Breaking News Live Updates maharashtra latest updates suraj chavan arrest ed action bmc khichadi scam shivsena Saam TV
महाराष्ट्र

Breaking News Live Updates : रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आजची रात्र पोलीस कोठडीतच

Maharashtra Latest News Update : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा. पुण्यातून अयोध्यासाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

प्रविण वाकचौरे

रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आजची रात्र पोलीस कोठडीतच

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी तुपकरांनी बुलडाण्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रेलरोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर हे काल रात्रीपासून भूमिगत होते. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. सायंकाळी ७.०० च्या दरम्यान गाडी बदलून मलकापूरकडे जात असताना राजूरघाटात पाठलाग करून पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले आहे.

२० तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची मागणी

राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत मनोज जरांगे यांनी २० तारखेच्या आत आरक्षण द्या, अशी मागणी शिष्टमंडळाकडे केली. कुणबी नोंद आढळलेल्या 54 लाख जणांना कुणबीप्रमाण पत्र द्या, अन्यथा आम्ही मुंबईत गाठणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना ४ दिवसांची ईडी कोठडी

कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना २२ तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी होती. बुधवारी सुरज चव्हाण यांना अटक झाली होती. चव्हाण यांच्या अटकेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची पाठराखण केली आहे.

हनुमान चालिसा पठण प्रकरण : राणा दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घराबाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणातराणा दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयात सूरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चिती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता २१ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

अयोध्येत रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला

22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहेत.

दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट, मेटे यांचे सख्खे भाऊ शिवसंग्राम संघटनेतून बाहेर

दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज रामहरी मेटे रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. जय शिवसंग्राम या नावाने रामहरी मेटे सक्रिय होणार आहेत. दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर रामहरी मेटे अलिप्त होते. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत देखील फूट पडल्याचं दिसून येत आहे. रामहरी मेटे हे विनायक मेटे यांचे छोटे बंधू आहेत. ते हयात असेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्यासोबत राहून शिवसंग्रामचे काम पाहिले होते.

लोकसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार यांचे महत्वाचे विधान

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. फेब्रुवारी महिना झाला की, आचारसंहिता लागेल. राज्यात महायुतीचे मेळावे होतील. त्याला देखील तुम्ही हजेरी लावा, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर महिलावर्ग सक्षम होईल - तटकरे

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्यास तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न कायम विचारला जातो. महिला मुख्यमंत्री झाली म्हणून प्रश्न मिटणार नाही. पण, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर महिलावर्ग सक्षम होईल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा, प्रशासनाची जय्यत तयारी

भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रे नगर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तर उद्या मोदींच्या दौऱ्यासाठी रंगीत तालीम सुद्धा प्रशासनाकडून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रे नगर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर झळकू लागले आहेत. तर रस्त्याच्या कडेने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लागल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे नेते राजन साळवींच्या घरी ACB कडून झाडाझडती

शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबी पथक पोहोचले आहे. अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बीड जिल्ह्यातील 11 पोलीस उपनिरीक्षक, 13 सहायक पोलीस निरीक्षक तसेच 5 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काढले आहेत.

पालघर - मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर महिलांकडून दगडफेक

पालघर - मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर महिलांकडून दगडफेक

डहाणूतील गंजाड गणेश बाग येथील घटना

दगडफेकीत डहाणू पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर संखे जखमी

दगडफेक करणाऱ्या तीन महिलांना केलं अटक

मुंबई-वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींवरील घरे तोडकाम करताना घडला प्रकार

दुष्काळाच्या झळा! तीन आठवड्यात राज्यातील टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या 100 ने वाढली

दुष्काळाच्या झळा! तीन आठवड्यात राज्यातील टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या 100 ने वाढली

राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचं संकट वाढलं

याआधी राज्यातील 366 गाव 961 वाड्यांना 390 टँकरने पाणीपुरवठा होत होता

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातील 470 गाव 1041 वाड्यांना 490 टँकरने पाणीपुरवठा सुरू

मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात राज्यात टँकर पुरवठा पूर्णतः बंद होता

मार्च महिन्यापर्यंत राज्यातील टँकर ने पाणीपुरवठा करण्याचा आकडा दुपटीने वाढणार असल्याची भीती

उद्धव ठाकरे यांचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा

उद्धव ठाकरे यांचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा

शिवनेरी गडावर जाऊन तिथली माती कलशात भरुन काळाराम मंदिरात घेऊन जाणार

उद्धव ठाकरे 22 जानेवारीला काळाराम मंदिरात रामाची आरती करणार आहेत, तसंच गोदावरीच्या काठी आरती करणार आहेत

यावेळी शिवनेरी गडावरची माती गोदावरीमध्ये सोडणार असल्याची माहिती

तर 23 जानेवारीला नाशिकमध्ये मोठा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आ

पुण्यातील अशोक नगर, रेंजहिल रस्ता येथे मेडिक्युयर मेडिकल स्टोअरला आग

पुण्यात पहाटे 4 वाजता अशोक नगर, रेंजहिल रस्ता येथे मेडिक्युयर मेडिकल स्टोअरला आग

अग्निशमन दलाची चार वाहनांच्या मदतीन जवानांनी आग विझवली

आगीमध्ये मेडिकल स्टोअरचं मोठं नुकसान, शेजारील दोन दुकांनाना देखील आगीची झळ बसली, जीवितहानी नाही

पुणे-बेंगलोर महामार्गावरील देहूरोडजवळील ॲम्बुलन्सला भीषण अपघात

पुणे-बेंगलोर महामार्गावरील देहूरोडजवळील असलेल्या किवळे गावानजिक ॲम्बुलन्सला अपघात

सुदैवाने अॅम्बुलन्समध्ये पेशंट नसल्याने मोठा अनर्थ टळला

चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती ॲम्बुलन्स

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ॲम्बुलन्स डिव्हायडरला धडकून उलटली

पुण्यातून अयोध्यासाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार

पुण्यातून अयोध्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन

दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा

अयोध्याला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती, त्यानुसार रेल्वेने बोर्डाला प्रस्ताव पाठवला होता.

रेल्वे बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यात १५ विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाला विरोध

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाला विरोध

विरोध करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल

विरोध करतानाचा व्हिडिओ कालचा असल्याची माहिती

कांद्याचे दर, दुधाला मिळणारा दर, वाढती महागाई, ढासळलेली ग्रामीण अर्थव्यवस्था यावर भाष्य करत शेतकऱ्याकडून विरोध

पुणे : २२ जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप बंद ठेवण्याची मागणी

पुणे : २२ जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप बंद ठेवण्याची मागणी

२२ जानेवारीला संपूर्ण देशात मोठ्या उत्सहात आयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे

हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे

देशभरातील सर्व समाजातील रामभक्तांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करावा म्हणून आपल्या हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप एक दिवसासाठी बंद ठेवावेत, अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT