बीडच्या परळी शहरातील गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरात असलेल्या शू मार्ट या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. दुकानातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. भातपिकाचे माहेरघर असलेल्या भंडारा जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. मात्र, अशा संकट काळात बळीराजाला भक्कम आर्थिक बळ देण्यासाठी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दुग्ध संघाने म्हशीच्या आणि गाईच्या दुधाच्या खरेदी दरात थेट वाढ करत दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला आर्थिक आधार दिला आहे
निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद ठरविण्यात आलेले अर्ज वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय
अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह इतर २ सदस्यांचे अर्ज वैध
संचालक पदासाठीचे ४ पैकी ३ जणांचे अर्ज न्यायालयाने ठरवले वैध
माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांच्या अर्जावरील आक्षेपही कोर्टाने फेटाळले
न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा आधार देत निलंगेकर यांचा अर्ज बाद करण्यासाठी काँग्रेस समर्थकांकडून करण्यात आली होती याचिका
दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफी योजनेने गती घेतली आहे.धाराशिव मध्ये आतापर्यंत तब्बल 68 हजार 353 शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेचे 664 कोटी 61 लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्हाभरात 88 हजार 991 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 70 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले तर उर्वरित शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण बाकी असल्याने ते लाभापासून वंचित आहेत.लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचाच निर्णय अंतिम राहणार, अशी ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. अध्यक्षपद महायुतीच्या माध्यमातून किंवा नव्या फॉर्म्युल्याने ठरेल, पण भाजपची भूमिका महत्त्वाची राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.. बँकेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्याचं सांगतानाच, आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्व पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
दिवाळी निमित्त लासलगाव,मनमाड बाजार समिती आज पासून पुढील आठ दिवस बंद राहणार आहे,त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पसरला असून लक्ष्मी पूजन,भाऊ बीज आणि शनिवार,रविवार आलेली सुट्टी शिवाय मजूर दिवाळी सण साजरी करण्यासाठी जाणार असल्याने एक आठवडा लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले आहे.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय. तब्बल ६५ तासांहून अधिक काळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर सुरू असलेलं चक्काजाम आंदोलन काल मध्यरात्री राजू शेट्टी यांनी मागे घेतलं. कारखानदार आणि प्रशासनाकडून आलेला ऊस दराचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूरजवळ धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी धुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या या बसला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत तीन चालकांसह 12 प्रशिक्षणार्थी असे एकूण 15 जण जखमी झाले असून मसूर पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. ऊसदर आंदोलनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर महामार्ग रोखल्याने ही बस रहिमतपूर-मसूर मार्गे कराडकडे जात होती. जखमी प्रशिक्षणार्थी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात लालसर-केशरी रंगाचा अनोखा कीटक आढळून आला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कीटकामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा कीटक ‘रेड कॉटन स्टेनर’ प्रजातीतील असण्याची शक्यता आहे.
माणगाव डोंगरवाडी येथील एका घराच्या परीसरात आढळलेला हा रंगीत कीटक दिसायला आकर्षक असून, त्याचे लालसर-केशरी शरीर, काळे पाय आणि पंखांवरील वेगळ्या खुणा यामुळे तो सहज लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील काही भागात या कीटकाची नोंद असलीतरी निसर्गाच्या विविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा अनोख्या प्रजातींची नोंद पर्यावरण अभ्यासासाठी महत्त्वाची ठरू शकते.
रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. माणगावचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आनंद यादव आपल्या सहकाऱ्यांसह पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेले आनंद यादव यांच्यासह माणगावचे तीन विद्यमान आणि चार माजी नगरसेवक देखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या वाटेवर असून दिवाळीनंतर पक्षप्रवेशाचा फटाका फुटण्याची शक्यता आहे.
खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्यांचे रॅकेट उघडकीस आणणार्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आला... इमामपुर शिवारात हा मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे...
- घोरण्याच्या आवाजामुळे झोपमोड होत असल्याच्या कारणावरून कारागृहातील कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
- या मारहाणीत एका कैद्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- मनिष चैतराम ठाकूर असे जखमी कैद्याचे नाव असून, सतिश राजन पैसाडेली याने त्याला मारहाण केली....
- धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश पैसाडेली झोपेत घोरत असल्याने मनिष ठाकूर याची झोपमोड होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे मनिषने त्याला झोपेतून उठवून घोरण्याबाबत जाब विचारला.
माळेगावमध्ये दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अनोख्या आणि भावपूर्ण पद्धतीने उजाळा देण्यात आला. अजितदादांच्या छायाचित्राचा सुंदर कंदील तयार करण्यात आला असून, त्याचे पूजन त्यांचे सुपुत्र युवानेते श्री. जय अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या एका आजींनी जय पवार यांचा हात हातात घेतला आणि दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारी भावनिक कविता सादर केली. आजींच्या या कवितेतून अजितदादांप्रती असलेली त्यांची आत्मीयता, जिव्हाळा आणि आदरभाव व्यक्त झाला.
बारामती : बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण सहाव्या मजल्यावर असताना नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने ते थेट दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.