Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चंदनचे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 2nd March 2025 : आज रविवार, दिनांक २ मार्च २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, दत्ता गाडे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण, चॅम्पियन्स ट्रॉफी,धनंजय मुंडे राजीनामा, मुंबई-नाशिक-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चंदनचे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

- पुणे- बंगळुरू महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चंदनच्या कंटेनरला पोलिसांनी पकडल आहे.

- दहा ते बारा टन चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याची किंमत 20 ते 25 कोटी आहे.

- कंटेनर मध्ये काथ्याच्या खाली चंदनाची उंडके लपवण्यात आले होते.

- पोलिसांना याबाबतची खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे.

Mumbai News : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

० माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी

० सात किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

० मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

० शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी सातत्याने होते माणगाव मध्ये वाहतूक कोंडी

० पर्यटकांन बरोबर सर्वसामान्य नागरिकांना ही होतो वाहतूक कोंडी चा त्रास

Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे महामार्गावर रक्त चंदनाची तस्करी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर रक्त चंदनाची तस्करी करीत असताना परंतुवडी शिरगाव पोलिसांनी पकडले. अंदाजे दहा टन रक्त चंदन आहे. इंटरनॅशनल बाजारपेठेत याची किंमत अंदाजे करोड रुपयाची आहे माल. कंटेनर सह दोघे ताब्यात..

Political News :  ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठाण्यातील आनंद आश्रमात

संजय राऊत आनंद आश्रम या ठिकाणी पोहचणार आहेत.त्यांना आनंद आश्रम या ठिकाणी येण्यास विरोध करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते जमा झाले आहे

धाराशिवमध्ये महावितरणच्या अभियंत्याची शेतकऱ्याची बोलताना जीभ घसरली

परंडा येथील महावितरणचे अभियंता अंकुश जाधव यांची शेतकऱ्याशी बोलतांना घसरली जीभ

परंडा तालुक्यातील आसू लोणी येथील फीडर लाईन पाच दिवसापासून बंद असल्याने येत तक्रार करण्यासाठी गेले होते शेतकरी

तक्रार ऐकून न घेता या अभियंताने शेतकऱ्यांना दिली उलट उत्तर

मला कोणाचे पटत नसेल तर कोणाच्या बापाच ऐकत नाही. मला कोणाचा दबाव आला तरी मी कोणाच्या बापाला भीत नाही अशा शब्दात अभियंताने शेतकऱ्यांना सुनावले

अंधेरी येथील साकीनाका परिसरात 90 फीट रोड येथे भीषण आग

गुलशन कंपाऊंड येथील गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती

अग्निशमन दल घटनास्थळी रवाना

संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य

गुलशन कंपाउंड व इतरत्र नेहमी आगीच्या घटना घडत असतात अग्निशमन दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे

उन्हाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

महाविकासआघाडीची पत्रकार परिषद सुरू

अंबादास दानवेंचा सरकारवर गंभीर आरोप

वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आहे

प्रशांत कोरटकरला सरकारच संरक्षण

उन्हाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यावर गुन्हा दाखल

मात्र ही घटना घडल्यानंतर लगेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील घरी अधिकाऱ्यांची बैठक सुरू

बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित

राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती...

मात्र भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व शरदचंद्र पवार गटाच्या आमदार एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे अनेक चर्चेंना उधाण आलेले आहे

साताऱ्यातील भरतगाववाडीत भर वस्तीत बिबट्याचा वावर

साताऱ्यातील भरतगाववाडी येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.रात्रीचा सुमारास शैलेश ढाणे यांचा घरासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी शेजारील कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे घरातील झोपलेले लोक जागे होऊन बाहेर आले.

तोपर्यंत बिबट्याने कुत्र्यास धरून शेताकडे नेत त्याचा फडशा पाडला.हा सगळा प्रकार घरासमोरील सीसीटीव्ही चित्रित झाला आहे. या बिबट्याच्या वावरामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत वनविभागाने तत्काळ बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका,लहान मुलांना लागण

लहान बालकांमध्ये सर्वाधिक चिकन पॉक्सची लागण झालीय. चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग असल्याने अनेक लहान मुलांना त्याची लागण होतेय. ताप येणे, अंगाला पुरळ, फोडनंतर खरुज होण्याचा धोका. लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्सची लागण झालीय.

उद्धव सेनेच्यावतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन

आज उद्धव सेनेच्या वतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. या मेळाव्यात संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील एन. के. टी. कॉलेज या ठिकाणी होणार आहे.

Maharashtra Live Update : स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक लैंगिक अत्याचार प्रकरणी ॲड.असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू न्यायालयात मांडणार

ॲड.असीम सरोदे यांना त्यांची टीम ॲड. श्रीया आवले, ॲड.गीता वाडेकर, ॲड. अरहंत धोत्रे, ॲड. रमेश तारू इत्यादी कायदेविषयक संशोधन व विश्लेषण करून विविध दृष्टीकोन मांडण्यासाठी सहकार्य करणार

असीम सरोदे यांच्याकडून सगळ्या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू

Pune crime : पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासनारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडलीय

स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता

आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता

याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 45 वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आलीय

मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्याही दबावाला बळी पडून राजिनामा देऊ नये, ओबीसी नेते सोमनाथ काशिद यांची आक्रमक भूमिका

Beed : बीडच्या धारूर तालुक्यात अफूची शेती, 50 गोण्या अफू पोलिसांकडून जप्त 

अफू पीकवण्यावर शासनाने निर्बंध घातले असताना देखील बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा येथे रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने चक्क बालाघाट पर्वतरांगेतील तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या पाण्यावरच अफूची शेती पिकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

याबाबत माहिती मिळताच बीड एलसीबी आणि धारूर पोलिसांनी कार्यवाही करत शेतातील अफू उपटून घेत साधारण 50 गोण्या अफू जप्त केला. धारूर पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलला 21 लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी

साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात गुजरात येथील जय साई फांऊडेशनकडून 21 लाख रूपयांच्या आधुनिक मशिन दान देण्यात आल्या आहेत.. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या तसेच शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे...

Crime : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेला मोरक्या पिंटू मुळे याला अटक

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेला मोरक्या पिंटू मुळे याला अटक

मुळे याला 13 मार्चपर्यंत सुनावली 12 दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणात सुरवातीला पकडण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडी संपल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत केले रवाना

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 12 आरोपी असल्याची पोलिसांची माहिती

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये राजकीय लोकांचे फास आवळले जात असल्याने राजकीय पार्श्वभूमी असलेले किती आरोपी यामध्ये सहभागी असणार याकडे सर्वांचे लक्ष

तुळजापूर मुंबई ड्रग्स कनेक्शनचे मुंबई येथे आणखी आरोपी असल्याची पोलिसांनी वर्तवली शक्यता

Maharashtra Live Update : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

स्वारगेट एस टी स्टँड अत्याचार प्रकरण

आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले

आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत

बसची केली फॉरेन्सिक चाचमी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत

ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचनी करण्यात आली ती पण पॉजिटिव आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT