नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर झाल्या नंतर सावंतवाडीत महायुतीत रंगत वाढताना दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर ठाम दावा केला असून, आमचा नगराध्यक्ष असावा अशी भूमिका माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली आहे. शिवसेनेत अनेक सक्षम चेहरे असून गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला लाभला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद महायुतीतून शिवसेनेकडेच सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी महायुतीच्या बैठकीत आपण करणार असल्याची माहीती केसरकर यांनी दिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सावंतवाडी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महीला प्रवर्गासाठी आरक्षित झाल आहे. त्यामुळे केसरकर यांनी नगराध्यक्ष पदावर दावाकरून महायुतीत सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा शिंदेच्या शिवसेनेचाच होईल असा प्रयत्न सुरू केला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथमधील सर्व २९ पॅनेल मधील इच्छुकांशी संवाद साधला. अंबरनाथ शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते.
यानंतर अंबरनाथच्या ग्लोब हॉलमध्ये शिंदे यांनी सर्व २९ पॅनेल मधील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्याशी प्रभाग निहाय संवाद साधला. यावेळी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागात आजवर झालेली कामं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान आणि पक्षांतर्गत वातावरण याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते. दरम्यान शिंदे यांनी सर्व २९ प्रभागांमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यामुळे आता शिवसेना अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माढा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना धावून आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी माढा तालुक्यातील सुमारे 5000 पूरग्रस्तांना दैनंदिन कपड्यांचे वाटप केले.
शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाकडे ही मदत देण्यात आली यामध्ये ब्लॅंकेट टॉवेल व इतर कपड्यांच्या समावेश आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथम एसटी प्रवर्गातील महिलांच्या हाती जाणार आहे. या पदावर प्रभावी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे. शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसकडून नगरपरिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला विधानसभेचा वाचपा काढायचा आहे.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिले जलसंपदा आणि नंतर कृषी विभागाचे नुकसान भरपाई यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे. नुकसान भरपाई चे 80 टक्के आकडे आले आहेत, दहा-वीस टक्के आकडे बाकी आहेतचंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र
आज सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात होणार आहे.
निलेश घायवळ चा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
घायवळकडे पुणे पोलिसांचे दुर्लक्ष नडले
खंडणी प्रकरणात 2021 मध्ये न्यायालयाने जमीन देताना निलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याने पासपोर्ट जमा केला नव्हता त्याच वेळी पुणे पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्ट बाबत चौकशी केली असती तर घायवळ नावाचा आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पासपोर्टचा विषय समोर आला असता
तत्कालीन पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष नडले अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू आहे
पावसाने उभे पीक पाण्याखाली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये अक्षरशः तळे असाव असं पाणी आहे. गुडघाभर पाण्यातून शेतकरी कसरत करत सोयाबीनची काढणी करत आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील हे चित्र आहे. गुडघाभर पाण्यात बाजेचा वापर करत सोयाबीन काढले जाते. अगोदरच पावसानं मोठ नुकसान झालंय. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. काहीतरी पदरात पडावे यासाठी संकटाशी शेतकऱ्यांचा सामना सुरू आहे.
मुंजवडी उदाची वाडी आणि एकतपुर येथे झाली आहे
807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे
येत्या शनिवारपासून कुंभारवळ, खानावळ या दोन गावातील मोजणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमती पत्रे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवसात 50 हेक्टर जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती
पुरंदर विमानतळासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे…
- धानी डेहरिया या 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
- नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान धानीचा मृत्यू
- मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानी ला नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते
- किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानी वर मेडिकल मध्ये उपचार सुरू होते
- धानी डेहरियाच्या मृत्यूनंतर कफ सिरप मुळे एकूण मृत्यूसंख्या पोहचली दहा वर
अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास नालीत नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गावातील दोन युवकांना नालीत कुत्रे मृत अर्भक ओढत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटीलांना कळवले व वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.
अर्भकाचे शरीर तुकडे झालेले असून त्याच्या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून, अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. अर्भकाच्या जन्मदात्या आई-वडिलांचा शोध सुरू असून पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत.
भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरातील याह कंपाऊंड येथे पहाटेच्या सुमारास भंगार गोदामाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गोदामातील सर्व भंगार साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पोलिसांनी आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची सिमोल्लंघनंतरची पाच दिवसाची श्रम निद्रा संपवुन देवी आज पहाटे सिंहासनावर विराजमान झाली आहे.पहाटे 1 वाजता तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करुन पुजारी,महंत व मंदीर संस्थानचे अधिकारी यांच्या उपस्थितीत देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली पोर्णिमेनिमित्त तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.अश्विन पोर्णिमेचा वर्षाचा पारंपरिक खेटा पुर्ण करण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असतात.पोर्णिमेसाठी राज्यासह,आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
आमदार बापू पठारे यांना सार्वजनिक कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर, त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणप्रकरणी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले...
याप्रकरणी शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, रामेश्वर पोळ, सागर करजे, ओंकार ऊर्फ ओम्या खांदवे, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथम एसटी प्रवर्गातील महिलांच्या हाती जाणार आहे. या पदावर प्रभावी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे. शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसकडून नगरपरिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला विधानसभेचा वाचपा काढायचा आहे.
- छिंदवाडा परिसरातील ३६ रुग्ण नागपुरात दाखल, आतापर्यंत १० मृत्यू; डेथ ऑडिटनंतर कारण स्पष्ट होणार, NIV चे रिपार्ट ठरणार महत्वाचे
- ० ते १६ वर्षे वयोगटातील १२ रुग्ण सध्या उपचार सुरू, मध्यप्रदेश १०, महाराष्ट्र १, तेलंगणा १.
- वैद्यकीय शिक्षण विभागाचे ३ सदस्यीय पथक तपासणीस सुरुवात,
- ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर, त्यापैकी मेडिकलमध्ये ४, इतर रुग्णालयात २.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक मंगळवारी नागपुरात, पुढे छिंदवाड्यालाही भेटीची शक्यता.
- महापालिकेच्या अहवालानुसार संशयित मेंदूज्वराचे १२ रुग्ण उपचाराधीन — मेडिकल ६, एम्स २, लता मंगेशकर १, तीन खासगी रुग्णालयात प्रत्येकी १.
- तपास पथकात डॉ. आरती किन्हिकर, डॉ. छाया वळवी आणि डॉ. भालचंद्र चिकलकर, मुंबई, पुणे येथील तज्ञांचा यांचा समावेश.
- पथकाने रुग्ण व नातेवाइकांची भेट घेऊन केसपेपर तपासले, उपचाराची दिशा ठरवली
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ॲाक्टौंबर रोजी होणार असल्याने त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत शहरातून जाण्यास जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पार्किंग सुद्धा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मध्ये ट्रक , कंटेनर , टॅंकर आदींचा समावेश आहे. उध्दघाटनंतर मोदी यांची सभा होणार असल्याने जवळपास ५० हजार लोकं उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर राज्याचे संपुर्ण मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
बनावट कागदपत्र आणि प्रतिज्ञा पत्र सादर करत मिळवला पासपोर्ट
आपल्यावर कुठला ही गुन्हा दाखल नसल्याचं सांगत केली शासकीय यंत्रणांची फसवणूक
बनावट ओळखपत्र आणि कागदपत्र पोलिस आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करत मिळवला पासपोर्ट
फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करून पासपोर्ट ॲक्ट १९६७ आणि आधार ॲक्ट २०१६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याची सुत्रांची माहीती
विकास कामांसाठी दिल्या जाणार्या नीधीबाबत अजित पवार यांची भूमिका ऊदासिन असल्याची आमदारांची शिंदेंकडे तक्रार
याबाबत तीन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशीही आमदारांची भूमिका.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध.
भूषण गवई हे बुद्धिस्ट मागासवर्गीय समाजामधून येतात आणि संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे म्हणून ते या ठिकाणी बसले आहे हे सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही ही वास्तविकता आहे - यशोमती ठाकूर यांची टीका
2014 पासुन भाजपची सत्ता आली तेव्हापासून आदिवासी,अल्पसंख्यांक, मागासवर्गीयावर अन्याय होत आहे
तद्नंतर पोलिसांनी शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.उशिरा पर्यंत जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना न सोडल्याने हजारो शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली
,दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या सह काही पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला होता.मंत्री उईके हे वणीत आढावा बैठकीसाठी गेले होते.मात्र आढावा बैठक न घेताच मंत्री उईके यवतमाळकडे निघाल
वणी पोलीस स्टेशन समोर अजूनही शिवसैनिकांची गर्दी कायम, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कडून कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठानकडून आल्याची माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.