Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 24 October 2024: आज गुरूवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीचा जागावाटप निर्णय यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ ६ महिन्यांचा असेल.

कसबा मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी

पुण्यात एकमेव उमेदवार जाहीर करण्यात आलाय.

पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचा पराभव केला होता.

नागपुरात श्याम मानव यांच्या सभेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली

26 ऑक्टोबर रोजी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र अंतर्गत सूर्यनगर लॉन येथे श्याम मानव यांची सभा होणार होती. संविधान बचाव महाराष्ट्र बचाओ या मोहिमेअंतर्गत ही सभा होणार होती. या सभेसाठी श्याम मानव यांच्या कार्यकर्त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अर्ज केले होते. मात्र या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते असा कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे.

सोलापूर शहराच्या उत्तरमधून शरद पवार गटाकडून महेश कोठे यांना उमेदवारी

सोलापूर शहर उत्तरमधून शरद पवार गटाकडून महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. महेश कोठे यांना उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय. शरद पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केले. अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांनी मला शहर उत्तरच्या उमेदवारीबाबत शब्द दिला होता तो त्यांनी पाळला.

मागील वीस वर्षापासून विजयकुमार देशमुख यांना मोठी पद मिळाली मात्र त्याचा उपयोग त्यांनी सोलापूरसाठी केला नाही. विजयकुमार देशमुख हे पाच खात्याचे मंत्री राहिले मात्र त्याचा सोलापूरला उपयोग केला नाही. मालक मालकच राहिले मात्र जनतेला मालक केले नाही. सोलापूरला मालकाची नव्हे तर चालकाची गरज आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांनी भाजप आमदारावर केलीय.

शिवसेनेचे महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता

हडपसर विधानसभा मतदारसंघातून महादेव बाबर अपक्ष लढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महादेव बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महादेव बाबर यांची उमेदवारी जाहीर होईल, असं सांगितलं होतं. मात्र आज जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची हडपसरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातून आघाडीमध्ये बिघाडी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मावळ मध्ये 17 लाख 75 हजार रोकड जप्त

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मावळ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळच्या शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात कारमधून 17 लाख 75 हजार रोकड जप्त केली. खोपोली कडून पुण्याला जात असलेल्या कारची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH-12,UC-5535 मध्ये रोकड सापडली आहे. कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम सदानंद आर करलू ,डी सी आय टी , आयकर विभागाकडे पुणे पुढील कार्यवाहिस हस्तांतरित करण्यात आली आहे.

मविआत वाद? धुळ्यात समाजवादी पार्टी आणि ठाकरे गट शिवसेनेत उमेदवारीवरून पेच कायम

समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जाहीरदार यांच्याकडे देखील पक्षाचा एबी फॉर्म असल्याचा दावा, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांचा देखील ठाकरे गटातर्फे एबी फॉर्म दिल्याचा दावा करण्यात आलाय. माजी आमदार अनिल गोटे यांना ठाकरे गट शिवसेनेतर्फे दिलेला एबी फॉर्म शेवटच्या घटकाला थांबविण्यात येऊन महाविकास आघाडी तर्फे समाजवादी पार्टीला उमेदवारी दिली जाण्याचा समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांना विश्वास आहे.

Raigad News : विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात नवीन ट्विस्ट; ठाकरे गटाने अलिबागमध्ये दिला उमेदवार

विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट अलिबागची जागा लढवणार आहे. ठाकरे गटाने अलिबागमधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Rajesh Tope News : राजेश टोपेंचं शक्तिप्रदर्शन, घनसावंगीतून उमेदवारी अर्ज भरला

Rajesh Tope From ghansawangi : जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांच्याकडून सहाव्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी राजेश टोपे यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. टोपेंनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केले आहे. टोपे यांनी सहाव्यांदा उमेदवारी अर्ज भरलाय. खासदार अमोल कोल्हे, संजय जाधव आणि डॉ. कल्याण काळे हे यावेळी उपस्थित होते.

BJP vs NCP : भाजप-राष्ट्रवादीत जोरदार चुरस, ते तीन मतदारसंघ कोणते?

नवी दिल्ली - तीन मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) यांच्यात जोरदार चुरस

तीन मतदारसंघांवरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच

तिन्ही मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळवण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

आष्टी, वडगाव शेरी आणि तासगाव या मतदारसंघांसाठी चढाओढ

अद्यापपर्यंत या तिन्ही जागांवरील निर्णय नाहीच, पेच वाढला

Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे ६ वर्षांसाठी निलंबन

Maval Politics : मावळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे निलंबन करण्यात आले. पक्षाची शिस्त न पाळल्याने त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

Jayant Patil :  शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

शेकापचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे अध्यक्ष शरद पवार यांची थोड्याच वेळात भेट घेणार

घटकपक्षांबरोबर महाविकास आघाडीची चर्चा

सांगोल्याची जागा शेकापची असताना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर झाल्यानं वाद

शिवडीतून अजय चौधरींना उमेदवारी फायनल

शिवडीतून अजय चौधरींना उमेदवारी फायनल झाली आहे. यामुळे या मतदारसंघात सुधीर साळवींचा पत्ता कट झाला आहे.

Mahayuti : महायुतीत काही जागांवर अजूनही पेच कायम

महायुतीच्या बैठकीत तिढा असलेल्या अनेक जागांवर एकमत झालं आहे. तर काही जागांवर अजूनही पेच कायम आहे. साधारणतः 5-8 जागांवर आज एकमत होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईत एकमत न झालेल्या जागांवर शेवटी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीत जागावाटपांचा तिढा सोडवण्यासाठी काही जागांची अदलाबदल होणार?

जागावाटपांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतील घटकपक्ष काही जागांची अदलाबदल करण्याची शक्यता आहे. भाजप काही जागा राष्ट्रवादीला सोडणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील २०१९ ला शिवसेनेने लढलेल्या काही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडणार आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra News Live Updates: अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार

अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार

मात्र अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' असा मजकूर लिहावा लागणार

अजित पवार यांना शरद पवार यांनी दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर द्यावं लागणार प्रतिज्ञा पत्र

6 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

काँग्रेस नेते आबा बागुलांनी दाखल केला पर्वती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

काँग्रेस नेते आबा बागुलांनी दाखल केला पर्वती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

बागुल काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अपक्ष असेच एकूण तीन अर्ज बागुल यांच्याकडून दाखल करण्यात आले.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून अद्याप पर्वतीमध्ये कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असणारा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेण्यासाठी आग्रही

आपल्याला उमेदवारी मिळण्याचा विश्वास असून आज गुरुपुष्पामृत मुहूर्त असल्याने उमेदवारी दाखल केल्याचा आबा बागुल यांच्याकडून स्पष्ट

अविनाश जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणि पोहचले आहेत.अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे आले आहेत

PM Modi Sabha Maharashtra: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा

5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान यांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विभागवार सभा

फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

पंतप्रधान 14 नोव्हेंबर नंतर परदेश दौऱ्यावर असल्याने सभांना मिळणार कमी कालावधी

Nagpur News: अजित पवार गटात बंडखोरी, लाडक्या बहिणीने भरला अपक्ष अर्ज

'दादा' च्या लाडक्या बहिकडून महाराष्ट्रातील पहिली बंडखोरी नागपूरातून

अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूरतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत केली बंडखोरीची घोषणा...

आभा पांडे या महिला आयोगाच्या सदस्य आहे, माजी नगरसेविका आहे.

भाजपकडून पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात कृष्णा खोपडे हे चौथ्यांदा उमेदवारी जाहीर केलीय.

तेच उमेदवारी अर्ज दाखल करत काहीही झाले तरी नामांकन अर्ज मागे घेणार नाही म्हणी बंडखोरी कायम राहिल असेही केले स्पष्ट...

Madha Assembly Election:  आमदार बबन शिंदेच्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल

माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अजून सुटला नाही. अशातच अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आज अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माढ्यात अजून कुठल्याच पक्षांनी उमेदवारी जाहीर केली नसताना आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे.

MLA Santosh Bangar News: हिंगोलीत संतोष बांगर यांचे मोठे शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे, यावेळी संतोष बांगर यांनी मतदार संघातील लाखो नागरिकांना सोबत घेत रॅली चे आयोजन केले होते.

Anil Gote Join Shivsena: अनिल गोटे यांच्या हाती शिवबंधन, उमेदवारीही जाहीर

अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा प्रवेश संपन्न

अनिल गोटे यांच्या हाती शिवबंधन

अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी जाहीर, उद्धव ठाकरेंनी एबी फॅार्म सुपुर्द केला

‘मी तुम्हाला उमेदवार देतो तुम्ही मला आमदार द्या’, उद्धव ठाकरेंचं अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन

Pankaja Munde Dhananjay Munde News: पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणी सोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार नसणार आहे. यावर प्रकाश महाजन यांनी आजचा दिवस दुर्दैवी असल्याचं विधान केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत ज्या कमळाने येथे सुरुवात झाली असं वाटणं वेगळी गोष्ट आहे. ते मुंबईतून म्हणाले आहेत. त्यावर मी टिपण्णी करणार नाही म्हणत यावर बोलणं टाळले आहे.

Sangli News: सांगलीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,  व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने महामार्ग रोखला

सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आज पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याने आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला कांदा महामार्गावर फेकला. बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल अडीच ते पाच हजार रुपये इतकं दर खाली पाडला आहे.

वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने आज शेतकरी आक्रमक झाले. यावेळी तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील बाजार समिती मध्ये जाणूनबुजून व्यापाऱ्यांकडून कांद्याचे दर पाडले जात आहेत. इतर जिल्ह्यात दर चांगले मिळत असताना सांगली जिल्ह्यात मात्र व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

Nandurbar News:  भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी भरला उमेदवारी अर्ज

नंदुरबार जिल्ह्यात आज विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी पाहण्यास मिळाली शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना राजेंद्र गावित यांनी शहरातील मुख्य भागातून रॅली काढत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच वर्षात विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असून विरोधकांकडे आपल्या विरोधात मुद्दे नसून अजूनही विरोधकांनी उमेदवार जाहीर न केल्याने आपला विजय निश्चित असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले आहे

Maharashtra Politics: चंद्रकांत पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केली उमेदवारी

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज गुरुपुष्य योग मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर तहसील कार्यालयात जाऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी कुलदेवतेचा आशीर्वाद घेवून परिवाराने औक्षण करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.

महायुतीचा उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो नक्कीच मी सार्थ ठरवून मोठ्या मताधिक्याने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला, माझ्या विरोधकांना अजून पर्यंत एबी फॉर्म मिळाला मिळाला नाही असा टोला मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना यावेळी बोलताना लावला आहे,

Mumbai News: मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची निवडणूक मार्गदर्शन सभा 

सकल मराठा समाज मुंबई, मराठा क्रांती मोर्चा मुंबई आयोजित निवडणूक मार्गदर्शन सभा

आज दादरच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सायंकाळी ६ वाजता मार्गदर्शक सभा

मुंबईतील ३६ विधानसभेतील इच्छुक उमेदवारांना मुंबई मराठा समाजाच्या साक्षीने उमेदवारांना विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन

संपूर्ण यादी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कडे देण्यात येणार

उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार

Indapur Politics: इंदापुरात तिरंगी लढत,  हर्षवर्धन पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

इंदापूर विधानसभेची पंचवार्षिक निवडणुकीला वेग आला असून काल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातील बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज अधिकृत उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली तसेच जोरदार शक्ती प्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

इंदापुरात तिरंगी सामना रंगणार असून यामध्ये शरदचंद्र पवार पक्षातील हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत इंदापूर अंतरंगी सामना लढणार आहे

 Mumbai News: महायुतीतही शिवडी विधानसभेचा तिढा कायम

महायुतीतही शिवडी विधानसभेचा तिढा कायम

शिंदेच्या शिवसेनेकडे शिवडीत कुठलाही बडा चेहरा नसल्याने भाजपचा शिवडी विधानसभा मतदार संघावर दावा

शिवडी विधानसभेतून भाजपमधून गोपाळ दळवींच्या नावाची चर्चा

Pune News: शरद पवार गटाच्या पुणे जिल्ह्यातील जागांची घोषणा होण्याची शक्यता

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वाची पत्रकार परिषद

पुणे जिल्ह्यातील जागांची घोषणा होण्याची शक्यता

पुण्यातील हडपसरची घोषणा करण्याची शक्यता

संध्याकाळी पाच वाजता जयंत पाटलांचे पत्रकार परिषद

Delhi News: आपचे नेते अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार

आपचे नेते अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार

शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी प्रचार करणार

दोन्ही पक्षांकडून अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क

झारखंडमध्येही अरविंद केजरीवाल प्रचार करणार

अरविंद केजरीवाल यांच्या विभागवार जाहीर सभा होणार

सूत्रांची माहिती

Ratnagiri News: राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंतांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

किरण सामंत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा

किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सामंत हे देखील उपस्थित राहणार

किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून किरण सामंत कार्यकर्ता मेळाव्यात

Dombivli News: डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद यांचा राजीनामा

डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद यांचा राजीनामा

पक्षश्रेष्ठीवर गंभीर आरोप..व्यवहाराने निष्ठेवर मात केली या भाषेत पक्षश्रेष्ठीवर टीका

दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने जिल्हाप्रमुख सदानंद थळवळ व कार्यकर्ते नाराज

तर दुसरीकडे कल्याण ग्रामीण विधानसभेत सुभाष भोईर यांना उमेदवारी दिल्याने दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे देखील नाराज

रोहिदास मुंडे यांनी घेतली थरवळ यांची भेट

Nashik News: समीर भुजबळ यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

समीर भुजबळ यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

आज संध्याकाळी मनमाड मध्ये समीर भुजबळ यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

नांदगावमधून उमेदवारी करण्यासंदर्भात बैठक

बैठकीतील चर्चेनंतर समीर भुजबळ निर्णय जाहीर करणार

नांदगावमधून लढण्यासंदर्भातला निर्णय आज संध्याकाळी समीर भुजबळ जाहीर करणार

Mumbai News:  काँग्रेस नेते आज रात्री दिल्लीला रवाना होणार

काँग्रेस नेते आज रात्री दिल्लीला रवाना होणार

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही

हा तिढा दिल्लीत हाय कमांड सोबत बसून सोडवला जाणार

आज रात्री सर्व नेते दिल्लीसाठी रवाना होणार

उद्या सकाळी 11 वाजता बैठक पार पडेल

Delhi News: आज महायुतीचा जागा वाटप निर्णयावर शिक्कामोर्तब होणार

आज महायुतीचा जागा वाटप निर्णयावर शिक्कामोर्तब होणार

आजची दिल्लीची बैठक शेवटची बैठक

आज सर्व जागावाटप ठरणार

सर्व तिढा आज सुटणार

आज अमित शहा जागावाटप संदर्भात घेणार शेवटचा निर्णय

आजच महायुतीची सर्व उमेदवार यादी होणार जाहीर .

Kalyan News: सुलभा गायकवाड यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुलभा गायकवाड यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे

फडणवीत दिल्लीत असल्याकारणाने येऊ शकले नाहीत

महायुतीत कोणतीही बंडखोरी होणार नाही

विनोद तावडे यांनी व्यक्त केला विश्वास

Delhi News: दिल्लीत खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक

दिल्लीत खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक

आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक

राष्ट्रवादीच्या वाट्याचा आष्टी, मोर्शी, वडगाव शेरी या जागांबाबत चर्चा होईल

Beed News: धनंजय मुंडे उमेदवारी अर्ज भरणार, प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक

धनंजय मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक

वैद्यनाथाचा अभिषेक, आरती करत घातलं विजयाचं साकडं

काही वेळात धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडे यांच्या समवेत करणार उमेदवारी अर्ज दाखल

Pune News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आज पुण्यात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आज पुण्यात

पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार

टिळक स्मारक मंदिरात होणार कार्यक्रम

Ratnagiri News: शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार

शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार

शक्तीप्रदर्शन करत करणार उमेदवारी अर्ज दाखल

आपण आमदारकीच्या विजयाचा चौकार मारणारच असल्याचा राजन साळवी यांचा विश्वास

Nashik News: छगन भुजबळ भरणार उमेदवारी अर्ज, सिद्धिविनायकाचे घेतलं दर्शन

छगन भुजबळ येवला तालुक्यातील सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले

थोड्याच वेळात येवला तहसील कार्यालयात भरणार उमेदवारी अर्ज

देशमाने गावातील गणपती मंदिरात घेतलं दर्शन

उमेदवारी अर्ज भरण्याआधी घेतला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद

छगन भुजबळ यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा

Mumbai News:  शिवडी मतदारसंघाबद्दल सस्पेन्स कायम, उद्धव ठाकरे घेणार निर्णय

शिवडी मतदार संघाबद्दल सस्पेन्स कायम

गेले ३ दिवस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवडी येथील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, शाखा प्रमुखांशी केली बातचीत

आज कामगार सेना, युवासेना महत्त्वाचे पदाधिकारी यांची मातोश्रीवर होईल बैठक...

शिवडीबाबत अनेक बैठकानंतर उद्धव ठाकरे घेतील निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT