Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेलची बचत करा, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

- दोन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती

-दरोडा टाकण्यासाठी दुकानावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक परिसरात चार तासात दुसरा भीषण अपघात

खाजगी बसची तीन ते चार वाहनांना जोरदार धडक

अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही

अपघातग्रस्त बस चालक पोलिसांच्या ताब्यात

Nagpur: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

नागपूर -

नागपूरच्या तापमानात कालच्या तुलनेत 1 अंशाने वाढ होत तापमानाचा पारा 45 अंश वर पोहचला

विदर्भातील चार जिल्ह्यात तापमान 45 पार तर इतर जिल्ह्यात 40 पार पोहचल

विदर्भात सूर्य देवता आग ओकत आहे

विदर्भातील तापमान

अकोला - 45.4

अमरावती - 45.6

वर्धा - 45.5

नागपूर - 45.00

बुलढाणा - 41.00

चंद्रपूर - 43.8

गोंदिया - 40.00

गडचिरोली - 42.6

यवतमाळ - 43.6

वाशीम - 42.5

भंडारा - 42.00

Thane: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

ठाणे -

ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक मनोज शिंदे यांनी महासभेत राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांडून करण्यात आला आहे

मनोज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या साठी भाजपाच्या नगरसेवक पायी चालत नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन मनोज शिंदे यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावी अशी तक्रार करणार आहे.

Raigad: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

रायगड -

० मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात

० ट्रक मधील सामान आणि पेंट सदृश्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीस अडथळा

० मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसलिंक जोड रस्त्यावर अपघातामुळे वाहतुक कोंडी

० अपघातामुळे केवळ एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लागल्या रांगा

० अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती

० पोलिस, बचाव आणि मदत पथक घटना स्थळी दाखल

Yavatmal: यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपूर येथे बदली

यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक म्हणुन नित्यानंद झा असणार आहे.

दोन वर्षांच्या कार्यकाळात मावळते पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत समाजोपयोगी उपक्रम राबवत हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.

त्यांच्या कार्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता त्यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा अशी मागणी करत त्यांचा निषेध करण्यात आला आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरची जाळपोळ करण्यात आली..यावेळी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.“नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं.या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

सीबीआयकडून लातूर मधील खाजगी क्लास चालकाची तब्बल 9 तास कसून चौकशी

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआ कडून लातूर मधील नामांकित खाजगी क्लास चालकाच्या घराची झडती घेतली आहेत, पहाटेपासून तब्बल 9 तास सीबीआयने चौकशी केली आहे, तर या चौकशीत बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने, काही विशिष्ट आर्थिक देवाण-घेवानाची देखील चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. एकूण आठ लोकांच्या पथकाने ही, चौकशी केली , दरम्यान नीट पेपर फुटी संदर्भात थेट कुठलीही माहिती अद्याप समोर आली नाही मात्र, नीट पेपर फुटीच्या संशयावरून सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून आहे. तर रात्री पुन्हा उशिरा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. बँक व्यवहार, काही महत्त्वाचे कागदपत्र, ताब्यात घेतले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

TCS प्रकरणातील पाचही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

- सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीच राहणार

* TCS कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीसह अन्य पाचही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

- पाचही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात दाखल केला होता अर्ज

- TCS कंपनीतील आरोपींवर लैंगिक अत्याचारासह धार्मिक भावना दुखावण्याचे आरोप

- प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, असिफ अन्सारी, अश्विनी चेनानी अशा सर्व आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

-चांदवड टोलनाका अपघात विभागातील ७५ कामगारांच्या नोकरीवर कुऱ्हाड, संतप्त कर्मचाऱ्यांनी सुरु केले साखळी उपोषण

नाशिकच्या चांदवड-धुळे या महामार्गावरील अलसेल्या मंगरुळ येथ्ल अपघात विभागातील सुमारे ७५ कामगारांनी आज पासून साखळी उपोषणाला सुरुवात केलीय.गेल्या १८ वर्षा पासून हे कामगार सोमा टोल कंपनी मध्ये कार्यरत होते.मात्र नविन टेंडर घेतलेल्या कंपनीने या कामगारांनी कामावरुन कमी केल्याने कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून या कामगारांना पुर्वत कामावर घ्यावे या मागणीसाठी शिवक्रांतीव टोल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हे साखली उपोषण सुरु केले आहे.कामगारांच्या याउपोषणामुळे महामार्गावर अपघात झाल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होणार आहे.

अंबरनाथमध्ये पाईपलाईन वॉलला गळ

लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया

उंच फवाऱ्यांनी नागरिक हैराण

अंबरनाथच्या लादी नाका परिसरातील घटना

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले...

पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी...

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारातील प्रकार...

अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या संशयावरून राडा...

एका गटाने मुलीच्या विवाहाबाबत आक्षेप घेतल्याने राडा झाल्याची प्राथमिक माहिती...

शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत...

पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण...

पोलिसांनी हस्तक्षेप करत 4 ते 5 जणांना घेतले ताब्यात...

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना सोसाव्या लागत आहेत पाणीटंचाईचा झळा

मे महिना सुरू झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत, उन्हाळा सुरु झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याला पाणी टंचाईचा सामना दरवर्षी करावा लागत असतो, यावर्षी देखील शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे आणि डाबली या गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत,

mumbai : शिवालयाबाहेर आंबा उत्पादकांंचं आंदोलन 

शिवालयाबाहेर आंबा उत्पादकांंचं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंबा, काजू उत्पादक आंदोलकांची धरपकड केली.

TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

- TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

- संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार

- यापूर्वी सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा पूर्ण झाला आहे युक्तिवाद

- युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल ठेवला होता राखून

- आज TCS कंपनीतील प्रकरणात निदा खान वगळता इतरांच्या जामीन अर्जावर येईल निकाल

- थोड्याच वेळात संशयितांना दिलासा मिळणार की न्यायालय जामीन अर्ज फेटाळणार? यावर येईल निर्णय

Borivali fire : बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलला लागली आग

मुंबईच्या बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

pimpri : राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची मात्र टीका

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक थेट बैलगाडीने पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल झालेत. आजच्या सर्व साधारण सभेला हजेरी लावताना पंतप्रधानांच्या आवाहनाला त्यांनी असा प्रतिसाद दिलाय. मात्र महायुतीतील भाजप पालिकेत उधळपट्टी करुन पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासत आहेत, अशी टीका या नगरसेवकांनी केलीये.

Devendra Fadnavis : एका वर्षात पाच लाख घरे, हे ग्रामविकास मंत्राचे देशातील रेकॉर्ड : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

गरिबांचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ज्यांनी आग अशा प्रकारची लावली होती. त्यामुळे सर्वांना स्फुरण मिळालं, अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मला अतिशय आनंद होत आहे. साताऱ्यातील आमचे सर्व मंत्री आणि आजचा जो कार्यक्रम 30 लाख घरांच काम आम्ही करत आहोत. त्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष करून अभिनंदन करतो. कारण एका वर्षात पाच लाख घरे ही भारतात सुद्धा कोठे बांधली गेली नाहीत, हा रेकॉर्ड आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

पुणे हडपसर हॉस्पिटल बॉम्ब प्रकरण, आरोपीने गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती 

- पुणे हडपसर हॉस्पिटल बॉम्ब प्रकरण

- नागपूर ATS ने केली आरोपीला अटक.. रेल्वे स्टेशनवरून केली अटक

- शिवाजी राठोड असं आरोपीचे नाव...मूळचा सोलापूरचा

- गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती

अमरावतीत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

आरोग्य यंत्रणा खोळंबली, २ महिन्यांचं रखडलेले वेतन आणि ९ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी

ऐन उन्हाळ्यात डॉक्टरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचा कारभार पूर्णपणे खोळंबला असून रुग्णांचे हाल

आम्ही रुग्णसेवा करायला तयार आहोत, पण आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे काय? असा संतप्त सवाल आंदोलक डॉक्टरांनी विचारला आहे.

जोपर्यंत थकीत मानधन मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या डॉक्टरांनी घेतल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे..

बुलढाण्यात डिझेल तुटवड्याचा आरोग्य यंत्रणेला फटका; जिल्हा रुग्णालयातील MRI सेवा ठप्प

जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा फटका आता आरोग्य यंत्रणेलाही बसू लागला आहे. वारंवार होत असलेल्या वीज खंडितामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील MRI मशीन बंद पडली असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तसेच नाडकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्या वक्तीचे नाव समोर

  • शिवाजी राठोड, पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्या वक्तीचे नाव

  • राठोड बंगालच्या दिशेने आणि तिथून पुढे निघून जाण्याच्या होता तयारीत

  • पोलिसांना संशय येऊ नये म्हणून काढली होती देशातील विविध रेल्वे स्टेशन चे तिकीटे

  • पुणे ए टी एस ने राठोडला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले

अहिल्यानगरमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन डाॅक्टर गजाआड

अहिल्यानगर जिह्यातील लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली असून, एकूण आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली आहे.. यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे.

कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्षांचा एसटीने प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, असे केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिल्पा खोत यांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथून तब्बल ६० किलोमीटरचा एसटीने प्रवास करत कोल्हापुरात आगमन केले.

हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

  • पुण्यातील हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी मोठी अपडेट

  • नागपूर मधून एका संशयिताला घेतलं ताब्यात

  • पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई

  • नागपूर रेल्वे स्थानकावरून संशयित आरोपीला घेण्यात आलं ताब्यात

नितेश राणेंनी केला इलेक्ट्रिक कारने सिंधुदुर्गचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्ह्यात इलेक्ट्रिक कारने दौरा केला.

यावेळी त्यांनी ताफ्यातील गाड्याही कमी केल्या असून कुटूंब प्रमुख असलेल्या पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे देश हितासाठी असल्यामुळे व आम्हाला पाहून जिल्ह्यातील नागरीकांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करावा यासाठी मी इलेक्ट्रिक कार वापरत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलंय

मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणारा दीपस्तंभ निमाला

मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कुलरच्या विजेचा शॉक लागून १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना घडली.

बारामती नगरपालिकेच्या नगर विकास विभागावर गंभीर आरोप

बारामती शहरात पुन्हा एकदा नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नगरसेवक सुनील सस्ते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामुळे नगर विकास विभागाचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. “जनतेच्या सेवेसाठी की काहींच्या फायद्यासाठी?” असा थेट सवाल करत या पत्रकातून नगरपालिकेच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) विभागातील अनेक कथित गैरप्रकार समोर आणण्यात आले आहेत.

इंधन दरवाढीचा फटका

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इंधन दरवाढीचा फटका बसलेला आहे. भाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढलेले आहेत.

गडचिरोलीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

गडचिरोलीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलमध्ये जवळपास ३ रुपयांची तर डिझेलमध्ये ३ रुपये ११ पैशांची वाढ झाल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गडचिरोलीत पेट्रोलचा दर सध्या 107 रुपयांच्या पुढे पोहोचला असून डिझेलही ९४ रुपयांच्या घरात गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम स्थानिक इंधन दरांवर होत असल्याचे सांगितले जात आहे. दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि बाजारभावांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश शिंगाडे यांनी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा असून त्यांची किंमत अंदाजे ₹17 कोटी 66 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात घडला.

जळगाव पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

जळगाव इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

परभणीत पेट्रोलचा दर 105.50 वरून थेट 108.63 प्रति लिटरवर पोहोचला असून ₹3.13 ने वाढ झाली आहे.

तर डिझेलचा दर 92.2 वरून 95.13 प्रति लिटर झाला असून 3.11 ने वाढ नोंदवली गेली आहे.

पेट्रोल डिझेल मध्ये झालेल्या या दरवाढीमुळे वाहनधारक, सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

अग्निशमन विभाग ,पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

नीट पेपर फुटी प्रकरणात पहाटेपासून सीबीआयकडून लातूरमध्ये एका खाजगी क्लास चालकाची चौकशी सुरू

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयने मोठा तपास सुरू केलाय

पहाटेपासून आज पुन्हा एका खाजगी क्लास चालकाची त्याच्या राहत्या घरून कसून चौकशी सुरू आहे,

पी व्ही कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर, सीबीआय ने लातूरमध्ये कसून चौकशी सुरू केली आहे.

लातूर मधील त्या क्लास चालकाच्या घरी पहाटेपासून सीबीआय तळ ठोकून आहे, सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून चौकशी करत आहे

Dilip Dhotre Accident : मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा अपघात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांचा अपघात.

मुंबई - पुणे दुर्गती मार्गावर फोर्चुनर गाडीचा अपघात.

भीषण अपघातात फोर्चुनर गाडीचा चुराडा.

अपघातात मनसे नेते दिलीप धोत्रे जखमी

पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅली मधील २५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे

सांगलीच्या वाळवा तालुक्यात काल शक्तिपीठ महामार्ग बाधित गावांमधून जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी सुमारे २५० आंदोलनकर्त्यांविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक अरुण जंगम यांनी फिर्याद दिली आहे.

Jalna Petrol : जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.14 रुपयेने महागले

रसवंती चालक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा संताप

Sunetra Pawar : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यात अवघ्या ३ गाड्यांचा समावेश

मोदींच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार यांनी ताफ्यातील वाहनं केल्या कमी

खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

पुणे जिल्हा नियोजनाच्या बैठकीला नेते यायला सुरुवात

मेधा कुलकर्णी यांनी इलेक्ट्रिक वाहनाने घेतली विधान भवनात एन्ट्री

Shubham Kahirnar : नीट पेपर फुटीप्रकरणी मोठी अपडेट समोर

५०० ते ६०० गुणांची खात्री देतो, पेपर फोडण्यापूर्वी शुभम खैरनार ने व्यक्त केला होता विश्वास

प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार, शुभम ने दिली होती खात्री

तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती

नीट परीक्षेचा पेपर फोडण्यापूर्वी शुभम चे इतर आरोपींना अनेक मेसेज

२९ एप्रिल रोजी पेपर फोडण्याचा व्यवहार ठरला

परभणीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

परभणीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

पेट्रोल 3.13 रुपये तर डिझेल 3.11 रुपये ने महाग

ओंकार हत्तीचा सावंतवाडीत पुन्हा धुडगूस; वाहनांचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील वाफोली गवळी टेंब येथे ओंकार हत्तीने पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केली आहे. काही दिवसांपूर्वी सावंतवाडीतील भालावल येथे कारचा चक्काचूर याच ओंकार हत्तीने केला होता आणि पुन्हा कारचे नुकसान करून ओंकार हत्तीने सावंतवाडी परीसरात दहशत माजवली आहे.

Nandurbar : नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू....

ट्राल्याचे लोखंडी रॉड पिकअपच्या केबिनमध्ये घुसून वाहनाचा चक्काचूर.

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासाला वेग

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासाला वेग

लवकरच या प्रकरणी SIT कडून पहिले 900 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात येणार, सूत्रांची माहिती

TCS प्रकरणात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातील १ आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यातील ८ गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यात

Pune : मांजरीत पोलिसांची मोठी छापेमारी

हडपसरच्या कामधेनु इस्टेट मधील नामांकित रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात पुणे पोलिसांची मांजरीत मोठी छापे मारी.

एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावर छापेमारी..

बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक टिम, दहशतवादी विरोधी पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल झाली होती त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या

Amravati : अमरावतीत ग्रामीण भागात सुद्धा मोर्शीत एमडी ड्रग्ज जप्त

अमरावतीत ग्रामीण भागात सुद्धा मोर्शीत एमडी ड्रग्ज जप्त,

अमरावतीचे दोघे अटकेत

पोलिसांनी 4.80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम 

अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना आता महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून “९० टक्के युती” तर शिवसेनेकडून “१०० टक्के युती” झाल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय संभ्रम कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli injury: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्तान सिरीजपूर्वीच विराट कोहली बाहेर, काय आहे कारण?

Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू

शरीराच्या 'या' भागाचे दुखणं सांगेल तुम्हाला डायबिटीज आहे! रक्तातील साखर वाढल्यास दिसतात 'ही' ८ लक्षणे

MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

SCROLL FOR NEXT