Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या ‘उपसभापती’ पॅनल मध्ये निवड

Marathi Breaking Live Headlines Updates : डिलिमिटेशन विधेयक, इंडिया आघाडी, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, शरद पवार हेल्थ अपडेट, राज ठाकरे पत्रकार परिषद, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या ‘उपसभापती’ पॅनल मध्ये निवड

पुणे - खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या ‘उपसभापती’ पॅनल मध्ये निवड

मेधा कुलकर्णी या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांच्याकडून राज्यसभेच्या उपसभापती मेधा कुलकर्णी यांची निवड

विश्वास आणि जबाबदारीबद्दल उपराष्ट्रपती यांचे मेधा कुलर्णी यांनी मानले आभार

सोशल मीडियावर पोस्ट करत दिली कुलकर्णी यांनी माहिती

Nagpur: नागपूरच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या कोलार-कन्हान बॅरेज प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी

- नागपूरच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या कोलार-कन्हान बॅरेज प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

- शहरातील सार्वजनिक विहिरींचाही पिण्याच्या पाण्यासाठी वापर करता येईल, असे नियोजन करण्याचे बावनकुळे यांचे निर्देश

- नागपूरकरांना मालकीहक्काचे पट्टे आणि घरे देण्यासाठी मार्चपर्यंत कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

- महापालिका आणि राज्य सरकारच्या जागेवर राहणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना मिळणार मालकीहक्काचे पट्टे

Amravati: मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पा विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पा विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

प्रकल्पाविरोधात आंदोलनाची सुरुवात

प्रत्येक गावात कॉर्नर बैठका घेऊन आदिवासींमध्ये जनजागृती मोहीम

Washim: वाशिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

वाशिम रेल्वे स्थानकावर अल्पवयीन चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे.

व्हाइटनरची नशा करून प्रवाशांकडून जबरीने पैसे हिसकावून घेत ब्लेडने हातावर वार केल्याची घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात गोपाल पांडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

Yavatmal: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभा ऐनवेळी रद्द

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उद्या होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष तथा खासदार संजय देशमुख हे अधिवेशनासाठी दिल्लीला गेल्याने ऐनवेळी बँकेची सभा अध्यक्षांच्या सूचनेवरून तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे पत्र संचालकांना पाठविण्यात आले आहे.

विभागीय अध्यक्ष, समित्यांची निवड लांबणीवर पडली आहे.

Ratnagiri - लाडक्या बहिणींना २१०० रुपये योग्य वेळी देणार – उदय सामंत

रत्नागिरी - लाडक्या बहिणींना २१०० रुपये योग्य वेळी देणार – उदय सामंत

विधानसभेला १५०० रुपयांचे २१०० रुपये करण्याचा शब्द आम्ही पाळणार!

योग्य वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील

मंत्री उदय सामंत यांचा लाडक्या बहिणींना शब्द

लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'चं आतापर्यंतचं सर्वात शॉकिंग एलिमिनेशन; 'हा' स्पर्धक घराबाहेर,चाहत्यांना मोठा धक्का

India Forts : डोंगरापासून वाळवंटापर्यंत...; भारतातील 'हे' ५ भव्य किल्ले पाहून थक्क व्हाल

Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?

Sunday Horoscope : नात्यांमधला गोडवा वाढेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT