शहरातील अनेक भागात पावसाला सुरवात. आज विदर्भातील वर्धा जिल्हयात पावसाने झोडपून काढलं. आज उद्याही ऍलो हवामान विभागाने अलर्ट दिला असून पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 13 मंडळात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद
शेळगी - 131 मिमी
मार्डी - 87 मिमी
बोरामणी - 65 मिमी
वळसंग - 116(मिमी)
होटगी - 125(मिमी)
अक्कलकोट - 116(मिमी)
जेऊर - 87 मिमी
तडवळ - 66मिमी
मैंदर्गी - 99 मिमी
वागदरी - 137 मिमी
चपळगाव - 116 मिमी
किणी - 133 मिमी
सोनंद - 65 मिमी
जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमधील पुलावरून पाणी वाहत आहे. हा पूल ओलांडताना एका दुचाकीवरून दोन इसम वाहून जाताजाता थोडक्यात बचावले.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ढालघर फाटा इथं धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला . स्थानिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत कारचे किरकोळ नुकसान झालं.
तब्बल 15 तासानंतर सोलापूरच्या पूर्व भागातील पाणी ओसरले
सोलापुरातील मित्रनगर,शेळगी,दहिटणे, अक्कलकोट रोड,वज्रेश्वरीनगर, मल्लिकार्जुन नगर आदी परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात
महापालिका प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखत जलमय भागात जेसीबी,टीपर,जेटिंग मशिन्सह, अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते
आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणा ही तैनात करण्यात आली होती
बारामती पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.मात्र हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे.
महाराष्ट्रातील अकोला शहरात मे 2023 मध्ये उसळलेल्या धार्मिक दंगली दरम्यान जखमी झालेल्या मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली, आणि सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणास "एफआयआर नोंदवण्यासाठी योग्य" असल्याचे म्हटले आहे. तसेच अकोला पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेये.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील विराणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून दो गटा मध्ये तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
विराणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना पेट्रोल पंपाच्या कर्मचारीने चालकला लाईनीत यावा असं सांगितलं परंतु चालक ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हतं आणि त्यांना इ डायरेक्ट काम कर्मचारीला मारहाण करायला सुरुवात केली..
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना संदर्भात २६५ हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र फक्त २७ गावातून ३ हजार ६४२ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेतली नव्हती असा आरोप करीत कल्याण ग्रामीण २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतत्वात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुनावणीस हजर राहून आयुक्तांसोबत चर्चा केली. समितीची एकच मागणी आहे. २७ गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी. २७ गावात निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. २७ गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आयुक्तांनी समितीस आश्वासन दिले आहे की, या संदर्भात निवडणूक आयोगाला माहिती देणार.
ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गाझेटनुसार ओबीसीत आरक्षण दिलं त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये वर्ग करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली ...जिल्ह्यातील लोणार येथे बंजारा समाजा ची बैठक संपन्न झाली ...बैठकीमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये वर्ग करण्यात यावे असा ठरावं एकमताने मंजूर करण्यात आला....
त्यानंतर तहसीलदार मार्फत राज्य शासणाला निवेदन पाठविण्यात आले..
हैद्राबाड गझेट नुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्या अन्यथा मुंबई जाम करू..असा ईशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आलाय..
परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा
भर पावसात मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मोर्चात झाले सहभागी
हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्याची मागणी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळया फिती बांधून निषेध
यावेळी पन्नास खोके एकदम ओके, ओम भट स्वाहा असा घोषणा सुरू
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या अगोदरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासोबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणावरून आढावा घेतला आहे
इंद्रायणी नदीकिनारी तुळापूर गावच्या हद्दीत लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून १० लाख १५ हजार रुपये किमतीचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवले वस्ती परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे शहरात विविध कार्यक्रम
नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्ताने
रक्तदान शिबीर,स्वच्छता अभियान, संवाद कार्यक्रम विधिव व्यक्तीचा सन्मान,साहित्य वाटप,झाड लावा झाडे जगवा,असे विविध कार्यक्रम आहेत
दिव्यांग मोफत वाटप साहित्य
40 मिनिट ड्रोन शो आयोजन,1 हजार ड्रोन वापरण्यात येणार,40 मिनिट शो असेल,अयोध्या आणि वाराणसीनंतर राज्यात प्रथम,3 किलोमीटरवरून दिसणार ड्रोन शो.यामध्ये अनेक विषय पाहायला मिळणार आहेत,थ्री डी शो आहे.
75 हजार विद्यार्थी देणार मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र
या कार्यक्रमाला 25 हजार लोक येतील, पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा आणि इतर कार्यक्रम होणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
समग्र नावाच्या संस्थेसोबत नवा करार झाला
कोकण विभागात डेटा सेंटरमध्ये दोन विभागात करार करण्यात आला
टप्प्यांनुसार सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे
३५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
नाशिक, विदर्भातही विविध करार होणार आहे.
नव्या करारांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
गडचिरोली, ११ सप्टेंबर जिल्ह्यातील तरुणांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गडचिरोली येथे ‘ट्रॅक्टर टेक’ हा ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी व महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
- भाजपचे आमदार प्रकाश भाळसाकळे यांनी दिला सरकारला घरचा आहेर...
- सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसमोर आरोग्याच्या समस्यांचा भाजप आमदाराने वाचला पाढा..
- अकोट आणि तेल्हारा तालुक्यात आरोग्य खात्याची परिस्थिती अतिशय वाईट.. विशेषतः आदिवासी आणि सातपुडा पर्वतरांगाला लागून अलसेला भाग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, ज्यात अपुऱ्या पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधांची कमतरता, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव, सार्वजनिक आरोग्याच्या समस्या मांडल्या..
- मात्र, अधिकारी पाहिजे तसा प्रतिसाद आपल्याला देत नसल्याचा आमदार भारसाकळे यांचा आरोप.
- दुपारी साडेतीन वाजता मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद
- मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेट या संदर्भात छगन भुजबळ पुढील भूमिका मांडण्याची शक्यता
- ओबीसी आरक्षणासंदर्भात देखील भुजबळ काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष
बुधवारपासून नगरपरिषद, एनएचएआयकडून पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे ४० अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे.
निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी
लाट्या काठ्या हॉकी स्टिक सोबत मोठ्या प्रमाणात दगडफेक
व्हिडिओ प्रचंड व्हायरल
हाणामारीत 10 ते 12 जण जखमी जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू
निर्मल नगर पोलिसांनी केला दोन्ही बाजूंच्या 26 जणांविरोधात गुन्हा दाखल
दोन्ही गटातील 15 ते 16 जणांना निर्मल नगर पोलिसांनी केली अटक
भांडण करणारे दोन्हीही एकमेकांचे शेजारी
मागील काही दिवसांपासून सातत्याने शेजाऱ्यांमध्ये होता वाद सुरू
याच वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारी झाले
बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष विकोपाला गेला आहे. हाके समर्थक आणि जरांगे समर्थक आमने-सामने येताना पाहिला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं बीडच्या परळी हवेवर असलेल्या पोखरी येथे बॅनर फाडण्यात आले आहे. यानंतर आता मराठा समाज आक्रमक होत बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोणावळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मावळच्या वतीने तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. श्री पोटोबा महाराज मंदिरापासून निघालेला हा मोर्चा पंचायत समिती कार्यालय मार्गे तहसील कार्यालयावर आल्या नंतर सभेमध्ये रूपांतर करण्यात आले. दरम्यान ज्या विकृत माणसाने बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्याची विटंबना केली त्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येते असा इशारा सरकारला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संयुक्त जनआक्रोश मोर्चाची जोरदार तयारी
- नाशिक ब्लॅकआऊट संयुक्त जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र मोर्चा
- नाशिक महापालिकेचा भ्रष्टाचार, खड्डे, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, हनीट्रॅप, वाढत्या गुन्हेगारीविरोधात जन आक्रोश मोर्चा
- मोर्चात असणार काळे झेंडे, झेंड्यावर एका बाजूला मनसे तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह
- शासनाला जाग आणण्यासाठी अंधारातून उजेडाकडे, चला एकत्र येऊ या मोर्चाची टॅग लाईन
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत असतांना नाशिकमध्ये मात्र याआधीच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मोर्चाच्या निमित्तानं एकत्र
धाराशिवच्या नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर संबधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदु समाज आक्रमक झाला आहे.सकल हिंदू समाजाकडून आज नळदुर्ग शहर बंद ठेवुन शहरातुन मुक मोर्चा काढला पुढील तीन दिवसात दोषीवर कारवाई न झाल्यास १५ तारखेपासून नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाचा कहर
अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात 100 हुन अधिक ग्रामस्थ अडकले
गावाला चार ही बाजूने पाऊस आणि ओढ्याच्या पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थ अडकले
सुदैवाने गावात पाणी शिरलेलं नसल्याने सर्व ग्रामस्थ सुखरूप
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावाजवळ बस आणि पिकअपचा भीषण अपघात झाला.या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे, तर बसमधील कोणतेही प्रवासी जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली. तर नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.
आरक्षण का मागितलं जातंय याचा विचार करावा. शिक्षण महागल्यामुळेच आरक्षणाची मागणी होत आहे, असं मराठा नेते प्रविण गायकवाड म्हणाले. समस्येवर फक्त आरक्षण हा उपाय नाही, असंही गायकवाड पत्रकार परिषदेत म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परत येत असताना भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेळगी परिसर गेला पाण्याखाली
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे 30 विद्यार्थिनी वस्तीगृहात पडल्या होत्या अडकून
शेळगी परिसरातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वासतिगृहात ३० विद्यार्थिनी पडल्या होत्या अडकून
अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्ष जवानांनी विद्यार्थिनींना वासतिगृहाच्या बाहेर सुखरूप काढले
विद्यार्थिनी त्यांच्या बॅग कपडे घेऊन हॉस्टेल मधून बाहेर पडल्या
रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वस्तीगृहातील परिस्थिती दयनीय
त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे सोलापुरात सर्वत्र होतय कौतुक
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या जय्यत तयारी सुरू झालेली आहे. सध्या मंदिराची स्वच्छता सुरू असून मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या दानपेठ्यांमधील दान सध्या मोजण्याचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी सध्या मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या पेट्यांमधील दान मोजत आहेत.
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना ओबीसी मोर्चा काढल्या प्रकरणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह 13 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
वारजे वाहतूक पोलीस सकाळपासून वाहतूक मोकळी प्रयत्न करत त्यांच्या मदतीला वारजे पोलीस ठाण्यातील अंमलदार व अधिकारीही पाठविण्यात आले
वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण
- सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शहरातील अनेक भागात शिरले मोठ्या प्रमाणात पाणी
- जिल्ह्यात सर्वत्र काल मध्यरात्रीनंतर तुफान पाऊस
- शहरातील शेळगी भागातील हे सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेरात कैद
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि रंगरंगोटीच्या कामाला गती आली आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरावरील शिखरांची स्वच्छता पूर्ण झाली असून आता रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास 20 पेक्षा अधिक कामगारांकडून रंगरंगोटी सुरू आहे. त्यासोबतच गरुड मंडप आणि नगारखाना नूतनीकरणाच्या कामानं गती घेतली आहे.
अमरावतीतील रेल्वे पुलाला मिळणार नवसंजीवनी..सेतुबंधन योजनेतून 300 कोटींचा निधी मिळणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन.
खासदार बळवंत वानखडे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट.... उड्डाणपूल वाहतूकी योग्य नसल्याने केला आहे बंद.
सोलापूर शहरातील मित्र नगर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले पाणी
सोलापुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे जनजीवन झाले विस्कळीत
संपूर्ण रात्र पावसात भिजून काढल्याने सोलापुरातील कुटुंब आले उघड्यावर
संसारुपयोगी साहित्यामध्ये पाणी शिरल्याने सोलापुरातील महिलांना अश्रू झाले अनावर
राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे, मात्र सध्या पपई पिकांवर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मोझॅक व्हायरस मुळे पाने गळून पडतात आणि फळे खराब होतात अशा फळांना खरेदी करण्यासाठी व्यापारी देखील खरेदी करण्यास टनकार देत असतात यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहे, मात्र शेतकऱ्यांवर महागड्या औषधी फवारणीमुळे आर्थिक बोजा वाढणार आहे तसेच पपई पीक निघाल्यानंतर पिकांना भाव किती मिळणार असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे एकंदरीत मोझॅक व्हायरस मुळे जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे..
पुणे -
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमुळे आणि हिंसक निदर्शनामुळे अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत
पुणे आणि मुंबईमधील 23 जेष्ठ नागरीक नेपाळमध्ये अडकले आहेत.
हे सगळे पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले होते.हे सगळे पर्यटक भयभित झाले असून,
गेल्या 4 दिवसांपासून नेपाळ मधील हॉटेलमध्ये अडकलेत भारत सरकारने मदत करावी आणि आम्हाला नेपाळमधून बाहेर काढावं अशी विनंती या पर्यटकाकडून करण्यात येतेय
हॉटेलमध्ये गेल्या 4 दिवसांपासून अडकलेले आहेय
नाशिक -
- प्रसिद्ध अभिनेता किरण मानेच्या फेसबुक पोस्टविरोधात भाजप आक्रमक
- नाशिकमध्ये ABVP कडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- किरण मानेंवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची केली मागणी
- नेपाळ संबंधित पोस्ट करत भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी ही फेसबुक पोस्ट असल्याचा ABVP चा आरोप
सोलापूर -
सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे झाले हाल
सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मित्र नगर शेळगी परिसरात केली पाहणी
महापालिकेच्या भोगलं कारभाराचा सोलापूरकरांना भोगावा लागतोय त्रास
अमरावती -
अमरावतीत विदर्भाच्या राजाचे आज विसर्जन
अमरावती शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा गणपती बाप्पा.
दुपारी 2 वाजता निघणार विसर्जन मिरवणूक
रात्री 7.30 वाजता राजकमल चौकात महाआरतीला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार
ढोल-ताश्यांचा निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग असणार
विदर्भाच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला पश्चिम विदर्भातील भक्तांची असणार उपस्थिती
सोलापूर -
- अक्कलकोट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, नदी- नाले तुडुंब
- अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ते शिरशी गावाला जोडणारा वाहतुकीचा पूर्णपणे बंद
- त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक झाली विस्कळीत
- बोरगाव ते घोळसगाव नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद
- बोरी नदीच्या पुलावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी
- तालुका प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा
नाशिक -
- नाशिक महापालिकेची कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत
- महापालिकेनं बजावल्या साडे तीन लाख थकबाकीदारांना नोटीसा
- महापालिकेच्या पथकांकडून घरोघरी मोहीम, कारवाईचा इशारा
- सध्या शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांकडे ३४७ कोटींचा दंड थकीत
- ३४७ कोटींचा थकीत दंड वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न
अमरावती -
काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची खासदार नरेश मस्के यांच्यावर टीका
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे मते फुटली असा आरोप केला होता खासदार नरेश म्हस्के यांनी
नरेश मस्के भाजपची चाकरी करतात.. भाजपकडून वाह...वाह.. मिळवण्यासाठी त्यांचे हे वक्तव्य
इंडिया आघाडी कडे स्पष्ट बहुमत नव्हतं जिंकेल अशी स्थिती नव्हती
सोलापूर -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग
सोलापूर शहरातील सखल भागात शिरले पाणी
सोलापूर शहरातील जुना विडी घराकुल परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन झाले विस्कळीत
या सोबतच अक्कलकोट रोड परिसरातील पंजावणी मार्केट,होटगी रोड तलाव परिसरात ही शिरले पाणी
हवामान खात्याने या अगोदरच सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा दिला होता इशारा
पुणे -
राज्यात पावसाचा ब्रेक संपतोय?
पुढील आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार
मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे.
पुढील दोन दिवस कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, पुढील आठवाड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज आहे.
पुणे -
आयुष कोमकर हत्या प्रकरण
हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई
नागपूर -
- कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा
- कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस नेते सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे
धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा - कुणबी आणि कुणबी -मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत
सक्षम अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत
पुणे -
दीड वर्षात तब्बल चाळीस हजाराहून नागरिक जखमी
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या दीड वर्षांत तब्बल चाळीस हजारांहून अधिक नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.