेत

पुरंदर विधानसभेतून मावीआ मधून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नाराज असलेले संभाजी झेंडे हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पक्ष कार्यालयात आले आहेत

महायुतीमधून संभाजी झेंडे हे आत्ता निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत

Pune News: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांची डोकेदुखी वाढली

कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ

रवींद्र धंगेकरांची डोकेदुखी वाढली

माजी महापौर कमल व्यवहारे यांचे पत्रक कसबा मतदारसंघात व्हायरल

माझ्या माणसांसाठी संघर्ष करणारं म्हणत व्यवहारे विधानसभेच्या रिंगणात

Pune News: पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा

पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा

औंध बाणेर रोडवरील दुकान फोडत चोरट्यांकडून डल्ला

चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर

चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती

पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

Mmbai News: "कोल्ड प्ले" प्रकरणी ईडीचे धाडसत्र, १३ ठिकाणी छापेमारी

"कोल्ड प्ले" आणि दिलजित कन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे धाडसत्र

एकूण १३ ठिकाणी ईडीचे टाकले छापे

मुंबई, दिल्ली, जयपूर , चंदिगढ आणि बंगळुरू येथे ईडीच्या धाडी

तिकिटांच्या काळा बाजारासाठी सोशल मीडियाचा वापर झाल्याच समोर

Ahmednagar News: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज संगमनेरला जाणार

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज संगमनेरला जाणार

संगमनेरमध्ये भाजपकडून निषेध आंदोलन

धांदरफळ येथील सुजय विखे पाटील यांच्या सभेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्याचा आरोप

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अंतिम यादी आज जाहीर होणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अंतिम यादी आज जाहीर होण्याची शक्यता

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी १२ वाजेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार उमेदवार

आजच्या यादीत जवळपास १८ उमेदवारांच्या नावांची होऊ शकते घोषणा

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांची फरफट

अमरावती जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांची फरफट

मुंबई -दिल्ली वारी करून दोन्ही आमदार थकले

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीने उमेदवारी नाकारली

वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनाही महायुतीने उमेदवारी नाकारली

आमदार देवेंद्र भुयार व आमदार राजकुमार पटेल यांना अपक्ष उभं राहण्याची वेळ

Amravati News: महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

वरुड-मोर्शी मतदारसंघातून आमदार देवेंद्र भुयार पुन्हा लढवतील अपक्ष निवडणूक

आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जोरदार झटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Skincare : दिवाळीत सुंदर दिसणे पडू शकते महागात; मेकअपमुळे होणाऱ्या स्किन प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Beed Assembly Election: इकडे विधानसभेची रणधुमाळी, तिकडे बीडमध्ये भाजपला गळती, महायुतीचं टेन्शन वाढलं!

NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच

Vastu Tips: घरातील 'या' दिशेला लावा मनी प्लांट, होईल धनलाभ

Weight Loss : जीम, डाएट सोडा... फक्त पाणी पिऊन कमी करू शकता वजन; पाहा कसं

SCROLL FOR NEXT