Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या, देशात इंधनाचा पुरवठा किती? राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलची बचत करा, विदर्भाला उन्हाचा तडाखा, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या खडकपूर्णा नदीतून गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे व यंत्राच्या सहाय्याने 24 तास रेती उत्खनन व वाहतूक सुरू आहे, अवैधपणे व बेसुमार रेती उत्खननामुळे नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने ही रेती वाहतूक व उत्खनन बंद करावे या मागणीसाठी अचानक या परिसरातील नागरिकांनी जुना मुंबई पुणे नागपूर महामार्ग रोखून धरला आहे.

कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर, दहशत माजवत तोडफोड करणाऱ्या गुंडाची काढली धिंड

माऊली चौकात दहशत माजवत तोडफोड करणाऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

दहशत माजवणाऱ्या ठिकाणीच फिरवत राजारामपुरी पोलिसांनी गुंडांचा उतरला माज

गेल्या दोन दिवसांपूर्वी गेंड्या गँग आणि योगेश नलवडे गँग मध्ये झाला होता राडा

या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना अटक करून राजारामपुरी पोलिसांनी फिरवले.

विदर्भात उष्णतेचा प्रचंड कहर; विदर्भातील 3 शहरे 46 पार तर अन्य 3 शहरे 45 पार

अमरावती: आज अमरावतीमध्ये सर्वाधिक ४६.८°C तापमानाची नोंद झाली असून, कालच्या तुलनेत त्यात ०.४°C ने वाढ झाली आहे.

वर्धा: वर्ध्याचे तापमान ४६.५°C असून, गेल्या २४ तासांत तापमानात कोणताही बदल झालेला नाही.

अकोला: अकोल्यात आज ४६.०°C कमाल तापमान नोंदवले गेले. कालच्या तुलनेत येथे ०.३°C ने घट झाली आहे.

nanded : नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित

नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

मागील दोन तासापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल.

नवजात बालकांना अक्षरशः कपड्याने वारा घालण्याची नातेवाईकांना आली वेळ.

महावितरण कंपनी आणि कंधार ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा रुग्णांना फटका.

yavatmal : राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनाला आग

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनाला आग

धावत्या कारने वाहनाने घेतला पेट

शॉर्टसर्किट झाल्यामुळे वाहनाला लागली आग

latur : लातूरमध्ये डॉक्टरची सीबीआयकडून रात्री पुन्हा चौकशी सुरू

नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय तळ ठोकून आहे, रात्री औसा रोड परिसरात एका बालरोग तज्ञ डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या एक तासापासून या डॉक्टरची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान क्लास चालकानंतर आता डॉक्टर नीट पेपर फुटी प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची पुन्हा चौकशी होणार

पुणे -

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट

आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची पुण्यात पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

सी बी आय या दोघींना पुण्यात घेऊन येणार असल्याची शक्यता

ज्या ठिकाणी त्यांचे क्लास होते तिथे जाऊन सी बी आय कडून तपास केला जाण्याची शक्यता

सोबतच दोघींना एकत्र बसवून चौकशीतून काही धागेदोरे सी बी आय मिळवण्याच्या तयारीत

Pune: पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला, धरणांचा पाणीसाठा झाला कमी

पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला

वाढत्या उन्हाचा धरणांना फटका

वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा झाला कमी

Sangli: पेठ - सांगली रोडवर धावत्या कारला भीषण आग लागली

सांगली -

पेठ - सांगली रोडवर धावत्या कारला भीषण आग लागली सुदैवाने जीवितहानी झाली नाही

सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये भर रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर एक थरारक घटना घडली.

चालत्या ओम्नी कारला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या कारमध्ये गॅस किट बसवलेले असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.

मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशामक दलाच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असून आग विझवण्यात यश आले आहे.

Pune: नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी

पुणे -

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी

नीट पेपर फुटी प्रकरणात संबंधित संशयित विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका कोणाकडून आणि किती रुपयांना विकत घेतली याबाबत चौकशी

आज सकाळी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध विद्यार्थ्यांची सीबीआयने केली चौकशी

Sambhajinagar: रस्ता मोकळा न झाल्याने शेतकरी संतप्त, तहसीलदारांच्या केबिनसमोर पेट्रोल ओतून आंदोलनाचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील मंजापूर शिवारातील शेतरस्त्याच्या वादावरून आज तहसील कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.

गट क्रमांक १५ ते १६ मधील शेतीकडे जाणारा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत असल्याचा आरोप करत एका संतप्त शेतकऱ्याने थेट तहसीलदारांच्या केबिनसमोर पेट्रोल ओतून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी दुपारी सुनावणीदरम्यान हा प्रकार घडल्याने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेला निकाल मुद्दाम रखडवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रशासनावर केला आहे.

नवी मुंबई विमानतळावर मराठी उद्घोषणा नाही; मनसेचे इंडिगो कार्यालयासमोर आंदोलन 

नवी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या इंडीगो एअरलाइन्सच्या विमानात मराठीत उद्घोषणा केली नसल्याने.. नवी मुंबई आणि रायगडच्या मनसे कार्यकर्त्यांनी नवी मुंबई विमानतळातील इंडिगो कार्यालयासमोर आंदोलन करून जाब विचारला..

जेएनपीटी बंदरातून (JNPT Port) आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका 

गेल्या महिनाभरापासून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या बंदरात आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पाच राज्यांच्या निवडणुकीचा फटका त्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सध्या जेएनपीटी परिसरात ड्रायव्हर्स आणि कामगारांची (लेबर) तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अहमदपूर पंचायत समितीत पैशाची मागणी, शेतकऱ्याने केला संताप व्यक्त 

लातूरच्या अहमदपूर पंचायत समितीत ,MRGS विभागात शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या गायगोठा, आणि घरकुल सारख्या लाभाच्या बिलासाठी कर्मचारी सर्रासपणे पैशाची मागणी करत असल्याचा आरोप, एका वृद्ध शेतकऱ्यांने केला आहे, संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अहमदपूर पंचायत समिती बाहेर , संताप व्यक्त करत सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं सांगितलं, गायगोठा मंजूर करण्यासाठी मागचा एक वर्षापासून 12000 रुपये दिले मात्र अद्याप मंजूर केला नाही, अशी माहिती देखील शेतकरी ने दिली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये खरीप आढावा बैठकीत मोठा राडा,उबाठा शिवसेनेचे आमदार गजानन लवटे शेतकऱ्यांवर चांगलेच संतापले 

युरिया खताच्या प्रश्नावरून आमदारांनी शेतकऱ्याची कॉलर पकडल्याचा आरोप

कृषी विभागाच्या खरीप आढावा बैठकीत आमदारांचा आक्रमक अवतार कॅमेऱ्यात कैद

“अधिकाऱ्यांची बाजू घेत शेतकऱ्याला दमदाटी,शेतकरी विलास गिरी यांचा गंभीर आरोप

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दर्यापूर मतदारसंघात संतापाची लाट

शेतकरी शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख असून त्यांच्या सोबत गैरवर्तन झाल्याचा दावा

घटनेनंतर आमदार गजानन लवटे यांच्यावर शेतकऱ्यांनी केला तीव्र निषेध व्यक्त

भाजप प्रदेश युवा अध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाताना भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की गेल्याचे पाहायला मिळाले.भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आल्यानंतर त्यांच्यासोबत आपलंही दर्शन व्हावं आपणही त्यांच्यासोबत जावं यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा प्रयत्न होता. मात्र मंदिर समितीकडून मर्यादित लोकांना आज सोडण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या दरवाजा बाहेर उभ्या असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं.

नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक

नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक....

वेळेवर निधन मिळत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांचे हाल...

युद्धाचा अप्रत्यक्ष फटका नागरिकांना,इंधन संकटाने वाढवली चिंता...

गुजरातमधील पंप बंदचा परिणाम,नंदुरबारमध्ये इंधनावर वाढला ताण...

वालधुनी नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा 

उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने कारवाई करत भूमाफियांवर धडक मोहीम राबवली. नदीपात्रात भर टाकून चाळी उभारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

फलटण येथीलश्रीराम कारखाना आता 'श्री दत्त इंडिया'कडे; फलटणमध्ये विशेष सभेत प्रचंड गदारोळ

फलटण येथीलश्रीराम कारखाना आता 'श्री दत्त इंडिया'कडे;

फलटणमध्ये विशेष सभेत प्रचंड गदारोळ

जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द | ४४ कोटींच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी

संजीवराजें यांनी स्टेजवरून खाली उतरत मध्यस्थीचा केला प्रयत्न

कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होऊ देणार नाही- राजू शेट्टी

कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होऊ देणार नाही. जर हा महामार्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून गेला तर ऊस शेतीच मोठ नुकसान होऊन पाच ते 10 साखर कारखाने बंद पडतील. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली जाईल आणि लोकांच्या घराघरांमध्ये पाणी शिरेल. राज्य आणि केंद्र सरकारने आखलेला डाव उधळून लावू... आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत त्यामुळे या गनिमाला पळून जाऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलेला आहे

शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यातील CBI कार्यालयात चौकशी सुरू

मोटेगावकरच्या मुलाने बारावीची परिक्षा दिलेली आहे आणि त्याला देखील फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याच बोलल जात आहे.

मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासमधे शिकणाऱ्या आणखी तीन विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह चौकशी सुरू आहे.

- मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचं नागपुरात आगमन..

- नागपूर विमानतळावर मनसैनिकानी केला अमित ठाकरेंचा फुलाच्या पाकळ्यांनी जंगी स्वागत

- अमित ठाकरे आज एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत

- नागपूर मध्ये सुरू असलेल्या मनसे चषक 2026 च्या क्रिकेट मॅच समारोपाला अमित ठाकरे राहणार उपस्थित

- सोबतच नागपुरातील मनसैनिकांशी अमित ठाकरे साधणार संवाद

अमरावतीच्या दर्यापूर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील भारसाकळे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?

दर्यापूरच्या काँग्रेस मधीन स्थानिक पक्ष संदर्भात मला विश्वासात घेतलं नाही - सुधाकर भारसाकळे यांचा आरोप

* काँग्रेस मधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांनी दिला आहे दर्यापूर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा...

लवकरच सुधाकर भारसाकडे शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

एअर इंडिया विमानाने शिंदे दिल्लीला रवाना

हिंगोलीत पेट्रोल पंपावर डिझेलच्या कॅन डोक्यावर घेत शेतकऱ्यांच आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

हिंगोली वसमत महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच आंदोलन

पेट्रोल पंप चालक डिझेल कॅन मध्ये न देता अडवणूक करत असल्याचा आरोप

पंढरपूरमध्ये अधिक मासात विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद

अधिक मासात भाविकांची संख्या वाढली आहे. येणाऱ्या भाविकांचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

हिंगोलीत इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात उग्र आंदोलन

  • हिंगोलीत इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उग्र आंदोलन

  • क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला

  • हिंगोलीच्या गोरेगाव मध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन

  • पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

कॅन मध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्यांमुळेच परिस्थिती गंभीर- पेट्रोल पंप असोसिएशन

वाशिम शहराला दररोज 70 हजार ते 75000 हजार लिटर डिझेल विक्री होते. मात्र काल वाशिम शहरात दोन लाख लिटर डिझेलची विक्री होऊही डिझेलचा काही वेळातच साठा संपला होता.

ही परिस्थिती मागील दोन ते तीन दिवसापासून अशीच राहत आहे, ही परिस्थिती कॅन मध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्यामुळे झाली असल्याचा आरोप पेट्रोल पंप असोसिएशन कडून करण्यात आला आहे.

परभणीच्या जिंतूरमध्ये भरदिवसा थरार; युवकाचा हात मनगटापासून छाटल्याची घटना CCTV मध्ये कैद

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात भरदिवसा घडलेल्या थरारक हल्ल्याचा CCTV समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी दुपारी जुन्या वादातून सोहेल नसीर पठाण (वय २५) याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताचे मनगट छाटले गेले.

परभणीत मागील दोन दिवसांपासून डिझेलची भीषण टंचाई

परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे.

परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक शेतकरी पहाटे सकाळी 3 वाजल्यापासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत.

आरसीसी क्लासवर मनसैनिकांनी फेकली अंडी, प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असणाऱ्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याच्या लातूर येथील RCC कोचिंग क्लास वर मनसेच्या वतीने अंडे फेकत निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत, खडक कारवाईची मागणी केली आहे, आंदोलन करताना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले

स्वराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्वराती) भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवीट साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज सकाळी ६:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसरी लेन सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले डोंगरकटाई, रॉक बोल्टिंग, रिटेनिंग वॉल आणि गॅबियन वॉलचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून घाटातील दुसरी लेनही वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे.

आरसीसी क्लासेससमोर तणावानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त; एमआयएमच्या आंदोलनानंतर भाजयुमोची घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर शहरातील आरसीसी क्लासेससमोर काल एमआयएम पक्षाच्या कारयकर्त्यांनी काळे फासून आंदोलन केले होते.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची शक्यता लक्षात घेता आज पोलिसांकडून आरसीसी क्लासेस परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Kolhapur: नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर यांच्या कोल्हापुरातील RCC फाउंडेशनच्या दारात शिवसेना आणि युवा सेनेचे आंदोलन

नीट पेपर फुटी प्रकरणी प्रमुख आरोपी असणाऱ्या प्राध्यापक मोटेगावकर यांच्या कोल्हापुरातील RCC फाउंडेशनच्या दारात शिवसेना आणि युवा सेनेचे आंदोलन

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी

प्राध्यापक मोटेगावकर यांच्या पोस्टर्सला फासलं काळे

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची क्लासेस समोर जोरदार घोषणाबाजी

Raver: रावेरमधील १२६ वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर भीषण आगीत जळून खाक

रावेर (जि. जळगाव) येथील सुमारे १२६ वर्षे जुने आणि ऐतिहासिक असे लक्ष्मीनारायण मंदिर मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. ही घटना रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास घडली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पुरातन मंदिराला अचानक आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रावेर, सावदा, फैजपूर व यावल येथील अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

तब्बल १४ अग्निशामक बंबांच्या सहाय्याने आणि नागरिकांच्या सहकार्याने पहाटे सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Chhtrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने सुरू असलेल्या पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रॅक्टर, चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह नागरिक कॅनी घेऊन डिझेल भरण्यासाठी पंपावर दाखल होत आहेत. शेतीची कामे सुरू असताना डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Buldhana: बुलढाण्यात नागपूर आणि अकोला एटीएसची मोठी कारवाई

बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्रीकोळी या गावातून नागपूर आणि अकोला एटीएसने तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन पिस्टल व 92 काडतूस जप्त केले आहे. अकोला आणि नागपूर एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाई बाबत मात्र बुलढाणा पोलीस अनधिज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर आणि अकोला एटीएसने बुलढाणा जिल्ह्यात येऊन केलेल्या कारवाईमुळे मात्र बुलढाणा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल आहे. शुभम सागर पवार राहणार वर्धा व रोहित शिंदे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते काळ्या रंगाच्या कारमधून या परिसरात फिरत असल्याची माहिती अकोला आणि नागपूर एटीएसला मिळाली होती त्यानुसार काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली दोन पिस्टल व 92 जिवंत काडतूस जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे...

Motegaonkar Classes: मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील RCC  क्लास बंद

देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर अटक झाल्यानंतर पुण्यातील क्लासेस बंद झालेत. पुण्यातल्या डेक्कन परिसरात आरसीसी क्लासेस चालवले जात होते. पुण्यात या क्लासेस ची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र आता या ठिकाणी विद्यार्थी आणि कुठलाही स्टाफ पाहायला मिळत नाही. इतर वेळी विद्यार्थ्यांची फी घेणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे चौकशीसाठी आलेल्यांना परीक्षा बद्दल सांगणे असे कामे क्लासेस मध्ये उन्हाळ्यात सुद्धा चालत होते.मात्र मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर आता हे बंद झाल्याचे पाहायला मिळतेय

Solapur: सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत...

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे उमेदवार देण्याच्या तयारीत...

माजी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत रात्री प्रमखु नेत्यांची पंढरपुरात गुप्त बैठक...

बैठकीत शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांना निवडणूकीत उतरवण्याची तयारी....

अनिल सावंत हे माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे....

भाजप शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता...

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये अनेक पेट्रोल पंप बंद

पेट्रोल आणि डिझेलचे भाव अचानकपणे वाढले असून आज अहिल्यानगर शहरात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते याचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर होत असून मे महिन्याचा शेवटचा आठवडा तो असल्यामुळे शेतीचे कामे आता सुरू झाली आहेत शेती करण्यासाठी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी येत आहेत मात्र गेल्या तीन दिवसांपासून डिझेल मिळत नसल्याने शेतीचे कामे खोळंबली असल्याचे प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

Buldhana: बुलढाण्यात डिझेल टंचाईचा हाहाकार, पंपांवर वाहनांच्या एक किमी रांगा..

देऊळगावराजा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी व वाहनधारकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेती मशागतीच्या कामांसाठी डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी कॅन घेऊन तब्बल 12 तासांपासून रांगेत उभे असल्याची चित्र दिसत आहे .. डिझेल टंचाईमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला असून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे....

Ashok Kharat: अशोक खरातला घेऊन ईडी अधिकारी मुंबईला रवाना

अशोक खरातचा ईडीने घेतला ताबा

ईडीचे अधिकारी खरातला घेऊन मुंबईच्या दिशेने झाले रवाना

Nanded: नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आमदार चिखलीकर यांची मागणी

विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच नांदेड मध्ये राजकीय घडामोडी सूरू झाल्या.स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्याकडे आपण तशी मागणी केल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले.तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील. तो निर्णय मान्य असेल. मात्र राष्ट्रवादीची ताकद देखील जिल्हयात आहे.आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे असं चिखलीकर म्हणाले.नांदेड जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक भाजपाचे सदस्य आहेत.त्यामूळे या जागेवर भाजपचा दावा आहे.मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडन्याची मागणी चीखलीकर यांनी केल्याने युतीत धुसपुस होण्याची शक्यता आहे.

NEET: नीट पेपर फुटी प्रकरणी कदम कुटूंबाची आज पुण्यात चौकशी

नांदेडच्या कदम कुटुंबाची आज पुन्हा पुण्यात सीबीआय कडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे.शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युत नगर भागात धाड टाकून कदम कुटूंबाची आठ तास चौकशी केली होती.कदम यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयात नीट चा पेपर विकत घेतला होता असं सीबीआयच्या तपासात उघड झाल्याची माहिती आहे.कदम कुटुंबीय पुण्यातील एका एका एजंटच्या संपर्कात होते.तिथूनच त्यांनी व्यवहार केल्याचा ठपका आहे.शनिवारी सीबीआयच्या पथकाने कदम कुटुंबांच्या प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना पुणे येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलण्यात आल्याची माहिती आहे.आज अकरा वाजता कदम कुटुंबीय पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर होणार आहेत.दरम्यान सीबीआयने चौकशी केलेल्या कदम कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपले फोन स्विच ऑफ केल्याची माहिती आहे

nashik-malegaon-मालेगाव पोलिस अँक्शन मोडवर-शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर नाका बंदी

नाशिकच्या मालेगाव पोलिस अँक्शन मोडवर आले आहे.नव्याने रुजू झालेले अप्पर पोलिस अधिक्षक सूरज गुंजाळ यांनी आर.टी.ओ.अधिका-यांना सोबत घेत शहरातील मुख्य गजबजलेल्या चौकां मध्ये पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना सोबत घेत दंडात्मक कारवाईला सुरुवात केलीय.कागदपत्रे नसणे,नंबरपेल्ट नसणे,ट्रीपल शिट,लायसन नसणे अशा वाहन धारकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्याने वाहनधारकां मध्ये चांगलीच दहशत पसली आहे,बेशिस्त वाहतूक,वाहतूकीची कोंडी यामुळे रस्त्याने चालणा-या पायी जाणा-या नागरीकांचे अपघात होऊ नये म्हणून ही धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

Maharashtra News Live Update: आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता

अकोला, अमरावती , यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेकडून उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट...

यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडतांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आज विदर्भात बहुतांश जिल्ह्यत तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: पुण्यात शिवसेना-भाजपचा वाद पेटला

सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते दोराबजी मॉल समोरील पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झालं.

याच टाक्यांचं लोकार्पण मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात केलं होतं. शिवसेनेला विश्वासात न घेतल्यामुळे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी पुन्हा या टाक्यांचं लोकार्पण नागरिकांच्या हस्ते केलं आहे. या टाक्यांसाठी पाठपुरावा भानगिरे अनेक वर्ष करत होते. पाण्यांच्या टाक्यावरून श्रीवादाची लढाई पुण्यात शिवसेना-भाजप मध्ये पाहायला मिळत आहे.

दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका दिली डिजिटल पद्धतीने परीक्षा केंद्रवर पाठवण्यात येणार

दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका डिजिटल तपासल्या जाणार पुरवणी परीक्षेसाठी बोर्डाचा निर्णय

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येत आहे

एका विषयाच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने केंद्रावर दिल्या जाणार आहेत आणि उत्तर पत्रिका डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत

या प्रयोगाच्या परिणाम पाहून येत्या वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षेत त्याचा वापर करण्यात येणार आहे

पुण्यातल्या पाटील इस्टेटमध्ये तुफान राडा

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात ८ ते १० पोरांच्या टोळक्याने प्रचंड राडा घालत गाड्यांची तोडफोड केली आणि परिसरात दहशत माजवली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या पोरांची पाटील इस्टेट परिसरात मोठी दहशत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT