Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५, मुंबईसह महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

आयुष कोमकर मर्डर प्रकरणात वनराज आंदेकरच्या पत्नी तपासासाठी ताब्यात

आयुष कोमकर मर्डर प्रकरणात वनराज आंदेकर याची पत्नी व कृष्णा आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर प्रियंका आंदेकरला पोलिसांनी घेतलं तपासासाठी ताब्यात

तपासासाठी समर्थ पोलीस स्टेशनला पोलीस घेऊन आले

Nashik: नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन

- शहरातील ड्रिम कॅसेल चौकात नागरिकांचं आंदोलन

- रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप

- नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक

- रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी केला निषेध, तातडीनं खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुंबरान आंदोलन करण्यात आले.. यशवंत सेनेच्या वतीने भारत सोडणार यांच्या नेतृत्वाखाली धनगर बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली.. धनगर समाजाच्या पारंपारिक वाद्यासह हे आंदोलन करण्यात आले असून सरकारने आमचे अनेक वर्षांपासून ची मागणी मान्य न केल्यास आम्ही देखील मुंबई येथे जाऊन आंदोलन करू वाचा इशारा भारत सोनार यांनी दिला आहे.. या आंदोलनात जिल्हाभरातील धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

Latur: नुकसानग्रस्त शेती पिकांची पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडून पाहणी

लातूरच्या तेरणा नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने औसा तालुक्यातील उजनी परिसराला सर्वाधिक फटका बसलाय, नदीकाठची संपूर्ण शेती पाण्यात गेल्याने शेती पिकांचे प्रचंड मोठ नुकसान झालंय . मूग, उडीद सोयाबीन, तूर या नगदी पिकांच मोठ नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात गेलाय, दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पाहणी केली आहे.

Nashik: नाशिकमध्ये भरदिवसा तरुणाचे अपहरण

* तरुणाच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर .. !

* नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरात भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न ..

* 6 ते 7 जणांनी तरुणाला कोंबले गाडीत

* जीव मुठीत धरून या तरुणाने पळ काढत गाठले पोलिस ठाणे

* सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

* मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलिस तपास सुरू..

Rahul Gandhi: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

राहुल गांधी यांनी सरकारवर मतचोरीचा आरोप केला आहे. आता त्यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय की, राहुल गांधी कोर्टात का जात नाही त्यांचा बॉम्ब फुसका आहे.

आयोगाच्या आतमधून मदत मिळतेय - राहुल गांधी

निवडणूक आयोगच्या आतमधून आम्हाला माहिती मिळत आहे. आम्हाला मदत केली जातेय. हे थांबणार नाही. देशातील लोकं मतचोरीला थारा देणार नाहीत.

Rahul Gandhi PC Live : राहुल गांधींचा धक्कादायक आरोप, आयोग संशयाच्या भोवऱ्यात, वाचा

Rahul Gandhi Press Conference Live : कर्नाटक सीआयडीकडून आयोगाला १८ पत्रे पाठवण्यात आली. त्याबाबत कुमार यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. कर्नाटकमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिले पत्र लिहिले जातेय. पण ज्याची माहितीची गरज नाही, त्याबाबत काहीही दिले नाही. १८ वेळा पत्र पाठवल्यानंतरही कर्नाटक सीआयडीला काहीही प्रतिसाद दिलेला नाही. निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही. कर्नाटक आयोगालाही माहिती विचरण्यात आले, पण उत्तर काहीही आले नाही. निवडणूक आयुक्त मतचोरांना मदत करत असल्याचे पुरावे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Live : निवडणूक आयुक्तांकडून मतचोरी करण्याऱ्याला पाठिंबा, राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi Press Conference Live : वेगवेगळ्या राज्यातील क्रमांकाचा वापर करून मतं डिलिट केली जात आहेत. त्या क्रमांकावर फोन केल्यास काहीही प्रतिसाद येत नाही. ज्यावेळी हे क्रमांक वापरला त्यावेळी कुठे होते? आयपी अॅड्रेस काय होता? १२ सेकंदात नाव डिलिट होते.. पण प्रोसेस पाहायला गेले तर हे होणं शक्यच वाटत नाही. पहाटे ४ वाजता प्रोसेस होतेय. नागराज यांच्या क्रमांकावर ३६ सेकंदात हे केलं, त्यांना याबाबतच माहिती नाही. सर्व काही ठरवून मदत केली जात आहे. व्होटर लिस्टमधील पहिल्या क्रमांकावरील व्यक्तीकडून हे डिलिट होतेय. हे सर्व एका सॉफ्टवेअरमार्फत केले जात आहे. कर्नाटकमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचे मते जिथे जास्त होती, त्या ठिकाणी टार्गेट केले. ज्या ठिकाणी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या, त्या ठिकाणी मतांची चोरी झाली. आयोगाचे आयुक्त मतचोरांना पाठीशी घालत आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत.

Rahul Gandhi Press Conference Live : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडली, पुरावे मिळाले

Rahul Gandhi Press Conference Live : काँग्रेस, विरोधकांची मते डिलिट केली जात आहे. माझ्याकडे १०० टक्के पुरावे आहेत, कर्नाटकमध्ये आनंद येथे ही चोरी पकडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाले. ज्यांचे नावे डिलिट झाली, त्यांना काही माहितीच नाही, असेही ते म्हणाले. कर्नाटकमध्ये ६ हजार पेक्षा जास्त मते मिळाली, यापेक्षा जास्तही असू शकते. कर्नाटकमधील नंबर नव्हतेच, दुसरीकडून मते डिलिट केली जात आहेत. काँग्रेस मतांना टार्गेट केले जातेय. गोदाबाई यांच्या नावावर १२ मते डिलिट करण्यात आली. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते.

Rahul Gandhi Press Conference Live : राजुरामध्ये ६८५० मते वाढली- राहुल गांधी

Rahul Gandhi Press Conference Live : महाराष्ट्रातील राजुरामध्ये मते वाढवण्यात आली. ६८५० मते वाढली आहेत. आधी मते वाढवण्यात आली होती, आता डिलिट केली जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आयोगाचे आयुक्त मतचोरांना पाठीशी घालत आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi Live : महाराष्ट्रातही मतचोरीचा प्रकार

Rahul Gandhi Press Conference Live :कर्नाटकमध्ये जे झाले ते महाराष्ट्र, हरियाणा अन् उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात झाले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने जागा जिंकल्या त्या ठिकाणाची मते हटवण्यात आली. आयोगाकडून सीआयडीला कोणताही माहिती दिलेली नाही.

Rahul Gandhi Live : कर्नाटकमध्ये मतांची चोरी कऱण्याचा प्रयत्न

Rahul Gandhi Press Conference Live :कर्नाटकमध्ये बाहेरून मत चोरी कऱण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १४ मिनिटात १२ मते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले. ३६ सेकंदात फॉर्म भरला अन् जमा केला गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला

Rahul Gandhi Press Conference Live :हायड्रोजन बॉम्ब येणार आहे : राहुल गांधी

Rahul Gandhi PC Live Updates: हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. सध्या त्यावर नाही तर मतचोरीवर बोलणार आहे. देशातील युवांसाठी हे महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाकडून मतचोरी लपवण्यात येत आहे. निवडणुकीत मतांची चोरी केली जाते, त्यानंतर मते डिलिट केली जातात, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Press Conference Live : मतांना हायजॅक केले जातेय - राहुल गांधी

Rahul Gandhi PC Live Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मतांना हायजॅक केले जातेय. टार्गेट करून काँग्रेसच्या मतांना कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्याकडे त्याबाबतचे पुरावे आहेत.

Rahul Gandhi Press Conference Live : राहुल गांधींचा आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप

Rahul Gandhi PC Live Updates: राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी उदाहरणं देत आयोगावर हल्लाबोल केला आहे. आयुक्तांच्या विरोधात माझ्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. मी देशावर अन् संविधानावर प्रेम करतो, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Press Conference Live: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

राहुल गांधी यांनी मतचोरीप्रकरणी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. कर्नाटकमधील उदाहरण देत गंभीर आरोप केले. मतचोरी होत असल्याचे माझ्याकडे १०१ टक्के पुरावे असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दलीत, आदिवासी अन् ओबीसी यांची नावे वगळली जात आहेत. कर्नाटकमधील आनंद मतदारसंघात ६०१८ मते वगळली. काँग्रेसच्या मतदारांना वगळले जातेय, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पंढरपुरात केळीचे दर घसरले

ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर केळीचे दर गडगडले आहेत. मागील महिन्यात स्थानिक बाजारात प्रति किलो 20 रूपये दराने विकली‌ जाणारी केळी आता फक्त सात ते आठ रूपये दराने विकली जात आहे. केळीचे दर पडल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत.

पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक घेतले जाते. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज सुमारे शंभर टन केळीची आवक झाली आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे बाहेरच्या राज्यात होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात केळीचे दर गडगडले आहेत.

कुर्सी की पेटी बांध लीजिए...राहुल गांधी कोणता बॉम्ब फोडणार? थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Pune News : पुण्यातील धायरीच्या विकासासाठी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच, ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांना घातला साष्टांग दंडवत

धायरीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ मोजणी करून रस्त्याची कामे त्वरित मार्गी लावा ही मागणी केल्यानंतर आयुक्त आणि स्थानिक खासदारांनी या भागाची पाहणी केली म्हणून धायरीतील नागरिकांनी आयुक्तांना थेट साष्टांग दंडवत घातले.

धायरीतील मुख्य चार डीपी रस्त्यांची मोजणी कागदावरच राहिली आहे.. भूमि अभिलेख विभागाचा गलथान कारभारामुळे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांचे काम रखडले आहे..यावर धायरी ग्रामस्थांनी विविध आंदोलने केली..

त्यानंतर त्याचीच परिणीती म्हणून आज पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करून लोकांचे म्हणणे ऐकून घेतले..

यावर त्वरित कारवाई करून प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन देण्यात आले. धायरी ग्रामस्थांच्या प्रचंड मागणीनंतर आयुक्तांनी पाहणी दौरा केला त्याबद्दल ग्रामस्थ धनंजय बेनकर सनी, रायकर निलेश आणि इतरांनी आयुक्तांना साष्टांग दंडवत घातले..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ऐतिहासिक पुराव्यासह जगासमोर मांडणाऱ्या व्यासंगी इतिहास संशोधक, मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे. ही इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. व्यासंग आणि अभ्यासातून त्यांनी शिवाजी महाराज आणि स्वराज्याविषयी अमुल्य अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यामुळे ते शिवचरित्रकार म्हणून अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युद्ध पत्रकार ते भारत इतिहास संशोधन मंडळात प्रवेश आणि पुढे युद्धशास्त्राचा अभ्यासक, इतिहास संशोधक म्हणून मेहेंदळे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असा राहिला. त्यांनी शिवकालीन इतिहास सप्रमाण मांडला. त्यांची ही संशोधन साधना, वैविध्यपूर्ण लेखन आणि सिद्ध झालेली ग्रंथसंपदा ही जगासाठी अमूल्य असा ठेवा आहे. त्यांचे शिवप्रेमींसह, पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मौलिक कार्य आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सखोल अभ्यासासाठी ते मोडी लिपी बरोबरच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषा शिकले. संदर्भ मिळविण्यासाठी, अभ्यासकांशी चर्चेसाठी ते भारतभर फिरले. यातून ‘Shivaji his Life and Times’ हा इंग्रजी तर ‘श्री राजा शिवछत्रपती’ या मराठी ग्रंथांची निर्मिती झाली. ‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’ या पुस्तकांमुळे अनेक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळाले. मेहेंदळे अनेकविध संस्थांचे मार्गदर्शक म्हणूनही महत्वाची भूमिका बजावत होते. इतिहास संशोधनाला अखंडपणे वाहून घेतलेल्या या मार्गदर्शक, व्यासंगी शिवचरित्रकाराचे निधन ही मोठी हानी आहे. मेहेंदळे यांच्या निधनामुळे या क्षेत्रात पोकळी जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने मेहेंदळे कुटुंबियांवर, त्यांचे संशोधक सहकारी, विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

MUMBAI | मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणातील आरोपी उपेंद्र पावसकर हा विक्षिप्त

मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणातील आरोपी उपेंद्र पावसकर हा विक्षिप्त

शेजारी राहणाऱ्यांच्या अनेक तक्रारी

शेजाऱ्यांची माहिती

कुटुंबातील सदस्यांना गेले अनेक वर्ष मारहाण करत असल्याची माहिती यामुळे उपेंद्र पावसकर हा गेले तीन वर्ष एकटाच राहत होता... 

कुटुंबातील वादामुळे एकटाच राहत असल्याची माहिती...

उपेंद्र पावसकर याला प्रभादेवी येथून घेतले ताब्यात... 

प्रभादेवी येथून दुपारीच उपेंद्र पावसकरला घेतलं ताब्यात... 

उपेंद्र पावसकर तीन वर्षांपासून प्रभादेवी येथे राहत होता...

NAVNATH BAAN |मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही -नवनाथ बन

मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपने नेहमीच लढा दिला आहे, ते मुंबईतील मराठी माणसाला ठाऊक आहे. आज मुंबईकर मराठी माणूस आत्मविश्वासाने उभा आहे. त्याला भीती दाखवायची गरज नाही, साथ द्यायची गरज आहे. आणि ती साथ फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजप देऊ शकते हे मुंबईकरांना ठाऊक आहे. पतपेढीच्या निवडणुकीत कोण जिंकलं? कोण हळकुंडानं पिवळं झालं? आणि कुणाचा बॅंड वाजला? हे मुंबईकरांनी बघितलं आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, तर विकासाच्या राजकारणाला मत देणार आहे. आणि त्यामुळेच महापौर मराठीच होईल पण तो मराठी माणूस भाजप-महायुतीचा असेल! 

Beed : बीडच्या आष्टी तालुक्यातील नांदा जिल्हा परिषद शाळेत पूर परिस्थितीमुळे शालेय साहित्य चिखलात

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला होता आष्टीच्या कड्यात महापूर आला होता आणि याचा फटका सर्वच गावांना बसला असून यामध्ये नांदा गावातही पूर परिस्थिती निर्माण झाली होती जिल्हा परिषद शाळा नांदा येथील शाळेमध्ये पाणी घुसल्यामुळे सर्वच शालेय साहित्य वाहून गेले आहे तर काही शिकलात आजही तसेच आहे संगणक त्याचबरोबर वाद्य साहित्य त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे टीसी असलेले रेकॉर्ड सर्व आता चिखलात पाहायला मिळत आहे शाळेमध्ये चिखल माय परिस्थिती झाली असून आम्हाला सरकारने तात्काळ मदत करावी जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी होत्याचे नव्हते झाला आहे शाळा ही आम्ही मॉडर्न करण्याचा प्रयत्न केला होता मात्र झालेल्या पूर परिस्थितीमुळे आमचं त्याचं नव्हतं झालं आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ आणि शिक्षकांनी दिली आहे शासनाने तात्काळ दखल घेऊन आम्हाला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

SOLAPUR - बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर

- बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर

- मांडेगाव, कांदलगाव, देवगाव सह 8 गावातील हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली

- कांदलगावात प्राथमिक आरोग्य केंद्रासह नरसिंह मंदिर ही गेले पाण्याखाली

- बार्शीतील चांदणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. 

- तर मांडेगावातही मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान 

 - बालाघाटच्या डोंगररांगातून वाहत असलेल्या या नदीला बार्शी तालुक्यासह भुम, वाशी आणि कळंब  तालुक्यात पडलेल्या पावसामुळे मोठे पाणी येते. 

- त्यामुळे या पट्ट्यात असलेल्या कळंब तालुक्यातील बांगरवाडी तसेच बार्शी तालुक्यातील चारे वालव, काटेगाव, आणि कळंबवाडी हे लघु प्रकल्प भरले आहेत. 

- तसेच बाभूळगाव हा बृहत लघु प्रकल्प मागील महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरला आहे. 

- या महापुरामुळे नदीपात्रातून पाणी बाहेर येऊन आगळगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, देवगाव,धस पिंपळगाव आणि शेवटी असलेल्या कांदलगाव मधील सोयाबीन, उडीद, मका ,कांदा, ऊस या पिकामधून पाच ते सात फूट पाणी वाहत आहे. 

BULDHANA - वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा...

बुलढाणा - समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार, बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे..  भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.. ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे...

SOLAPUR - दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना 

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना,शेतांना प्राप्त झाले तळ्याचे स्वरूप 

हातातोंडांशी आलेल खरीप पिक पूर्णतः गेलं पाण्याखाली,त्यामुळे शेतकऱ्याच अतोनात नुकसान 

उडीद,तूर,सोयाबीन,मूग सततच्या पावसामुळे पाण्याखाली असल्याने पिक लागले सडायला,शेतात साचले गुडगाभर पाणी 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप,निंबर्गी,कंदलगाव,तिऱ्हे,पाथरी,पा कणी,तेरामैल, परिसरातील शेतकऱ्यांना बसला फटका 

त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय 

BULDHANA - वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा...

बुलढाणा - समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार, बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे..  भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.. ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे...

DHARASHIV - लोहारा तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; नुकसानभरपाईची मागणी

धाराशिव च्या लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हवालदिल झाले असून यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.याबाबत शेतकऱ्यांनी लोहारा तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केलीय.सततच्या पावसामुळे मुग,उडीद ही कडधान्ये कुजून जमिनीवर टेकली आहेत.तुरीची वाढ खुंटून उबळून रानावरच जळत आहे.सोयाबीनच्या शेंगा गळून पडत असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.सद्यस्थिती ओला दुष्काळसदृश्य निर्माण झाली आहे. नगदी पिके हातची जात असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाला काहीही भाव मिळत नाही.शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी,शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी तसेच १०० टक्के पिक विमा मंजूर करून दिलासा द्यावा अशी केली जात आहे.

DHULE | अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

साक्री तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावर सुरपान गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली, माहिती मिळताच वनविभागाची टीम वैद्यकीय टीम सह घटनास्थळी दाखल झाली, व अपघातग्रस्त मादी बिबट्याची तपासणी केली असता मादी बिबट्या मृत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले,

BULDHANA - टाकळी पंच या गावाचा पातुर्डा गावाशी संपर्क तुटला

बुलढाणा  - संग्रामपूर तालुक्यातील टाकळी पंच रसत्यावर मोरवाच्या नाल्यावरिल् पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नदीला पूर येतो त्यामुळे रूग्ण, विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे..... आजही या नदीला पूर आल्याने पातूरडा या गावशी तीन गावांचा संपर्क तुटला आहे .. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे... टाकळी पंच ग्रामस्थांची मोरवाच्या पुलाची उंचीची उपेक्षा कायम असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजे आहे...

jalgaon News : वाघूर'ची 'शंभरी' अन् जळगावकर सुखावला नागरिकांची पावले धरणाकडे शहराची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली

जळगाव जामनेरातील वाघूर मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरला आहे. वाघूरची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. हा प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरला आहे. वाघूरच्या जलसाठ्याने जळगावकर सुखावले असून, शहराची पुढील दोन वर्षांची चिंतामिटली आहे.वाघूरमधून जळगाव, जामनेर शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच लहान उद्योग व भुसावळ, जळगाव तालुक्यातील रब्बीसही त्यातून पाणी दिले जाते. वाघूर नदीला चांगला पूर आला आहे. मागील दोन-तीन दिवस अजिंठा डोंगररांगा, सातमाळा भागात जोरदार पाऊस झाला आहे. वाघूरमध्ये मागील आठवड्यात सुमारे ६१ टक्के जलसाठा होता. तो दोन दिवसांत ९० टक्क्यांवर पोचला.वाघूर धरण १०० टक्के भरले.

hingoli Live News Update:  हिंगोलीत बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी एसटीची तोडफोड करत चालकाला केली मारहाण

हिंगोलीत एसटी बसच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे लिंबाळा एमआयडीसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करत चालकाला बेदम मारहाण केली आहे हिंगोली आगाराची ही बस आहे औंढा नागनाथ येथून हिंगोली कडे येत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी बस चालकाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून अपघातात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे

Maharashtra Live News Update:  नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रायगडच्या पेणमध्ये साकारल्या जात आहेत देवींच्या मुर्ती

गणपतीचे गाव असलेल्या पेणमध्ये गणेशोत्सवानंतर आता देवींच्या मुर्ती साकारल्या जात आहेत. सर्वांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक गरबा मंडळ देवींच्या मुर्तीची स्थापना करतात. या देवींच्या मुर्तींना पेणमधील कार्यशाळांमध्ये रंगकाम आणि सजावटीचा शेवटचा हात मारला जात असून रंगांबरोबर खरी साडी, दागीन्यांचा साज मुर्तींच्या सजावटीसाठी वापरला जात आहे. भक्तांच्या मागणी प्रमाणे आष्टभुजा, वाघजाई, महाकाली, म्हैशासुर मर्दिनी देवीच्या या मुळ रूपासह कोंबडा, हत्ती, राजसिंहासनावर बसलेल्या देवीसह अनेक रूपातील देवींच्या मुर्तींची मागणी आहे. 10 ते 12 फुट उंचीच्या या मुर्ती बनवल्या जात असून कोकण, मुंबई, पुणे, सातारा, सांगली आदी सर्व महाराष्ट्रात पेणमधून पुढील दोन तीन दिवसात मुर्ती रवाना होणार आहेत.

jalna Live News Update:  जालना जिल्ह्यात पावसाचा कहर, जालन्यात अतिवृष्टीचा तब्बल 93 हजार हेक्टरवरील पिकांना फटका....

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल 93 हजार 793 हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यामध्ये झालय.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात हि आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जालना जिल्ह्यातील 93 हजार 793 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीन , मूग या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे..

pune Live News Update:  श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ. भाविकांना झाला आनंद. दिवसभरात मारणार सात फेऱ्या...

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू नगरीपासून त्यांच्या तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा डोंगरापर्यंत आता भाविकांसाठी थेट बससेवा उपलब्ध झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) सुरू केलेल्या या बससेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

buldhana Live News Update:  मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण - बुलढाण्यात शिवसेनेचे निषेध आंदोलन, राज्यपालांकडे निवेदन

दादर येथे दिवंगत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले व घोषणाबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

यावेळी शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी सांगितले की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अपमान आहे. अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.”

dharashiv Live News Update:  धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 198 कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठवली

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 198 कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती.आता स्थगिती उठवण्यात आली असुन या संदर्भात लवकरच परिपञक जारी होईल अशी माहीती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलीय.जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती.त्या संदर्भात मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील व आणि माझ्यात बैठत पार पडली असुन स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टरांची संघटनांचा आज राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

राज्य सरकारने राज्यातील सी सी एम पी हा आधुनिक वैद्यक शास्त्रातील एक वर्षाचा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदणी बुकात करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा ऍलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करू शकणार आहेत. याला विरोध म्हणून राज्यातील ऍलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन व संलग्नित संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याला अनुसरून आज राज्यातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालय बंद असणार आहेत. यात बाह्य रुग्णसेवा शस्त्रक्रिया बंद असणार आहेत. यामुळे मात्र राज्यातील रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या 24 तासाच्या संपात आकस्मित सेवा वगळण्यात आली आहे. राज्यातील जवळपास दीड लाख ऍलोपॅथी डॉक्टर एक दिवसाच्या संपावर जाणार असल्याने याचा मोठा परिणाम मात्र आज दिवसभर दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खान गुन्हेगार आहे...; दबंग दिग्दर्शकाने खान कुटुंबावर लावले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT