अमरावतीत गळा कापून 45 वर्षी महिलेची हत्या करण्यात आलीये.
राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गणेश नगरातील संताजी सोसायटीमधील खळबळजनक घटना...
नीलिमा संजय खारबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव
हत्त्याचं कारण अस्पष्ट, राजापेठ पोलिसांसह डीसीपी गणेश शिंदे, श्याम घुगे, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल. हत्येचा तपास सुरू
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात आज चेंबूरमधील गांधी मैदानात RPI आठवले पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम देखील पोहोचले आहेत.
शिर्डी शहरातील सायंकाळची घटना...
ऐन चौकात दुचाकी बंद पडल्याने गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून एसटी कंडक्टर आणि दुचाकीस्वारामध्ये शाब्दिक वाद...
वादाचे रूपांतर थेट हाणामारीत...
एसटी कंडक्टर खाली उतरून थेट दुचाकीस्वाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर...
दुचाकीस्वाराने प्रतिकार करूनही कंडक्टरची मुजोरी...
स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंडक्टर नरमला...
एसटीचे कंडक्टर पांडुरंग गरकळ यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील /
आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगिळ, आमदार सत्यजित देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती
केंद्रात सत्ता तुमची नाही राज्यात तुमची सत्ता नाही, तुम्ही काय करणार "झोळी घेऊन भीक मागणार".. म्हणून सत्ता आमच्या हातात द्या. सदाभाऊ खोत यांची जयंत पाटील यांच्यावर टीका
अनेक वर्ष तुम्ही मंत्री होता राज्यासाठी आणि ईश्वरपूर साठी तुम्ही कोणते चांगले निर्णय घेतला ते जनतेला सांगा जयंत पाटील
लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार रुपये चालू केले, आणि लाडका भाऊ सुद्धा विचारतो एसएमएस आला का हे आम्ही केले.
आम्ही मोफत शिक्षण द्यायला सुरू केलं. अनेक मुली तरुण शिक्षण घेऊन इंजिनिअर डॉक्टर व्हायला लागले तुम्ही काय दिला हे सर्व देवा भाऊच्या सरकारनं केलं.
परभणीच्या पूर्णा नगर परिषदेतील २ आणि जिंतूर नगर परिषदेतील एका जागेची निवडणूक होणार नव्याने
जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काढले पत्र
पूर्णा नगर परिषदेच्या वार्ड १ ब आणि १० ब तर जिंतूर नगर परिषदेच्या वार्ड क्र ११ क ची निवडणूक होणार नव्याने
तीन्ही ठिकाणी निवडणूक होणार २० डिसेंबरला
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट ऑन निवडणूक स्थगिती निर्णय..
निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच शंकास्पद
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही निवडणूक आयोग कसा वागतोय?...
तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार, याचा परिणाम जनतेवर काय होतो?...
याची जबाबदारी कोण घेणार?
एकनाथ शिंदे यांच्या भेटीला खासदार नारायण राणे सुद्धा दाखल.
नारायण राणे, एकनाथ शिंदे व निलेश राणे यांच्यात काहीवेळ बैठक
नारायण राणे युतीसाठी होते आग्रही.. युती तुटल्यानंतर राणे प्रचारापासून होते अलिप्त
मात्र आज एकनाथ शिंदे मालवणात दाखल झाल्यानंतर नारायण राणे एकनाथ शिंदेच्या भेटीला
निलेश राणे यांच्या पाठीशी शिवसेना - एकनाथ शिंदे
जे काय घडले ते जाणून घेणार आहे त्यासाठी मी तिकडे जाणार आहे त्यानंतर मी बोलेन
निलेश राणे आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात काम करत आहेत
विकासासाठी त्यांनी प्रचंड काम केले उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्ष त्यांच्या पाठीशी आहे
यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये,निवडणूक दोन डिसेंबरलाच झाल पाहिजे
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले उमेदवार
निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या चुका नाही,तर अधिकारी वर्गांनी केलेली चुक आहे,
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूका झाल्या पाहिजे
या मागणीसाठी प्रहारचे उमेदवार धडकले यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर
मतदान इथे दोन तारखेला होत असताना निवडणूक आयोगाकडून संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात आलेली आहे
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटात भीषण अपघात . भरधाव कंटेनर वरील चालकाच नियंत्रण सुटल्याने आईसर टेम्पोला जोरदार धडक . अपघातात दोन्ही मालवाहू ट्रक पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळल्या . दोन्ही वाहनांमधील चालक गंभीर जखमी. जखमी वाहन चालकांवर रुग्णालयात उपचार सुरू. भरधाव कंटेनर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.
नगर परिषद निवडणूकीच्या मतदाना अवघा एक दिवस शिल्लक राहिला असून नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मनमाड नगर परिषदेत मोठी चूरस निर्माण पहावयास मिळत आहे.येथे होत असलेल्या तिरंगी लढतीत,शिवसेना(शिंदे गट) राष्ट्रवादी अजितपवार गट तर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार लढत देत असून आज रविवार सुट्टीचा दिवस साधून उबाठा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रविण ऊर्फ पिंटू नाईक व सर्व उमेदवारांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाल्याच पहायला मिळाले,मागील काळात केलेल्या कामाच्या जोरावर तसेच पाणी टंचाईच्या काळात साठवण तलावातून मनमाडकरांना पाणी दिले त्यामुळे त्याजोरावर नागरीक निश्चित माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास नाईक यांनी व्यक्त केलाय.
पुण्यात तरुणीची हत्या करत तरुणाने स्वतःला संपवलं
पुण्यातील संगमवाडी येथे तरुणाने केली मैत्रीणीची हत्या तर पिंपरी मध्ये जाऊन केली आत्महत्या
हे दोघेही तरुण तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात होते कामाला
प्रेम संबंधातून तरुणाने मैत्रिणीची हत्या केल्याचा संशय
तरुणी ही मूळची पुण्याची असून तरुण हा बीडचा आहे तर हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात नौकरीसाठी आहेत
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी ही बेपत्ता झाल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती पोलिसांनी याबाबत शोध घेतला असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे
राज्यात खरी लढत महायुतीमध्येच आहे..
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे निवडून येतील ...
नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील..
राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांचा दावा. .
एकाबाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर मी शांतपणे राजीनामा घेऊन बाजूला होईल अशी भूमिका घेतलीय. राष्ट्रवादी ची ताकद आम्ही शहरात वाढवली आणि आता जर अवघ्या काही लोकांसाठी असं काही होत असेल तर मी बाजूला होईल. गेल्या काही दिवसांपासून जे काही होते त्यावरून असं दिसतं की मी सिस्टीम मध्ये नसेल पण पवार साहेब काल, आज आणि उद्या "हमारे लिए सब कुछ है" अशी भावनिक प्रतिक्रिया देत असताना प्रशांत जगताप गहिवरून गेले.
लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठीची मतदान प्रक्रिया ही येत्या दोन तारखेला पूर्ण होणार आहे, मात्र त्यापूर्वीच रेनापुर नगरपंचायत ची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. या नगरपंचायत निवडणूक मध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाव बाबत काही आक्षेप जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले होते , तर राज्य निवडणूक आयोगाने रेनापुर नगरपंचायतीसाठीची मतदान प्रक्रिया ही येत्या 20 डिसेंबरला होणार असल्याची माहिती दिली आहे , त्यामुळे कुठेतरी आता निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी संतपाची भावना व्यक्त केलीय , राज्य निवडणूक आयोग हे भाजपाच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप देखील यावेळी उमेदवारांनी केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध...
काळे झेंडे दाखवत केला भाजपाचा निषेध...
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार आणि कार्यकर्ते संतप्त...
कोपरगावमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी मुख्य लढत...
भाजपच्या कोल्हे गटाने घेतली होती राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात कोर्टात धाव..
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या 28 उमेदवारांच्या शपथ पत्रावर घेतली होती हरकत...
कोपरगाव न्यायालयाने फेटाळली होती भाजपची याचिका...
मात्र गाईडलाइन नुसार निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली...
भाजपच्या भूमिकेमुळे निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून निषेध...
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे देखील निषेध आंदोलनात सहभागी...
भोर नगरपंचायत मध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींमध्ये लढत होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपा कडून संजय जगताप आणि राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे उमेदवार आहेत.
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र आवारे यांच्यासह पाच ते सात नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.
एकूण 20 नगरसेवक आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगोल्यात आगमन
थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यातील सभेला करणार संबोधित
भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा
सांगोल्यात भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा रंगलाय सामना..
शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांच्या उमेदवारांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांची सभा
गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भाव वाढीसाठी आंदोलन सुरू आहे. पहिली उचल 3 हजार रुपये आणि अंतिमतः 4 हजार रुपये प्रति टन भाव द्यावा अशी मागणी केली जात आहे.
महिनाभरात टायर पेटवून गावोगावी आंदोलने करण्यात आले, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादकांची बैठक झाली ही बैठक निष्फळ ठरली. आंदोलकांनी दुसऱ्यांदा माजलगाव मधील राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
मात्र तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कोयता बंद केला आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडून देत जिथल्या तिथे वाहतूक ठप्प करून टाकली.
याचा परिणाम म्हणून तीन साखर कारखान्यांचे आणि तीन गुळाच्या युनिटचे गाळप बंद पडले आहे.
२० डिसेंबरला होणार मतदान
अपीलामुळे बाधित उमेदवारांसाठी निर्णय
अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली
निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत केलं स्पष्ट
तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आले
प्रभाग क्रमांक ५ ब आणि प्रभाग १५ ब, प्रभाग क्रमांक १७ अ, प्रभाग क्रमांक १० ब, प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग १९ अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार
नगरपालिका निवडणूक आता २० दिवस लांबणीवर गेली असून पूर्वी २ डिसेंबरला होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार
सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का
काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाराच्या निकाला विरोधात न्यायालयात केले होते त्यामुळे न्यायालयाने या प्रभागाच्या आता निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या
एकनाथ शिंदे यांचे रोहा शहरात आगमन
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या होम ग्राऊंडवर एकनाथ शिंदे
रोहा नगर पालिका निवडणूक प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचे घेतले दर्शन
सोबत मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी
सुनील तटकरे यांच्याबाबत शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
किल्ले रायगडला सांगली येथून सहलीसाठी आलेल्या शाळेच्या मिनी बसला अपघात
० सहा जण जखमी
० चार विद्यार्थी, शिक्षक आणि बस चालकाचा जखमींमध्ये समावेश
० महाड रायगड रस्त्यावर नांदगाव गावच्या हद्दीत मिनी बसला झाला अपघात
० जखमींवर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सरू
नंदुरबार नगर परिषद कार्यालयात टपाली मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषद क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्यरत असलेले एकूण 733 कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. नंदुरबार नगर परिषदेसाठी 498, शहादा नगरपरिषदेसाठी 57 तर तळोदा नगर परिषद 57 नवापूर नगर परिषद निवडणुकीसाठी 121 असे एकूण 733 मतदार आपला टपाली मतदानाचा हक्क बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी,पोलिस कर्मचारी आणि इतर निवडणूक कार्यात सहभागी असलेल्यांचा समावेश आहे. टपाली मतदान हे सुनिश्चित करते की निवडणुकीच्या दिवशी आपले कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी देखील त्यांच्या लोकशाही हक्कापासून वंचित राहू नयेत. सध्या नगर परिषद कार्यालयात हे मतदान शांततेत आणि नियमांनुसार सुरू आहे. या मतदानामुळे एकूण मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे.
यवतमाळच्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी जवळ सोलापूर वरून छत्तीसगड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उतरली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता 20 डिसेंबरला होणार मतदान 21 डिसेंबरला मतमोजणी...
नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारांनी अपील केल्याने आता निवडणूक आयोगाचा निर्णय....
यामध्ये एका नगरसेवक पदाच्या उमेदवारांची याचिका कोर्टाने फेटाली,मात्र एक नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाजूने कोर्टाने दिला निर्णय..
आकाश सुखदेव राऊत हे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार असून कोर्टाने यांच्या बाजूने निकाल दिला.. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांच्या नामांकन त्रुटी काढल्याने केला होता अर्ज बाद
अपील प्रकरणात न्यायालयाचा निर्णय 25 तारखेला आला आहे...
आता अर्ज मागे घेण्यापासून पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे...
जन आक्रोश आंदोलन समिती नऱ्हे यांच्यातर्फे मोर्चा
नऱ्हे, धायरी, वडगाव व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र घेतला सहभाग
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नऱ्हेगाव येथून सुरू होऊन नवले पूल परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी समाप्त होणार
परिसरातील नागरिकांनी वारंवार केलेल्या निवेदनांनंतरही अपघातांची मालिका सुरुच असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व
जालन्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. जालना जिल्हा नियोजन समितीच्या तब्बल 70 कोटींच्या कामांना हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. जालन्यात विविध कामे करताना नियोजन समितीच्या बैठकीत ई-टेंडरिंग टाळण्यासाठी 70 कोटींच्या कामांचे तुकडे करून दादा लाख रुपयांची कामे देण्यात आली होती या संदर्भात पालकमंत्र्यांनी दिलेल्या कामांच्या पत्रांना हायकोर्टाने अंतरीम स्थगिती देऊन प्रतिवादींना नोटीस बाजवण्याच्या आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यातील विकास कामे करताना 10-10 लाखांचे तुकडे पाडून कामे दिल्याच्या विरोधात शेतकरी अनिरुद्ध शेळके यांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने 70 कोटींच्या कामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना हायकोर्टाने दणका दिला आहे.
कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक ढकलली पुढे...
याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया ढकलणार पुढे...
पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती.....
भंडाऱ्यात भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय.. शिंदेंचे आमदार नेरेंद्र भोंडेकरांनी नगरपरिषदेत 3 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, मंत्री परिणय फुकेंनी केलाय.. तर भोंडेकरांनी यावर स्पष्टीकरण द्यावं.. असं आव्हान त्यांनी दिलंय
निलंगा नगर परिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय, तर तिकडे ठाकरे गटाकडून देखील या मतदारसंघात ताकद लावली जात आहे. दरम्यान भर सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी काँग्रेस नेते आ अमित देशमुख यांच्यासमोर विरोधकांचा "लाव रे तो व्हिडिओ"म्हणत पोलखोल केली आहे. खोटी आश्वासन देणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभ राहायचे का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला आहे.
जळगाव जिल्ह्यात येत्या मंगळवारी सोळा पालिका व दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी ९७७ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रचार दोन दिवस आधीच थांबवावा लागतो. यंदा मात्र प्रचार प्रत्यक्ष मतदानाच्या साडेनऊ तास आधी संपून लागलीच मतदान होणार आहे. आतापर्यंत असे झाले नव्हते. मात्र यंदा चिन्ह वाटपानंतर केवळ चारच दिवस प्रचारास शिल्लक होते. यामुळे निवडणूक आयोगाने एक दिवस प्रचारासाठी वाढवून दिला आहे. सोमवारी रात्री दहापर्यंत जाहीर प्रचार उमेदवारांना करता येणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मला मदत करा म्हणून 35 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट अकलूजचे जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. अकलूज नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेत बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांच्या या ऑफरची पोलखोल केली.
भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला. भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडीत भाजपचे आयुष्य चालले असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत, अशी झणझणीत टीका राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि.२९) नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर केली.
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला, आज धुळ्यात 7.0°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेले काही दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि त्यामुळे नागरिकांना चांगलाच उकाडाचा सामना करावा लागत होता, परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.
तापमानामध्ये पुन्हा एकदा घट झाल्यामुळे धुळेकर पुन्हा एकदा थंडीमुळे चांगलेच गारठले आहेत. आता यापुढे थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे धुळेकरांना वाढत्या थंडीचा पुन्हा एकदा सामना करावा लागणार आहे.
भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी . भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. भर रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि सध्याचे भाजपचे पदाधिकारी अशोक अंभुरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर पालघर पोलीस ठाण्यात विविध कलमान अंतर्गत पुन्हा दाखल. महिलेला देखील मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार . अशोक अंभुरे यांनी पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत तिकिटासाठी पैसे मागितल्याचा महिलेचा आरोप . वाद मिटवण्यासाठी रात्री उशिरा खासदारांची पालघर पोलीस स्टेशनमध्ये धाव .
तक्रारदार यांच्या मुलीचा विवाह समारंभ 25 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बाणेर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मंगल कार्यालयात ठेवण्यात आलेल्या एका टेबलवर त्यांनी दागिन्यांची एक पिशवी कामाच्या गडबडीत ठेवून दिली. या पिशवीत सोन्याचे दागिन्यांसह एक लाख तीस हजारांची रोकड आणि मोबाईल असा आईवर सुद्धा होत…
-नगरपरिषद निवडणुकांमध्ये सख्खे नातेवाईक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याच चित्र आपल्याला दिसत आहे.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेत दोन जावा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत.नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोटकर या त्यांच्याच जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ भूषण पोतदार प्रणित पॅनल व अजित पवार गटाच्या कल्पना मारोटकर या दोघी निवडणूक रिंगणात आहे.कल्पना मारोटकर या यापूर्वी दोनदा नगरसेविका होत्या. कल्पना मारोटकर व प्राप्ती मारोटकर या दोन्ही जावा उच्चशिक्षित असून एकमेका विरोधात निवडणुका लढत आहेत. दोन्ही जावानी प्रचाराचा धूम धडाका लावलेला आहे.नांदगाव खंडेश्वर व आसपासच्या परिसरात ही निवडणूक चर्चेचा विषय झाला आहे आता यापैकी कोणती जाऊ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे...
भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी भंडारा नगरपरिषदेत झालेल्या कथित भ्रष्टाचारावरून शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट आव्हान दिले आहे. मागील चार वर्षांत नगरपरिषदेत 200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत, फुके यांनी भोंडेकरांना भ्रष्टाचाराचा हिशोब देण्याची मागणी केली आहे.
गारपीट आणि अतिवृष्टी मदतनिधी पासून शेतकरी राहिले वंचित
सप्टेंबर महिना झालेला गारपिट आणि अतिवृष्टीमुळे 52 हजार शेतकऱ्यांचे सुमारे 22 हजार हेक्टर नुकसान झाले होते
राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून 48 हजार 595 पैकी 40 हजार 908 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले असल्याचा दावा केला आहे
24 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र सात हजार शेतकऱ्यांना केवायसी अपडेट नसल्याने त्याचा फटका बसला आहे
जोगेश्वरी पूर्वेतील Satra Nexus या बांधकाम प्रकल्पात १८व्या मजल्यावरून पडून अन्मेष विश्वास (४७) या कामगाराचा मृत्यू झाला. ठिकाणी फॉल प्रोटेक्शन, सेफ्टी नेट्स, हेल्मेट यांसह कोणतीही सुरक्षा साधने नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. परिसरात याआधीही श्रद्धा कन्स्ट्रक्शन, AIM Paradise व देवभूमी साइटवर अशाच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाले होते. सुरक्षा नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने हा "सिस्टिमॅटिक नेग्लिजन्स" आहे. या प्रकरणात BOCW Act आणि भारतीय न्याय संहिता कलम १०६ अंतर्गत विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आता मागणी जोर धरू लागली आहे. यासोबतच नागरिकांनी विकासकाचा बांधकाम परवाना निलंबन, दंड आणि कुटुंबाला तात्काळ भरपाईची मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट पुन्हा आली असून गेल्या चार ते पाच दिवसात ढगाळी वातावरणामुळे थंडी कमी झाली होती,मात्र दोन दिवसांपासून थंडीत पुन्हा वाढ झाली आहे.सध्या पालिका निवडणुकीचा पारा वाढत असतानांच तापमानाचा पारा घसरत चालला आहे.जिल्ह्यात पारा 10 अंशावर आल्याने सगळीकडे हुडहुडी जाणवत आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा तापमानात घसरण झाली असून थंडीचा जोर काल पासून वाढू लागला आहे,काही दिवस किमान तापमानात वाढ झाली होती मात्र काल पासून रात्री व पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवत असून तापमान पुन्हा १२ ते १३ अंशापर्यंत खाली आले आहे.थंडी जाणवत असल्याने नागरीक पुन्हा शेकोटीचा आधार घेऊ लागले आहे.
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या सभांचा धडाका सुरूये.. याच प्रचार सभेत पुन्हा एकदा 'बटेंगे तो कटेंगे' और 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चा नारा चर्चेत आलाय.. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात खासदार नवनीत राणांनी 'बटेंगे तो कटेंगे' और 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चा नारा दिलाय... इसबार ना कटना है, ना बटना है... एक रहेना और सेफ भी रहेना है.... हे ताकद दाखवतायेत, आता आपल्यालाही ताकद दाखवण्याची वेळ आल्याचं विधान राणांनी केलंये..
Maharashtra Live News Update: नवनीत राणांचं पुरुषाबद्दल वादग्रस्त विधान!
माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषाबद्दल एक वादग्रस्त विधान गेलंये.. नगरपरिषद निवडणुका सुरु आहेये.. आता खूप पार्ट्या, कार्यक्रम होणार आहेते, पुरुष मतदार हा अनेक पार्टीमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो... मात्र, या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार अन एकनिष्ठ राहतो... कारण, बायका कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाहीये, आणि कधीही कुणाच्या पार्टी न जाण्याची त्यांची भूमिका राहते... 'ती' चटणी भाकर खाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घन बनवणार... असं विधान नवनीत राणांनी अकोल्यात बोलतांना केलंय.. त्यामूळे पुरूष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का?, हा प्रश्न यातून निर्माण होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.