आरोपीने पोलिसांना दाखवले अत्याचार केलेले घटनास्थळ
या प्रकरणात आरोपीकडून दांडके आणि कपडे जप्त
अटक आरोपीने मुलगी आणि त्याच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेले दांडके व त्याचे कपडे पोलिसांनी जप्त केले.
चंद्रकुमार कनोजिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख उत्तर प्रदेशा मधून ताब्यात घेतले आहे मात्र त्याला अद्याप न्यायालयात हजर करण्यात आले नाही.
राहुल गांधी यांनी वायनाद चा राजीनामा देताना केली होती प्रियंका यांच्या उमेदवारीची घोषणा
पक्षाकडून आज अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.
आढावा बैठकीत शिवसेनेने मंजूर केले 2 ठराव. ऐरोलीची जागा शिवसेनेला मिळावी असा पहिला ठराव. तर दोन्ही तिकीट एकाच घरात गेल्यास शिवसैनिक कामं करणार नाही हा दुसरा ठराव. दोन्ही ठराव शिवसैनिकांच्या उपास्थितीत मंजूर करण्यात आले. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठराव देणार. एकही जागा न दिल्यास अपक्ष निवडणूक लढणार तर एकाच घरत दोन्ही तिकीट दिल्यास निवडणुकीत शिवसैनिक काम करणार नाही.
आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल
22 तारखेपासून प्रक्रिया सुरू होत आहे
आमच्या पक्षाची तयारी पूर्ण आहे
येत्या 2-3 दिवसात आमच जागा वाटप जाहीर होईल
महायुती मधे मोठा लहान भावाचा विषय नाही पण भाजपचे सगळ्यात जास्त जागा असल्याने त्यांना जास्त जागा मिळतील हे वास्तव आहे
आम्हाला देखील समाधानकारक जागा मिळतील
225 जागांवर आमचं एकमत झालं आहे, उर्वरित जागांवर देखील 2-3 दिवसात मार्ग निघेल असे प्रफुल पटेल म्हणालेत.
पुण्यातील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. यात नाराजीनाट्य पाहायला मिळालं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्याने शहरातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अजित पवार गटाचे पुणे शहरातील काही नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. एका टप्प्यात निवडणूक घेतली, आता जनता एका टप्प्यात पराभव करायला तयार झालेय. प्रचारासाठी वेळ कमी आहे पण आम्ही सर्व ठिकाणी पोहचू. 218 जागांवर शिक्कामोर्तब झालं आहे. दोन दिवसात 60 जागांवर एकमत होईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकापाठोपाठ लोकप्रिय निर्णयांचा धडाका….
बालवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्सनाही मिळणार बोनस.
गेल्या वर्षीपेक्षा ३ हजार रुपये जास्त मिळणार.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवाळी गिफ्ट २९ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हरीशकुमार बालकरामा याल गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरिषकुमार पुण्यातील एक स्क्रॅप डीलर असून हत्येच्या कटात पैसा तसेच इतर सहकार्य केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
अजित पवार गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
५० उमेदवारांची असणार पहिली यादी
विद्यमान आमदारांची ४० नाव आहे अशीच राहणार
त्यातील तीन नाव वगळली
उद्या अजित पवारांची पहिली यादी जाहीर होणार
संध्याकाळपर्यंत नावांची होणार घोषणा
आज आचारसंहिता जाहीर होईल उद्या यादी येणार
बारामतीतून युगेंद्र पवार शरद पवार गटाचे उमेदवार असणार
युगेंद्र पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती
बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार ?
पहिल्या यादीत बारामतीचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता
माजी खासदार हेमंत पाटील यांचे शिंदे गटाकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे
राज्यपालाच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली
हेमंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला आहे.
अजित पवार यांनी दिल्या छगन भुजबळ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा
अजितदादांनी भुजबळांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
परिवर्तन महाशक्तीची पुण्यात महत्वाची बैठक
विधानसभा नियोजन संदर्भात होणार बैठक
छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू , राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे, नारायण अंकुशे बैठकीला उपस्थित राहणार
जागा वाटपावर होणार चर्चा
बाबा सिद्दिकी हल्ला प्रकरण
हल्लेखोरांच्या रूम मध्ये राहणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुण्यातील वारजे परिसरात आरोपी राहत होते
त्यांच्या रूममधून गुल्लू आणि मोनु या २ जणांना घेतलं ताब्यात
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
येवल्यात जरांगे आणि भुजबळ समर्थकांच्या झालेल्या राड्यानंतर भुजबळ फार्मवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आज छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन
सकाळपासूनच भुजबळ फार्म वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्यपाल सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल
राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांना शासकीय सलामी देण्यात आली
राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठा पोलीस पाऊस फाटा तैनात करण्यात आलाय
सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी राज्यपाल संवाद साधणार आहेत
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार शरद पवारांच्या भेटीला
बारामती विधानसभेच्या संदर्भाने चर्चा होणार , पृथ्वीराज जाचक ही उपस्थित राहणार
पुण्यात खासदार अमोल कोल्हेंची बैठक
पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत अमोल कोल्हे यांची बैठक
जुन्नर आणि खेड विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत अमोल कोल्हे साधणार संवाद
पुण्यातील सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरुवात
अमोल कोल्हे दोन मतदार संघातील इच्छूक उमेदवारांची घेणारं बैठक
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील लिंगायत वाडीत विहीरीत पडला बिबट्या
रवींद्र रामचंद्र लिंगायत यांच्या मालकीच्या विहीरीत पडला हा बिबट्या
भक्षाच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे
बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल
बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्या करीता मनसे आक्रमक.
मनसे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष तुषार वाढणकर यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन.
पांदण रस्ते खराब झाल्याने शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल आणण्यासाठी होत आहे अडचणी.
पांदण रस्ते तात्काळ चांगले न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली
अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती
अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती.
भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर
देवळाली मतदार संघातील विविध विकास कामांचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघात अजित पवार यांचा दौरा
कालच इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय अजित पवार गटात प्रवेश
या प्रवेशानंतर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर, आजच्या अजित पवारांच्या भाषणाकडे लक्ष
पुणे जिल्ह्यातील ९०० पेट्रोल पंप विक्रेते वाहतूकदारांकडून विविध मागण्यासाठी आजपासून आंदोलन
आंदोलन काळात पेट्रोल पंप मालकाकडून पेट्रोल आणण्यासाठी गाड्या पाठवल्या जाणार नाहीत पेट्रोलची तुटवडा होण्याची शक्यता
कंपनीने पाठवलेलेच पेट्रोल विकण्याचे पेट्रोल विक्रेत्याचे धोरण
अधिकारी आणि कंपनी प्रशासनासोबतच्या बैठक निर्णय न झाल्याने पेट्रोल चालकांचे आंदोलन
महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्या तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत
12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
सोमवारी 7 ऑक्टोबरला सदर याचिकाचे युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर अजूनही निकाल बाकी आहे
या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे
अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर ह्या नावांवर मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचे हता प्रकरण
मारेकऱ्यांना बाबा सिद्दिकींची ओळख पटवण्यासाठी बॅनरवरील फोटो आला होता दाखवण्यात
आरोपींच्या चौकशीत खुलासा झाल्याचा मुंबई पोलिसांचा लावा
आतापर्यंत गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांना करण्यात आली आहे अटक
इतर ३ फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत
पुण्यातल्या वानवडीतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरटीओकडून मोहीम सुरू
स्कूलबसची माहिती वेबसाईटवर टाकण्याचे आदेश
येत्या 15 दिवसांत स्कूल व्हॅन आणि बसची माहिती सर्व शाळा महाविद्यालयाने आरटीओच्या वेबसाईटवर टाकावी
माहिती न भरणाऱ्या शाळा महाविद्यालयांना शिक्षण विभागामार्फत नोटीस बजावण्यात येणार
६ हजार स्कूल व्हॅनची नोंदणी असताना फक्त ६० टक्के स्कूल बस योग्यता प्रमाणपत्र घेतले
प्रमाणपत्र न घेतलेल्या स्कूलबसची सुद्धा नोंदणी रद्द होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.