Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५, राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश बन्सिलाल घायवाल (उर्फ गायवाड) आणि त्याच्या अनुयायांविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी कृत्यांचा उदात्तीकरण करून समाजात भीती निर्माण करण्याच्या हेतूने चिथावणी देणे व उत्तेजन देण्याबद्दल पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मालेगावात किराणा दुकानातून गांजाची विक्री

नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील सौंदाणे गावातील इंदिरा नगर शिवारातील एका किराणा दुकानात गांजाची विक्री होत असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता पथकाने छापा मारत श्री गणेश किराणा दुकानावर छापा मारत दुकानातून तब्बल १ लाख ७८ हजार ४०० रुपयाचा ८ किलो ९३० ग्रँम गांजा जप्त केला

गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई

गांजा विक्री करताना दोघांना केले अटक

मुसाब इलाही शेख कोथरूड वय 35 तर दुसरा आरोपी तेजस पूनमचंद डांगी वय 33 नऱ्हे या दोघांना केली अटक

या दोन्ही आरोपींवर अगोदर गुन्हे दाखल आहेत

मुसाफ इलाई शेख बेकायदेशीर रित्या गांजा स्वतः जवळ बाळगून तो विकत होता त्याच्या ताब्यातून 878 ग्राम गांजा ज्याची किंमत बारा हजार दोनशे साठ रुपये एवढे आहे

पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू. परतीच्या पावसाचा पालघर मधील भात शेतीला फटका . हजारो हेक्टर होत असलेल्या भात शेतीला परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता. परतीच्या पावसामुळे पालघर मधील भात उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

मंत्री छगन भुजबळ यांच्या बीड मधील महानगर मेळाव्याच्या सभेपूर्वी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची गेवराईच्या उमापुर मध्ये सभा

Baramati : शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुद्धा शरद पवार, अजित पवार एकत्र

काका-पुतण्या यांची एकाच दिवसात २ कार्यक्रमात लावली एकत्र हजेरी

आधी विद्या प्रतिष्ठान च्या सर्वसाधारण सभेनंतर आता माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Satara : साताऱ्यातील पाटण पंचायत समितीत एकाला महिलांनी दिला चोप

साताऱ्यातील पाटण पंचायत समिती कार्यालयात एकाला महिलांचे चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने बचत गटाच्या महिलांना अर्वाच्य व अश्लील भाषा वापरल्याने तसेच छेडछाड काढल्याने महिलांनी विकास हादवे याला चोप दिला आहे. सदरचा प्रकाराची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून विनयभंग छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rain : मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची तारांबळ

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Pandharpur : सोलापूर आणि सांगली सरहद्दीवर असलेल्या सदगुरू साखर कारखान्यावर अज्ञांनी केला हल्ला

सोलापूर आणि सांगली सरहद्दीवर असलेल्या सदगुरू साखर कारखान्यावर अज्ञांनी केला हल्ला....

किरकिळो वादानंतर स्थानिकांनी काल रात्री कारखान्याच्या कार्यालयाची केली तोड फोड....

कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक, काचेची कपाटे असे सर्व साहित्याची तोडफोड करून केली नासधूस

या तोडफोडीमध्ये कारखान्याचे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज....

Baramati : बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार, अजित पवार एकत्र

बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुद्धा शरद पवार, अजित पवार एकत्र

काका पुतण्या यांची एकाच दिवसात २ कार्यक्रमात लावली एकत्र हजेरी

आधी विद्या प्रतिष्ठान च्या सर्वसाधारण सभेनंतर आता माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Chandrapur : चंद्रपुरात ६९ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली

चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचा कलश होता. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले. समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध संचलन लक्षवेधी ठरले.

Pune : गुंड निलेश घायवळ प्रकरणी पुणे पोलिसाची पत्रकार परिषद सुरू

Buldhana : रद्द केलेले दाखले जन्म, मृत्यू दाखले जमा करण्यास नागरिकांनी फिरविली पाठ

रद्द केलेले दाखले जन्म, मृत्यू दाखले जमा करण्यास नागरिकांनी फिरविली पाठ ..

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून काढले रद्दचे आदेश....

मलकापूर नगर परिषद हद्दीतील 717 जणांनी अद्याप दाखले जमा केले नाही ..

Thane : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २४५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान

दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या ९२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Pune : गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक

गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई

गांजा विक्री करताना दोघांना केले अटक

Baramati: सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उशीर झाल्यामुळे सुप्रिया सुळे थेट दुचाकीवर पोहचल्या

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्व साधारण सभेला शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार उपस्थितीत

Kolhapur: 'स्वाभिमानी'ची 24 वी ऊस परिषद सुरुवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ऐतिहासिक २४ वी ऊस परिषदेला सुरुवात झाली आहे. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातून शेतकरी हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. राजू शेट्टी पहिली उचल किती मागणार, याकडे राज्यासह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागून राहिले आहे. या ऊस परिषदेत पहिल्या उचलसह विविध मागण्या केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर एकरकमी

एफआरपी, महापूर, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाकडून मिळणारी भरपाई, यावर चर्चा होणार आहे. वाढती महागाई, कर्जमाफी, उसाचा दर, यासह विविध बाबींबर चर्चा होणार आहे. यात राज्यासह सीमाभागातील शेतकरी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. या ऊस परिषदेच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nandurbar: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

सातपुडा पर्वतरांगेतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला दिनांक 18 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. यावर्षी संपूर्ण यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याने वॉच ठेवला जाणार आहे ​यात्रेच्या नियोजनासाठी अस्तंबा येथे ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला.

Ahilyanagar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने उद्या काळी दिवाळी साजरी

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे मात्र सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केली ती देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने उद्या राज्यात काळी दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. आता तरी सरकारला जाग येईल यासाठी उद्या सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात असल्याचे लंके यांनी म्हटल आहे.

Ahilyanagar: नाशिक- पुणे महामार्गावरा एसटी बसला अपघात, १० प्रवासी जखमी 

अहिल्यानगर -

एसटी बसला अपघात

नाशिक- पुणे महामार्गावरील घटना

चंदनापुरी घाटात एसटी बस उलटली

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील घटना

बस मधील नऊ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी

Bhandara: भंडाऱ्यात स्कूल व्हॅनला भयंकर अपघात,  10 विद्यार्थी जखमी

भंडारा -

भंडाऱ्यात नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटल्यानं 10 विद्यार्थी जखमी

खमारी ते सुरेवाडा मार्गावरील घटना

Parbhani: परभणीतील कोक गावात दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना उलटी-जुलाबाचा त्रास

परभणी -

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यातून गावकऱ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास

मागच्या ४ दिवसांत गावातील १३९ जणांना लागण

गावामध्ये भीतीचे वातावरण

Hingoli: अमेझॉनमधून महागड्या वस्तू खरेदी केल्या,  पार्सल फोडले तर निघाला कचरा

हिंगोली-

अमेझॉन मधून महागड्या वस्तू खरेदी केल्या पार्सल फोडले तर निघाला कचरा

हिंगोली च्या कळमनुरी शहरातील राजू कांबळे या तरुणाची फसवणूक

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत माहिती दिली

नागरिकांनी सावध राहण्याचे केले आवाहन

Nagpur: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व,  शिवसेनेचा गंभीर आरोप

- रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या गुंडागर्दी, वसुली, मारझोड, दहशतगर्दी आणि माफियाराजच्या आरोप करत शिवसेनेने आज तीव्र हल्लाबोल केला.

- नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे व कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व वाढल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

- गॅंग्स ऑफ वासेपूर प्रमाणे वसुली आणि अवैध कब्ज्यांचा कारभार स्टेशन परिसरात सुरू असल्याने तक्रारदारांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे आरोप केला

- या सर्व प्रकारांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी डीआरएम विनायक गर्ग यांच्या विरोधात डीआरएम कार्यालयावर घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.

- यावेळी आंदोलकांनी गेटवर चढ़त घोषणा दिल्यात...

Pune: दिवाळीच्या तोंडावर गर्दीचा फायदा घेत पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट

पुणे -

दिवाळीच्या तोंडावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट

राजगुरुनगर येथे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर महिलेची पर्स हिसकावून पाळणाऱ्या अटल चोरट्याला नागरिकांकडून बेदम मारहाण

खेड पंचायत समितीच्या गेट समोर वाडा रस्त्यावर घडली घटना.

चोरट्याला दिले पोलिसांच्या ताब्यात

Amravati: अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर शेकडो कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन....

अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर शेकडो कंत्राटदार व पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन....

कंत्राटदारांचे 18कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदार व मजूर आक्रमक...

अमरावती जिल्ह्यातील संतप्त कंत्राटदार व त्यांचे कर्मचार घुसले कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकायत ..

उद्यापासून संपूर्ण अमरावती जिल्हा व अमरावती शहरातील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा...

जवळपास एक वर्षापासून कंत्राट दाराचे 18 कोटी देयके थकल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ

Malegaon: मालेगाव शहरात ड्रग्स तस्करी करणारे तिघे अटक; किल्ला पोलिसांची धडक कारवाई

मालेगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या अंमली पदार्थ एम.डी. पावडरची विक्री करणाऱ्या तस्करांवर कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरापुर मैदान परिसरात काही इसम एम.डी. पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला..कारवाईदरम्यान तिन्ही आरोपींकडून सुमारे ₹ ५,८२,२०० रुपये किमतीचा १४५ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली.या कारवाईत अल्ताफ इब्राहिम मुईन अहमद (वय २९) जलाल अहमद मोहम्मद हनीफ शेख (वय ३२) मोसीन खान नैनुल्ला खान (वय ३७) या तिघांना ताब्यात घेतले असून चौथा आरोपी परचेन सध्या फरार आहे.या प्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Ahilyanagar: अहिल्यानगर दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा स्कूलबसच्या ड्रायव्हरने केला विनयभंग...

शाळा सुटल्यानंतर घरी सोडताना एकटी पाहून लज्जा उत्पन्न होईल असे केले कृत्य..

शहरातील उपनगर भागातील तपोवन रोड येथील घटना..

बाळू दादा वैरागर असे स्कूल बसच्या ड्रायव्हरचे नाव..

तोफखाना पोलिसांनी संबंधित ड्रायव्हरला घेतले ताब्यात..

तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल..

या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण..

Raj Thackeray: राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ ऑक्टोबर रोजी मेळावा घेणार आहे. राज ठाकरेंनी काल निवडणुक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते आता मेळावा घेणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या मेळाव्यासाठी गेवराई मधनं 500 गाड्या दाखल होणार

मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी समाजाचा आक्रमक झाला आहे मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती महा एल्गार मेळाव्याच आयोजन केला असून या मेळाव्यासाठी गेवराई मतदार संघातून 500 हून अधिक गाड्या मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत अशी माहिती माजी आमदार नारायण मुंडे यांचे चिरंजीव सुघोष मुंडे यांनी दिली आहे त्याचबरोबर सरकारने तात्काळ जी रद्द करून ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी ही सुघोष मुंडे यांनी साम टीव्ही विषय बोलताना केली आहे.

राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाबाहेर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची

देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाबाहेर पायलट कार पोलिस बंदोबस्त लावण्यावरून एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चांगली बाचाबाची झाली आहे. शिस्त आणि आज्ञा प्रिय अशी आपल्या देशात आणि राज्यात पोलीस खात्याची ओळख आहे. मात्र रक्षा मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा पाहायला मिळाला आहे. रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या सुरक्षा ताब्यातील एक पायलट कार योग्य ठिकाणी लावण्याचा सूचना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून कनिष्ठ अधिकारी आपला वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद घालताना या विडियो मध्ये दिसत आहेत. हा सगळा प्रकार माध्यमांनी आपल्या कॅमेरा मध्ये कैद केला आहे. आता अशा बेसिस्त पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस विभाग नेमकी काय कारवाई करते ते पाहणे तितकच महत्वाचं असणार आहे.

पुण्यात चोरांचा सुळसुळाट! भीमा कोरेगाव परिसरात पहाटे फॉर्च्युनर चोरी

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरातून पहाटे वाहन चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव भीमाचे सरपंच यांची फॉर्च्युनर कार आज पहाटे च्या सुमारास चोरीस गेली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर.चोरट्यांनी फॉर्च्युनर गाडी क्रमांक MH 12 TH 9955 घेऊन फरार झाले आहेत.

या चोरीत चोरट्यांनी वापरलेली गाडी किया क्रमांक MH 25 AS 1199 असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur: जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेची मुख्यमंत्री निवासाकडे पगाराची भीक मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन पदयात्रा

- बुट्टीबोरी MIDC मधील मोरारजी टेक्साईल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यापासून वेतन थकीत आहे...

- दिवाळी तोंडावर असताना पगार थकल्याने कामगार अडचणीत...

- नागपूरमधील मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान रामगिरीवर काढला आहे मोर्चा

- बुट्टीबोरी ते रामगिरी 40 किमी अंतर कामगार मोर्चा दुपारी मोर्चा रामगिरीवर धडकण्याची शक्यता....

गोकुळवर मोर्चा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने डीबेंचरपोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे... एकूण 136 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळ ने जाहीर केली होती... त्यातील तब्बल 40 टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आलेली आहे..

विक्रोळी कन्नमवार नगरात धुळीचे साम्राज्य रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

विक्रोळी कन्नमवार नगरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले यातच या संपूर्ण मार्गावर धुळ पसरली आहे यामुळे या मार्गावरील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्या धुळेने माखल्या आहेत व या धुळेमुळे विक्रोळी नगरातील रहिवाशांना सर्दी, खोकला अशा अनेक आजारांना आता सामोरे देखील जावे लागत आहे यावर समाजसेवक डॉ योगेश भालेराव यांनी संताप व्यक्त करत नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

SINDHUDURG -सिंधुदुर्गात भाजपचा स्वबळाचा नारा. शिंदेच्या शिवसेनेसमोर आव्हान उभ करणार ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा दावा भाजपाचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष असेल असा दावाही त्यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मनीष दळवी हे मंत्री नितेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे त्यांच्या दाव्याला महत्त्व प्राप्त झाल आहे.

यंदा पवार कुटुंबीयांचा बारामतीत दिवाळीत पाडवा कार्यक्रम होणार नाही

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत दिली माहिती

भारती प्रतापराव पवार यांचे निधन झाल्यामुळे यंदा पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा घेतला निर्णय

बारामती मधील गोविंद बागेत यंदा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार नसल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे

दरवर्षी राज्याच्या अनेक भागातून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गोविंद बागेत येत असतात

हॉटेलवर थांबलेल्या यात्रेकरूंची पर्स चोरट्याने पळवली.

हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या यात्रेकरूंची पर्स चोरट्याने पळवली. नांदेडच्या अर्धापूर शहरातील हॉटेलवर ही घटना घडली. बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील महादेव गिरी हे माहूरच्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते.नांदेड ते नागपूर महामार्गावरील अर्धापूर येथील किसान पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या हॉटेलवर चाय पिण्यासाठी थांबले होते. छोटा हत्ती या प्रवासी गाडीमध्ये सर्व साहित्यांसोबत पर्स देखील होती. चोरट्याने या गाडीमधील पर्स लांबविली. पर्समध्ये अडीच तोळे सोने, 40 हजार रुपये आणि दोन मोबाईल चोरट्याने लंपास केले. या चोरट्याचा शोध अर्धापूर पोलीस घेत आहेत.

MUMBAI - दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही भाजपचं भव्य कार्यालय होणार

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही भाजपचं भव्य कार्यालय होणार

मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन

चर्चगेट परिसरात भाजपचं नवीन कार्यालय तयार होणार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १८ ऑक्टोबरला होणार भूमिपूजन 

सोलापुरातील महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला टार्गेट करताना शासनाने केलेली अतिवृष्टी असल्याची टिका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिला आहे. सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात सभेत बोलताना प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

संभाजीनगरमध्ये २५ वर्षाच्या तरूणाची हत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागद गावातील २५ वर्षीय तरुणाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. नागद गावातील ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपीजवळ ही घटना घडली. शुभम राजपूत शुभम रणवीरसिंह राजपूत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आहे. दोघे घटनेनंतर फरार झाले आहेत. अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम आणि अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत, सतीश संतोष राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अमोल हा रात्री अपरात्री गल्लीत राहण्यास आलेल्या एका व्यक्तीकडे येत होता. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचे म्हणत शुभमने त्याला हटकले होते. त्याचाच राग मनात धरून अमोलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी रात्री शुभमच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खून केला.

बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याची तयारी

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा होणार आहे.. या सभेची तयारी आता बीडमध्ये वेगाने सुरू असून गावोगाव बैठका घेतल्या जात आहेत.याबरोबरच बीड शहरासह जिल्हाभरात बॅनर्स लावण्यात आले असून बीडच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज क्रीडांगणावरती ही सभा होणार आहे या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, आ.धनंजय मुंडे, आ.गोपीचंद पडळकर,प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सुभाष राऊत यांनी दिली आहे

nashik-malegaon-मालेगाव वाहतूक पोलिस अँक्शन मोडवर,रात्रीची होतेय कारवाई

नाशिकच्या मालेगाव मधिल वाहतूक पोलिस आता अँक्शन मोडवर आले असून वाहतूकीचे नियम न पाळणारे,ट्रिपलसीट,वाहतूक कोंडी या समस्यांमुळे शहरातील बेशिस्त वाहतूकीमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूकीचा बोजवारा उडत असल्याने प्रत्येक गर्दीच्या रस्त्यांवर दोन वाहतूक पोलिस व एक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे,रात्रीची पोलिसांकडून कारवाई करण्यात येऊन एकाच दिवसात ९४ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन दंडापोटी एक लाख रुपये जमा करण्यात आले.

RCF आंदोलन प्रकरणी आ. महेंद्र दळवी यांच्यासह आंदोलनकर्त्यांवर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अलिबाग येथील RCF कंपनी विरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलना प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, भडकाऊ भाषण आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यासह आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे. अलिबाग रेवस मार्गावर थळ येथे RCF कंपनीच्या गेटवर मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले होते. RCF प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आ. महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वा खाली RCF गेटसमोर रास्ता रोको करून आंदोलकांनी सुमारे 5 तास वाहतुक रोखून धरली होती. कंपनी प्रशासनाचा निषेध करीत यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर देखील जाळण्याचा प्रयत्न केला.

दिवाळीचा खमंग फराळ पाठवा विदेशात पोस्टाची खास योजना

घरोघरी सध्या दिवाळी सणाची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्याची उत्तम सोय उपलब्ध व्हावी, यासाठी टपाल खात्याने 'खास योजना' आणली आहे. त्यात टपाल खात्याने आपल्या दोन महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत.टपाल खात्याने आता रजिस्टर आणि स्पीडपोस्ट या दोन सेवांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. टपाल खात्याने फराळ परदेशी पाठवण्यासाठी विशिष्ट दरपत्रक लागू केले आहे. ही सेवा अमेरिका व कॅनडा सोडून जवळपास 192 देशांसाठी उपलब्ध आहे. तर अन्य देशांसाठीही वेगवेगळे दरपत्रक लागू करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात विशेष काऊंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन टपाल खात्याने केले आहे

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात तब्बल ४१३ पदे रिक्त

- मध्यभारतातील सर्वात मोठं रुग्णालय अशी ओळख, लगतच्या राज्यातून गरीब रुग्ण येतात उपचारासाठी..

- वैद्यकीय अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची प्रदिर्घ काळापासून पद भरती झालेली नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचा दिवाळी सण आनंदात जावा यादृष्टीने महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 34,500/- तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 28,500/- आणि आशा वर्कर यांना रु. 18,500/- रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना रू. 34,500/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

- नाशिकमध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न

- राजकीय गुंडांच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर

- गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर पालिका चालवणार हातोडा

- अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा

- नाशिक मनपाचा अतिक्रमण विभाग कारवाईसाठी बुलडोझर घेऊन दाखल

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळालाय.. कारण, अकोल्यात ऑगस्ट महिन्यात 1 लाख 6 हजार 576 हेक्टर क्षेत्रावर झालेल्या नुकसान भरपाईसाठी आता 91 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे. यामध्ये 1 लाख 20 हजार 466 बाधित शेतकऱ्यांचा समावेश असणारेय. मात्र, शासनाने पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या 3 हेक्टरऐवजी तूर्तास 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मदत मंजूर झालीय. त्यामुळ शेतकऱ्यांना वाढीव मदतीची प्रतीक्षा मात्र, कायमच असणार आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यात या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते...

पीक : हेक्टरी नुकसान.

सोयाबीन : 46,432

कापूस : 47,409

तूर : 11,612

सरकारला मोठा दिलासा

पालघर - केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्प उभारणीच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा . बंदराच्या उभारणी कामाला स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . लवकरच बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची माहिती . कामाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदराच्या उभारणीचे काम सुरू होणार असल्याची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची माहिती .

राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही - राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवले पाहिजे - रूपाली चाकणकर

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या केलेली टीका आणि त्यानंतर दिलीप पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बाबत करण्यात आलेली टीका,ही अत्यंत चुकीची आहे,असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि राजकारणामध्ये अशी टीकाटिप्पणी करणे योग्य नाही,असे देखील रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट करत याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार झाली असती तर टीका करणाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्यास त्या असे देखील चाकणकर यांनी सांगितले आहे, सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

जुन्नर वनपरिक्षेत्रात १२०० बिबट्यांचे वास्तव्याचा अंदाज

आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीनंतर अजित पवार यांनी सांगितले की, ५० बिबट्यांना वनतारा दिला जाणार असून तब्बल १२५ बिबट्यांना बंदिस्त करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

याशिवाय बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, राज्य सरकार या प्रस्तावाचा सक्रिय पाठपुरावा करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली

अंबरनाथ शहरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक ही गुजराती हॉलमध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली अंबरनाथ शहराचा आरक्षण पडल्याने आज ही बैठक आयोजित केली आहे या बैठकीत प्रत्येक प्रभागात एक कमिटी स्थापन करून त्याचा अहवाल हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कडे देण्यात येणार आहे तसेच मतदार याद्यांवर काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या हे जे लोकनिवडून येतात ते लोक भावनेतून नसून मतदार यादी केलेल्या घोळामध्ये निवडून येतात त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही ताकतीने उभी असणार मतदानच्या दिवशी जो कुणी बनावट मतदार म्हणून येईल त्याच्या पायावर तो घरी जाणार नाही असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे तसंच यावे अंबरनाथ शहरात मनसेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला जाणार आहे.

पुण्यातील शिरूरमध्ये वादळी पावसाची हजेरी

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे ओतुर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जुन्नर तालुक्यातील ओतुर परिसरात रात्री ढगांचा गडगडाटसह अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळी जुन्नर तालुक्यातील ओतुर बाजार समिती परिसरात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, कांदा आणि तरकारी माल पावसात पूर्णपणे भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

आधीच कांद्याला बाजारभाव नसताना, आता पावसाच्या आसमानी संकटाने शेतकऱ्यांची भरपाईची आशा धुसर झाली पावसाच्या या अनपेक्षित आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि निराशेचं वातावरण निर्माण झालंय

अकोल्या गुंडाची धिंड काढली

अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये कुख्यात गुंड शिवम उर्फ शिवा निलखन याची पोलिसांनी शहराच्या रस्त्यांवरून धिंड काढलीय. शिवाची पातूर शहरासह लगतच्या शिर्ला गावात प्रचंड दहशत आहेय. खुन, खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेयेत. शिवाने एका युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण केली होतीय. यानंतर शिवाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर त्याने हल्ला चढवलाय. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होताय. आज अखेर ठाणेदार हणमंत डोपेवाड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शिवाची धिंड काढलीय. यामुळे शिवाची गावातील दहशत कमी होण्यास मदत होणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

Maharashtra Live News Update: पुण्यातील शेकोटी बंदी असताना अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

SCROLL FOR NEXT