Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी मागितला वेळ

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी मागितला वेळ

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी मागितला वेळ

मात्र विद्यार्थ्यांचं दोन दिवसात प्रश्न सोडवा भूमिकेवर ठाम...

माघील चार तासापासून आदिवासी मंत्री सोबत बैठक सुरू...

अजूनही बैठक सुरू...तोडगा नाही

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग; कर्मचाऱ्याला अटक, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शहापूर तालुक्यातील टेंभा येथील आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गवळी याने विद्यार्थिनीला एकटी गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीने ही घटना अधीक्षकांना सांगितल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून आधारवाडी कारागृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीने यापूर्वीही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.

२१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विषारी दारू प्रकरणातील बाळ्या लोंढे ताब्यात

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात २१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या बाळ्या उर्फ दत्ता लोंढेला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी ट्रॅप लावून लोंढेला पकडले. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो वेशभूषा बदलून फिरत असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर सीआयडीने मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. आता उरुळी कांचन पोलीस बाळ्या लोंढेला सीआयडीच्या ताब्यात देणार आहेत.

वाशिमच्या कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

वाशिमच्या कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज कुत्र्यांच्या टोळक्याने बकरीच्या पिल्लावर हल्ला करून त्याचा जीव घेतला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, कालही मोकाट कुत्र्यांनी बकरीवर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. सलग दुसऱ्या दिवशी अशा घटना घडल्याने नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण-मोशीदरम्यान १० किमी वाहतूककोंडी

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते मोशीदरम्यान सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कामगार, प्रवासी आणि अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीत अडकली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर वाहनांचा वेग मंदावल्याने प्रवासासाठी अतिरिक्त वेळ लागत आहे. वाहतूककोंडीमुळे कामावर जाणाऱ्या कामगारांसह इतर प्रवाशांचेही हाल होत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिंदेसेनेचे महेंद्र दळवी यांच्यात जुंपली

राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील शाब्दिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला आणि खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. दळवी यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोला तटकरे यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीनंतर पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी दळवींनी दिल्लीपासून फेऱ्या मारल्या, याची आठवण करून देत त्यांनी उगाच आणाभाका घेऊ नयेत, असा सल्लाही दिला.

Pandharpur: विठुरायाचा प्रसाद महागण्याची शक्यता

पंढरपूर -

विठुरायाचा प्रसाद महागण्याची शक्यता

साखर, बेदाणा आणि सुका मेवा महागल्याने विठुरायाचा लाडू प्रसाद देखील महागण्याची शक्यता आहे.

सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने पंढरपुरातील प्रसाद विक्रेत्यांनी पेढा,साखर फुटाणे, बत्तासे या प्रसादाच्या दरात वाढ केली आहे.

त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीकडून विक्री केल्या जाणाऱ्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीकडून 70 ग्रॅम वजनाचे दोन लाडू प्रसाद 20 रुपयांना विक्री केली जाते.

दररोज 20 ते 30 लाडू प्रसादाची विक्री केली जाते.

Pune: भरत गोगावले यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

पुणे -

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी घेतली उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

पुण्यात शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये झाली भेट

सुनेत्रा पवार या शासकीय बैटकीसाठी आज विश्राम गृहात होत्या

त्याच वेळी गोगावले आल्याने दोघांच्या अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती

Amravati: अमरावतीच्या घटनेनंतर यवतमाळ रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर

अमरावतीच्या घटनेनंतर यवतमाळ रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर

सर्व विभागांना देण्यात आल्या सूचना, अग्निशामक यंत्र हातात प्रत्यक्ष डेमो

Pune: पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

पुणे -

उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

राहुल धनवे असं उपोषणकर त्याचं नाव

14 दिवसापासून सुरू आहे उपोषण

PM मोदींनी नेपाळच्या पंतप्रधानांशी साधला संवाद, पूरामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, "पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्याशी संवाद साधला आणि नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. आमची पथके बचाव आणि मदत कार्यासाठी जवळून समन्वय साधत आहेत."

Nepal: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, भारताने दिला मदतीचा हात

नेपाळमध्ये पूराचा हाहाकार

महाप्रलयामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान

भारत नेपाळला लवकरात लवकर मदत साहित्य पाठवण्याची तयारी करत आहे

सरकारी सूत्रांनी दिली महत्वाची अपडेट

Pune: पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे फक्त विसर्जन मिरवणूक नाही, गणेश मंडळांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे फक्त विसर्जन मिरवणूक नाही

गणेश मंडळांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे शहरातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये पुणे शहराच्या विविध भागातून गणेश मंडळाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

गणेशोत्सवा दरम्यान गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या त्यासोबतच गणेशोत्सवाचं नियोजन, विसर्जन मिरवणूक आणि डीजे साऊंड सिस्टिम याबद्दल चर्चा करण्यात आल्या.

Raigad: रायगडच्या मुरुडमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला आग

रायगड -

- रायगडच्या मुरुडमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला आग

- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

- आगीत कोरी पासबुक आणि जून साहित्य जळून खाक

- ईद ए मिलादची सुट्टी असल्यामुळे बँक बंद होती; मोठी दुर्घटना टळली

- मुरूड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरातील घटना

- मुरुड अग्निशमन दलाच्या तत्परतेनंतर आग आटोक्यात आणण्यात यश

Pune: पुण्यात मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासोबत बैठक

पुणे -

मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासोबत बैठक

१५ जणांचे शिष्टमंडळ बैठकीला असणार

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त

Amravati: अमरावतीच्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आमदार रवी राणा

अमरावती -

अमरावतीच्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

राजकारण न करण्याचा आमदार रवी राणांचा सल्ला

रुग्णालयात घटनास्थळाची रवी राणांकडून पाहणी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक आणि कंटेनरचा अपघात

मुंबई लेनवर हा अपघात झाला असून या अपघातात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. मात्र या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती. साखर वाहून नेणारा ट्रॅक अशी माहिती समोर आली होती मात्र प्रत्यक्षात या ट्रक मध्ये तांदूळ असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात भाजपच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेची एंट्री

सटी कामगारांच्या प्रश्नांवर आता भाजपचीही स्वतंत्र संघटनात्मक एन्ट्री झालीय. अकोल्यात भाजप प्रणित ‘एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आलीय. ही संघटना श्रम भारतीय जनता कामगार महासंघाशी संलग्नित आहे. अकोल्याचे विजय मालोकार या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज केले.

नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प 

नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून धूर निघत आहे. खबरदारी म्हणून खारघरहून सीएसटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही; मात्र अचानक रेल्वे सेवा थांबल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलडाण्यात ईद-ए-मिलाद उत्साहात; शहरातून निघाली भव्य मिरवणूक

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद बुलडाणा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला.

पिंपरी चिंचवडमध्ये सर्वधर्मसमभावाचा अनोखा थर, ताथवडे येथील नरसिंह गोविंदा पथकात मुस्लिम गोविंदांचा उत्स्फूर्त सहभाग..... 

दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील नरसिंह गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. शहरातील एकमेव असलेल्या या गोविंदा पथकात गेल्या १० वर्षांपासून सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे प्रतीक पाहायला मिळत आहे.

लासलगाव कांदा एक्सप्रेस शेतकऱ्यांनी अडवली

प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेस रोखून धरली आहे. रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा पाठविला जात असल्याचा आरोप करत एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नांदेडच्या लोहा तहसीलमध्ये शेतकऱ्याची नायब तहसीलदाराने धरली कॉलर 

नांदेड जिल्ह्यातून महसूल प्रशासनाच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बालाजी शिंदे हे शेतकरी आपल्या ७/१२ वरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयात गेले होते.परंतु या शेतकऱ्याला न्याय मिळण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून अपमान सहन करावा लागला.

धुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना; चाळीसगाव चौफुलीवरील उड्डाणपुलाचे काम सुरू

धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असून, उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने याचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे.

जळगाव जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने जुलूस काढले 

भुसावळ शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आज ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने जलुसचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रजा टावर पासून जलुस काढण्यात येऊन शहरातील मुख्य मार्गावरून उर्दू शाळा क्रमांक 3 मध्ये जुलूसचे विसर्जन करण्यात आले .

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हिंगोलीत दाखल..

ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे आज हिंगोलीत आगमन झाले. यावेळी ओबीसी समाज बांधवांकडून त्यांचे जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.. मंत्रालयावर निघणाऱ्या एल्गार महामोर्चाच्या अनुषंगाने हिंगोलीत ओबीसी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महामोर्चाच्या तयारीसह समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे..

मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत सात कंत्राटदारांनी आपला जीव गमावला आहे महाराष्ट्र शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिला.

Nagpur : मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

उईकेंनी आरोप फेटाळल्यानं विद्यार्थ्यांचा सरकारवर गंभीर आरोप, काय म्हणाले? | Pune Students On Uike

दरम्यान आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळत त्यांना खोटं पाडल्यानं विद्यार्थी संतापलेत... वसतीगृहात प्रवेशाआधी आमची चाचणी झाली असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय... तर सरकार त्यांची बाजु सांभाळण्यासाठी आम्हाला खोटं पाडतंय असा दावाही विद्यार्थ्यांनी केला

मंडप टाकू नका, लाऊडस्पीकर बंद करा, विसर्जन मिरवणुका वळवा

पुणे महापालिकेत गणेशोत्सवाच्या बैठकीदरम्यान एका पर्यावरण प्रेमीने लाऊडस्पिकर कायमचे बंद करा अशी मागणी करताच त्यांच्यावर विरोधांचा भडिमार करण्यात आला होता ते विद्यानंद बापट पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी आहेत. आम्हाला प्रचंड त्रास होतो. तासंतास लाऊडस्पिकर वाजवतात त्यातून काहीच फायदा होत नाही त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर वाजवण्याची कुठली ही परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केलीय. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत चांगली चर्चा होऊच शकत नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय.

Nagpur news : नागपूरच्या अंबाझरी तलावात उडी घेऊन १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी घडली.

रायगडमधील सागर गडावर पर्यटकांची हुल्लडबाजी

रायगडमधून हुल्लडबाज पर्यटकांची एक बातमी समोर येत आहे. अलिबाग जवळील सागर गडावर आलेल्या पर्यटकांनी हुल्लडबाजी केली. गडाच पावित्र्य न राखता रिलसाठी गृपडान्स सुरु केला. हा सर्व प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी त्याना रोखल. गडाबद्दल काही माहिती नसल्याचे पर्यटकांनी सांगत नमती भुमिका घेतल्याने वाद झाला नाही. मात्र सागर गडावरील पर्यटकांच्या या हुल्लडबाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रायगडमध्ये कोकणात या पण इथल्या वास्तुंच पावित्र्य राखा अस स्थानिकांकडून पर्यटकांना अवाहन केल जात आहे.

ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे अमरावतीत दाखल,   अग्निकांड प्रकरणाच्या घटनास्थळी भेट

स्नेहल सावंत या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक असलेल्या जखमी तरुणीची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज तीन महिन्यानंतर अपयशी . स्नेहल सावंत या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू . पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून असलेल्या स्नेहल सावंत यांच्यावर 13 जून रोजी कोयत्याने प्रियकराकडूनच करण्यात आला होता जीवघेणा हल्ला . हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात झाली होती कैद . प्रेम प्रकरणातून कोयत्याने वार करत प्रियकराने स्नेहल यांच्या हत्येचा केला होता प्रयत्न . पुणे येथे उपचार सुरू असताना काल संध्याकाळी उशिरा स्नेहल यांचा मृत्यू झाल्याची माहिती

मुंबईत कंत्राटदार गजानन देवकाते यांची आत्महत्या

बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी लिहिलं होतं कार्यकारी अभियंत्यांना पत्र

काम केले तरी वेळेत बिल मिळत नाही

बिल मिळण्यासाठी १० वेळा चक्कर मारावी लागत असल्याचा पत्रात केला होता उल्लेख

"त्या" पेपरफुटीचा आका कोण? सी बी आय किंवा न्यायालयीन चौकशी करा, विद्यार्थ्यांची मागणी

एमपीएससीने मोठा निर्णय घेतला आहे औषध निरीक्षक , गट-ब, अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली. पेपरफुटीच्या गैरप्रकारामुळे अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रद्द केली असली तरी या मागचा "आका" कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे कारण आता सरकार ने परीक्षा रद्द केली असली तरी विद्यार्थ्यांसाठी अंशतः दिलासा आहे. या प्रकरणाचा खरा सूत्रधार जेव्हा सापडेल तेव्हा त्याच्याकडून सगळं सत्य समोर येईल त्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलेला आहे

काल रात्री ते घरी नसताना दोन-तीन वेळा तोंडाला बांधून आलेल्या हल्लेखोर यांनी रेकी केली होती.. त्यानंतर जेव्हा घरी आलो आणि खाली गाडी उभी ठेवली त्यावेळेस नेमका गॅलरी उभा असताना हल्ला केला मात्र थोडक्यात बचावलो यावेळी माझी पाच वर्षाची मुलगी ही त्या ठिकाणी होते असेही शुभम मोटघरे यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलं...

त्यावेळी थोडक्यात माझी मुलगी बसवली नेमका कोणी सुपारी देऊन केलय का अशी शंका आहे मी समाजकार्य करत असतो नक्कीच पोलीस 24 तासात त्या आरोपींना शोधून काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

जामोदच्या सीतामाता परिसरात वनरक्षकावर हल्ला..

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील सीतामाता मंदिर परिसरात गस्तीवर असलेल्या वनरक्षकावर लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली. वनरक्षक सादिक रमजान सुरतणे यांनी लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता, शेख फारुख शेख गफूर याने त्यांच्या खांद्यावर लाकडी चौपाटीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच पुन्हा अडवल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी FIR क्र. ०५३६/२०२६ नुसार BNS कलम १३२, ११५(२), ३५२ व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

५०० रुपयांच्या लाचेसाठी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला अटक

सायबर फ्रॉड केसमध्ये गोठवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी न्यायालयातील अर्जांवर अभिप्राय देण्याकरिता प्रत्येकी ५०० रुपये लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​तक्रारदार महिला अधिवक्त्याच्या अर्जांवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुषमा पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात ऑगस्ट ठरला स्वाइन फ्लूचा हॉटस्पॉट,  महिनाभरात २०५ रुग्णांची नोंद

पुणे शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान स्वाइन फ्लूचे २७० रुग्ण आढळले होते. मात्र ऑगस्टमध्ये तब्बल २०५ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अज्ञात तापाचे २१ हजार ५१२ रुग्ण आढळले. नागरिकांनी ताप अंगावर न काढता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पुण्यातील ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

वय हे केवळ एक आकडा असल्याचे सिद्ध करत ६९ वर्षीय श्री राम यादव अडसुळ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. देहूरोड येथे आयोजित विशेष विक्रम प्रयत्नादरम्यान त्यांनी सुमारे ३ फूट उंच टेबलवर ८.२२ सेकंद शीर्षासन (Headstand) करून अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (IEA Book of World Records) मध्ये करण्यात आली आहे. हा विक्रम प्रयत्न IEA Book of World Records च्या ज्युरी पॅनलच्या देखरेखीखाली पार पडला. निर्धारित आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे व पडताळणी प्रक्रियेचे पालन करून ज्युरी सदस्यांनी या विक्रमाची अधिकृत नोंद व सत्यापन केले. यावेळी डॉ. संदीप सिंह (मुख्य कार्यकारी अधिकारी – IEA Book of World Records) तसेच योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरीजी महाराज (राष्ट्रीय ज्युरी, महाराष्ट्र) हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी अडसुळ यांच्या जिद्द, चिकाटी आणि समर्पणाचे कौतुक करत ही कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

निघोजे ग्रामसभेत महिला सरपंच विरुद्ध महिला सदस्य; वाद थेट पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल

चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिला सरपंच आणि महिला ग्रामपंचायत सदस्य आमनेसामने आल्याने वातावरण तापलं. ग्रामसभेतील वादाला हाणामारीचं स्वरूप आल्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं असून, महिला सदस्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

ठाकरे सेनेचे आमदार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत, महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथून ते आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असून नागोठणे , इंदापूर माणगाव येथील सुरू असलेल्या बायपास कामांची देखील ते पाहणी करणार आहेत. गणेशोत्सव सनापूर्वी मुंबई कडून कोकणात येणाऱ्या कोकण वासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक नेत्यांनी या अगोदर देखील पाहणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे देखील पाहणी करणार आहेत

लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार

- लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार...

- लासलगाव रेल्वे स्थानकात रॅक भरण्यास सुरुवात...

- रेल्वे स्थानकात आतापर्यंत 300 टन कांदा दाखल...

नाशिकच्या अंबड लिंक रोडवर भीषण अपघात

- नाशिकच्या अंबड लिंक रोडवर भीषण अपघात

- पाठीमागून येणाऱ्या ट्रकची धडक बसून ट्रकच्या चाकाखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू

- दुचाकीवरील सुनील बोरसे यांचा मृत्यू

- चुंचाळे फाट्याजवळ घडली घटना

कोकण किनारपट्टीवर मासेमारीला जोरदार सुरुवात

कोकण किनारपट्टीवर 15 ऑगस्ट पासून मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. सध्या पाऊस सुध्दा कमी झाल्यामुळे मासेमारीला वेग आला आहे.

मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्याप्रमाणात कोळंबी, बांगडा, मोरी, सुरमई, पापलेट अशा महागड्या माशांचा बंपर कॅच मिळत असल्यामुळे मच्छीमार आनंदात आहेत.

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल

ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी नाना पेठेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या मार्गावर तसेच जोडरस्ते आणि गल्लीच्या आतील बाजूस १०० मीटरपर्यंत वाहन पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा कवच

तुळजाभवानी मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा कवच

मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी MSF अधिकारी व जवानांचे पथक तैनात

MSF च्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातून काढला रूट मार्च

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला डी प्लस दर्जा प्राप्त गुलाबराव पाटलांची माहिती

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला डी प्लस दर्जा प्राप्त गुलाबराव पाटलांची माहिती

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी कंपनीला डी प्लस दर्जा प्राप्त चा काढला जीआर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश तर उद्योजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पेढा भरवत व पुष्पगुच्छ देत केले स्वागत

Pune : पुणे रेल्वे स्थानकावर DRI विभागाची कारवाई

पुणे रेल्वे स्थानकावर DRI विभागाची कारवाई

महिला प्रवाशाकडून DRI ने जप्त केले ३ कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ

दिल्लीहून पुण्यात आलेल्या महिलेला ताब्यात घेत DRI ची कारवाई

Dharashiv : पाऊस खोळंबला,मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

पाऊस खोळंबला,मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केला पावसासाठी पर्जन्ययज्ञ

Solapur Accident : रस्ता क्रॉस करताना अपघात, निवृत्त शिक्षिका जागीच ठार

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या निवृत्त शिक्षिकेस पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत जबर मार लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

पुणे - हैद्राबाद महामार्गावर शेळगी परिसरात ही घटना घडली आहे.

सुवर्णा राजेंद्र बिराजदार असे मयत महिलेचे नाव आहे.

Nagpur : गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे निलंबित

- गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे निलंबित

- महापालिका आयुक्तांकडून बेशिस्त आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवर कारवाई

- कामादरम्यान बेशिस्त वर्तन केल्याचा पंधरे यांच्यावर ठपका

- यापूर्वीही पंधरे यांच्या वर्तणुकीवरून त्यांची विविध विभागांत बदली करण्यात आली होती

Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदेसेना आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदे शिवसेना आक्रमक

महावितरण कार्यालयावर धडक, अधिकाऱ्यांना घेराव

२४ तास वीजपुरवठ्याची मागणी; न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा शिंदे सेनेचा इशारा

Nashik : कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध.नाफेडचा कांदा दिल्लीला पाठवण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

Ladki Bahin Yojana : 58 हजार लाडक्या बहिणींची ओवाळणी रखडली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रिया रखडल्याने यवतमाळ जिल्ह्यातील 58 हजाराहून अधिक लाडक्या बहिणींची ओवाळणी रखडली आहे.

एप्रिल 2026 पासून योजनेचे पोर्टल बंद असल्याने केवायसीतील प्रलंबित त्रुटी दूर होऊ शकलेल्या नाहीये

त्यामुळे लाभ बंद झालेल्या महिला आता कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून पोर्टल कधी सुरू होणार आणि रखडलेला लाभ कधी मिळणार अशा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे.

Yavatmal : ईद-ए मिलाद निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासाने यवतमाळ शहरासह पुसद,उमरखेड,दिग्रस,दारव्हा आदी ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ईद निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीवर पोलिसांचा ड्रोन द्वारे विशेष लक्ष असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT