विवेकानंद गार्डन परिसरात गॅस पाईपलाईन फुटलीय. परिसरात हवेच्या प्रेशरचा मोठा आवाज आला. गॅसचा उग्र द्रव पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. महानगर कंपनीने गॅस गळती बंद केली आहे.
चंदीगडमध्ये उद्या NDA शासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद होणार आहे. पंतप्रधान मोदी परिषदेला करणार संबोधित करणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता होणार महत्त्वपूर्ण परिषद आहे. राष्ट्रीय विकास हा परिषदेत अजेंडा राहणार आहे. NDA शासित 20 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेही परिषदेत सहभागी होणार आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा राजनाथ सिंह यांच्यासह मोठे नेते परिषदेत सहभाग घेणार आहेत.
शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा झाली आहे. ज्योती मेटे ह्या बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.
रूपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. पुण्यातील धायरी भागात त्यांच्या कार्यालयाच्या जवळ कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशे वाजवत मुंबईहून आलेल्या रूपाली चाकणकर यांचे स्वागत करण्यात आले.
हरियाणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान हरयाणा मुख्यमंत्री शपथविधी कोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात विधान सभा निवडणुक मतदारसंघ जागावाटप संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देश बचाओ, संविधान बचाओ या व्याख्यान कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय.
उद्या दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्या चंदिगढ येथे अमित शाह यांच्यसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. उद्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असल्याने दोन्ही नेते तिथेच अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून महामंडळाचे वाटप
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर दिलीप कांबळे यांची निवड
प्रशांत परिचारक यांना महाराष्ट्र राज्य सहकार पणन मंडळ
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेवर वासुदेव काळे यांची निवड
आमदार दत्तात्रय भरणे २५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दाखल करणार उमेदवारी अर्ज सकाळी अकरा वाजता इंदापूर शहरात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मविआत जोरात कामाला लागली असून जागा वाटपासंदर्भातील चर्चा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आता शरद पवार गटाकडून १९ ऑक्टोबर ला उमेदवरांची यादी जाहीर केली जाणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पार पडत आहे सायंकाळच्या सुमारास ही सभा या ठिकाणी पार पडत आहे मात्र अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे सभेच्या ठिकाणी एकाच तारांबळ उडाली आहे
रत्नागिरी - कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पावसामुळे भात शेतीच्या कामात अडथळा आलाय. मुसळधार पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. भात शेतीचं परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झालं आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहेत.
महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील जागांमध्ये शिवसेना ठाकरे गटच मोठा पक्ष असणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत अधिक जागा महाविकास आघाडीमध्ये येणार आहे. आज झालेल्या मुंबईच्या जागावाटपाच्या बैठकीत 36 पैकी 33 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचा एक मत झालं आहे.
आजच्या काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत 84 जागांवर चर्चा होणार आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 222 जागांच्या चर्चेत काँग्रेसला 84 जागा सुटल्या आहेत. बाकी राहिलेल्या जगांमधून आणखी काँग्रेसला जागा मिळणार, यावर 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या CEC बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
आमदार झिशान सिद्दिकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पहिल्यांदाच झीशान सिद्दिकी पोलीस आयुक्तालयात पोहोचले आहेत.
पुण्यातील हमाल भवन येथे डाव्या पुरोगामी प्रागतिक पक्षाचा मेळावा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यात महत्त्वाची भूमिका पक्षाकडून घेतली जाणार आहे. या मेळाव्याला शेकाप नेते जयंत पाटील, आमदार विनोद निकोले, आडम मास्टर, अशोक ढवळे मेळाव्याला उपस्थित आहेत. डावे नेते महाविकास आघाडीकडे 20 जागांची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले आहे. मागील 10 दिवसात 7 जणांच्या हत्या झाल्या आहेत. काल रात्री अमरावतीच्या चित्रा चौकात गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले. यावेळी शेकडो नागरिक सिटी कोतवाली पोलीस ठाण्यावर जमले.
मरावती शहरात हत्येच प्रमाण वाढलं आहे तर बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली होती यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्र व अमरावतीची गती अशी केव्हा झाली नव्हती, दिवसाला दोन मर्डर, भर चौकात मर्डर होत आहे,त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच फेलिव्हर आहे तर अमरावती मध्ये तर पोलिसांचा धाकच राहिला नाही, सत्तेतील आमदार पोलीस ठाण्यात खून खराबा करत त्यामुळे महाराष्ट्र यांना माफ करणार नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केला
महाविकास आघाडीचा जागावाटप याच आठवड्यात जाहीर करून उमेदवारांच्या नावा संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीतील पक्ष निर्णय घेणार
जागावाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण बैठका होणार
महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा असलेल्या चाळीसच्या जवळपास जागांवर पुन्हा एकदा बैठकांमध्ये चर्चा होणार
काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीत बैठकीसाठी जाणार असल्याने आज उद्या मध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या जागावाटपसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती
अधिकाधिक जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून पुढील दोन दिवसात प्रयत्न केला जाणार
या आठवड्यात महाविकास आघाडी कडून 200 ते 220 जागांचं जागा वाटप जाहीर केले जाणार असल्याची शक्यता आहे
निवडणूक मतदानाचा अवघे 35 दिवस राहिलेले असताना तातडीने जागावाटप जाहीर करून उमेदवारांच्या याद्या याच आठवड्यात महाविकास आघाडीचे पक्ष जाहीर करू शकतात
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी अवघे काही दिवस मिळालेले असताना लवकरात लवकर उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा महाविकास आघाडीतील पक्षांचा प्रयत्न
- बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
- आरोपीला 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
- दुसरे आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधून केली होती अटक
- आरोपीची ससून रुग्णालयामध्ये करण्यात येत आहे वैद्यकीय तपासणी
कोणत्याही प्रकारची योजना जाहीर केली की ती घोटाळ्यासाठी केली अशा पद्धतीचा विरोधक आरोप करतात.गिरीश महाजन
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार
पुण्यातील सर्व जलकेंद्रतील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक दुरूस्तीची कामे
संपुर्ण शहराला शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग या ठिकाणी दुरुस्तीचे कामं
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली माहिती
भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहे त्यांनी भाजप सोबत बंडखोरी केली..त्यामुळे या दोघांवरही कारवाई केली पाहिजे...रवि राणा
महाविकास आघाडीमध्ये ऐरोली मतदारसंघाचा तिढा सुटेना.
ऐरोली मतदार संघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही.
काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांच्यासाठी आग्रही तर शिवसेना उबाठा तर्फे एम के मढवी यांच्यासाठी माजी खासदार राजन विचारे आग्रही.
एम के मढवी यांची गुन्हेगारी पाश्वभूमी असेल्याने मविआ चे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मढवी च्या उमेदवारीला विरोध.
काँग्रेसच्या स्क्रिनिंग बैठकीत अनिकेत म्हात्रे यांच्या नावावर चर्चा.
अनिकेत म्हात्रे यांना ठाकरे गटात पाठवून उमेदवारी देण्यासंबंधी देखील काँग्रेस सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती.
रामदास पाटील सुमठानकर विधानसभा निवडणूक लढविणार
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
हिंगोली शहरात मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पाच वर्षे समन्वय ठेवला नसल्याने तसेच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने आमदार मूटकुळे यांचा विधानसभा निवडणुकीतील प्रवास अडचणीचा ठरणार असल्याने भाजप निर्णय घेण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत रामदास पाटील सुमठाणकर यांनी वरिष्ठांच्या विनंती वरून घेतली होती माघार
विदर्भातील भाजपचे तीन माजी आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्या संपर्कात. यासोबतच एका विद्यमान आमदारांचा मुलगाही जानकरांना भेटलाये. रासपमधील विश्वसनीय सूत्रांची माहिती. तिन्ही माजी आमदार पश्चिम विदर्भातील असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेच्या मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याने चौघांची जानकरांकडे चाचपणी. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जानकरांनी विधानसभेसाठी दिला 'एकला चलो रे'चा दिला नारा. राज्यातील 288 मतदार संघातील लढण्याची जानकरांची तयारी.
लाडकी बहीण योजना भविष्याचा विचार करुन आणली आहे. ही योजना बंद होणार आहे. यामध्ये वाढ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केला आहे. विज माफ, लाडकी बहीण यापुढेही सुरु राहील, असा विश्वास आम्ही देतोय, असे अजित पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..
त्यांच्यात कोण मुख्यमंत्री याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण? यातच गुंतून राहावे. आमचे नियोजन झालं आहे.छत्रपती संभाजी राजे
पुण्याला लागून असलेल्या निगडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये काल रात्री दोन मुलांनी एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि हा गुन्हा करून फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांची निगडी पोलिसांनी अटक केली आहे
वंदे मातरम ला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करतात आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच माणसाने एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. तुम्ही वंदे मातरम याला विरोध करणाऱ्याला आमदार केला, काय तुमची नियत असेल?संजय राऊत, शिवसेना(UBT)
अमित शहा आणि भाजप यांनी कोणताही त्याग केला नाही. अमित शहा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता, अमित शहा यांना शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला जातोय. त्यासाठी शिंदे यांचा वापर केला. त्याग आणि बलिदान हा शब्द भारतीय जनता पक्षाला शोभत नाही, हा अपमान आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितले त्याला त्याग नाही स्वार्थ बोलतात. बावनकुळे यांचा त्यात पहिला 50 कोटीची जमीन कवडीमोल गावात सरकारकडून ओढली आहे, हा त्याग का? शिंदे अजित पवार यांचा खेळ आहे, भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि हे सर्व माकडं आहेत, हे आता त्या तालावर माकडांना नाचवणार, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शाह आणि भाजपने कोणताही त्याग केला नाही. महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता. त्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. भाजप आणि नेत्यांना त्याग आणि बलिदान शब्द शोभत नाही.संजय राऊत, शिवसेना(UBT)
आज होणाऱ्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पत्रकार परिषद.
तिन्ही पक्षात तिढा नसणाऱ्या जागा पहिल्या यादीत होतील जाहीर.
ज्या जागांवर अजूनही तिढा कायम आहे त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर काढला जाणार मार्ग.
- जन्माला आला मुलगा आणि हातात दिली मुलगी
- जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा म्हणून नोंद
- मात्र डिस्चार्ज देताना हातात दिली मुलगी
- हातात मुलगी दिल्यानंतर नातेवाईक झाले अवाक
- नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात घातला गोंधळ
- अपत्य घेण्यास नातेवाईकांचा नकार वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरूच
- प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी घटनेला फोडली वाचा
- जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले चौकशीचे आदेश
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होतात शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघ तसेच फुलंब्री मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दल तयारीला लागलं असून आता अलर्ट मोडवर आलं आहे.
या अनुषंगाने दीड हजार समाजकंटकाची कुंडली देखील तयार करण्यात आली असून अवैध धंद्यावर पोलीस आता करडी नजर ठेवणार आहे. पोलिसांनी सावधगिरी बाळगून 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार यांची कुंडली तयार केली असून त्यांची सर्व माहिती देखील मागविण्यात येत आहे. दरम्यान निवडणूक काळात पोलीस आयुक्तांनी शहरातील 97 जणांना आपली शस्त्रे जमा करण्याच्या नोटीसा बजावल्या असून सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर देखील आता सायबर विभागाची करडी नजर राहणार आहे.
ओशिवरा परिसरातील इमारतीला मोठी आग
ओशिवरातील रिया पॅलेस इमारतीला दहाव्या मजल्यावर लागली मोठी आग
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर
इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती
गणेशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे काम सुरू
विधानसभेचा बिगुल वाजताच महायुती आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण
महायुती आणि मनसेमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती
मुंबईतील काही जागांवर महायुती मनसे विरोधात उमेदवार न देण्याच्या तय्यारीत ?
लोकसभेत मनसेने महायुतीला दिला होता बिनशर्त पाठिंबा
गेले दोन दिवस शरद पवार पुण्यात होते
कार्यकर्ते भेटीसह इच्छुक उमेदवार पवारांना भेटले
शरद पवार आज सकाळी 11 वाजता बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दुपारी 3 वाजता सांगलीला जाणार
सांगली इस्लामपूर येथे शिवस्वराज यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पवार उपस्थितीत राहणार आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच छत्रपती संभाजी नगर मध्ये कोट्यावधी रुपयांची उड्डाणे पूर्ण करावी लागली. आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्यातील तब्बल 400 कोटी रुपयांची बिले काढण्यात आली तर 200 कोटींच्या कामांचे आदेश मंजूर करण्यात आल्याची माहिती कोशागर विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मार्च 2025 पर्यंत मंजूर करण्यात आलेला निधी हा आताच संपवण्यात आलाय.
अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आलं आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात मविआचे नेते व काँग्रेसचे नेते डॉ.सुनील देशमुख यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला तर विद्यमान आमदार सुलभा खोडके ह्या महायुतीच्या उमेदवार असणार आहे.कारण त्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे..
परळी लोहमार्गावर थेट रेल्वेत चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानका दरम्यान कोल्हापूर/नागपूर रेल्वे गाडी क्रॉसिंगसाठी थांबली असता दोन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मागील महिनाभरात ही चौथी घटना असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूर/नागपूर एक्सप्रेस रेल्वे क्रॉसिंग साठी थांबली होती. याचाच फायदा घेत चोरट्याने दोन प्रवाशांचे दागिने लंपास केले आहे. यापूर्वी देखील सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड करत चोरट्यांनी रेल्वे थांबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यात चोरीच्या घटना देखील घडल्या आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रवाशांच्या फिर्यादीवरून परळी रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जालन्याच्या अंतरवालीत आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 11 वाजता मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मनोज जरांगे आज मराठा समाजाच्या बैठकीची तारीख घोषित करणार असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.