Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका: जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

Marathi Breaking Live Headlines Updates: गणेशोत्सवाचा तिसरा दिवस, मनोज जरांगे मराठा आंदोलन, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका: जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका,निषेध नोंदवू नका,आनंदाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करा

आपल्या दारात येणाऱ्या मंत्र्यांना अडवू नका आपण त्यांना त्यांच्या दारात जाऊन अडवू

मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांना आवाहन केलंय.

गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

गणेशोत्सवानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते. नितीन नबीन यांनी मोहोळ कुटुंबीयांसमवेत गणरायाची आरती केली. त्यानंतर त्यांनी मोहोळ कुटुंबीयांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान गणरायाकडे सुख, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

Pune: गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

गणेशोत्सवानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते. नितीन नबीन यांनी मोहोळ कुटुंबीयांसमवेत गणरायाची आरती केली.

त्यानंतर त्यांनी मोहोळ कुटुंबीयांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान गणरायाकडे सुख, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

पुणे -

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री असताना बाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

- पोलिसांनी तात्काळ मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात

Kolhapur: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

कोल्हापूर -

कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

अधिकाऱ्याने शिस्त पाळण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप

भारत शेट्टींसह सहा बंदींवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा

बॅरेकमध्ये दंगा आणि आरडाओरड करणाऱ्या बंदींना अधिकाऱ्याने हटकले

त्यानंतर आरोपींनी केबिनमध्ये येऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याचा फिर्यादीत आरोप

अल्ताफ शरीफने दगडाने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबद्दल युती सरकारची भूमिका सकारात्मक - मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मंत्री शिवेंद्रराजे भोसले -

- मराठा आरक्षणाबद्दल युती सरकारची भूमिका सकारात्मक आहे

- आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत जे निर्णय झाले ते देवेंद्रजी आणि शिंदे साहेब असताना झाले . यापूर्वी मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते . परंतु त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही किंवा शब्द काढला नाही .

- हैदराबाद गॅजेट संदर्भात फडणवीस यांनी निर्णय घेतला , कोर्टात हा निर्णय टिकून दाखवला

- मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नाही . त्यांना टिकवायचं नव्हतं

इंदापूर तालुक्यात पावसाची हजेरी...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु बरसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली वडापुरी रामवाडी वकीलवस्ती या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ग्रामपंचायत कार्यालयातील फोटो फोडला

खामगाव तालुक्यातील संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लावलेला फोटो विठ्ठल हिंगणे या तरुणाने काढून ग्रामपंचायतीसमोरच फोडला. ग्रामपंचायत अधिकारी यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल हिंगणे याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात 324(3)BNS सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचवणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी मुंबईला जाणार - मनोज जरांगे

मुंबईला जाण्यावर जरांगे ठाम

यवतमाळात ठाकरेसेना शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढणार मोर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेसेनेच्या वतीने येत्या २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, पीकविम्याचा लाभ मिळावा, तसेच सोलर कनेक्शनसह इतर मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात,यासाठी ठाकरेसेनेच्या वतीने विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा ‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रम

चंद्रपूरच्या चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी बीआरटीसीच्या डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला अनोखा ‘बांबूचा बाप्पा’ विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रयत्नातून चक्क बांबूपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार केली आणि तिची विधिवत स्थापना केली. ‘बांबू टू बाप्पा’ या अभिनव उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला.

उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाने उधना ते पुणे दरम्यान नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही ट्रेन उधना येथून निघून नंदुरबार,अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि हडपसर मार्गे पुण्यापर्यंत धावेल.सुरुवातीला सुरत व उधना येथून नंदुरबार मार्गे पुण्यासाठी ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून केली जात होती.

शाही स्नानासाठी प्रकाशा धार्मिक स्थळावर महिलांची प्रचंड गर्दी

दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे ऋषिपंचमी निमित्ताने सूर्यकन्या तापी नदी घाटासह मंदिर परिसरात महिला भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता यंदा ऋषीपंचमीला विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेशातील हजारो महिला भाविकांनी तापी नदीत पवित्र स्नान करून सप्तऋषींची पूजा कथा श्रवण तसंच महादेवाचे दर्शन घेतलं यावेळी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने आंदोलकांनी बीड पाटोदा महामार्ग रोखला

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने बीड पाटोदा महामार्ग आंदोलकांनी रोखला.

मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्याने आंदोलक आक्रमक.

बीड पाटोदा महामार्गावरल वाहन आंदोलकांनी अडवली.

आंदोलन थेट वाहनावरती बसून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेही समवेत आहेत.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेरी पगडी घालून राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत केले.

पुण्यात मानाच्या पहिल्या गणपतीचे दर्शन घेणार...

कोरड्या दुष्काळाने पिके होरपळली; नरहरी झिरवळांकडून पाहणी, हेक्टरी ५० हजार मदतीसाठी सरकारकडे मागणी

हिंगोली जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. “साहेब, आम्हाला तातडीची मदत करा, सगळं संपलं,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी यासाठी सरकारकडे प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे झिरवळ यांनी सांगितले. तसेच हिंगोली जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिखली दिवाणी न्यायालयासमोर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखली येथील दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. न्यायालयीन कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी नियमित वेळ सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदवत त्यांच्या मागण्यांची संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलनानंतर न्यायालयीन कर्मचारी नियमित कामकाजात सहभागी झाले.

आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा

यवतमाळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानावर विविध मागण्या करिता भव्य मोर्चा काढण्यात आला. वडगाव येथील बलवंत कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.मोर्चामुळे वडगाव ते आर्णी नाका दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६ अंतर्गत पुणे जिल्ह्यात ३० ठिकाणी रोजगार मेळावे

युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी ५०० हून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध तालुक्यांतील ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू! | Ganpatipule Dress Code

रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय... गणपतीपुळे मंदिरात येत्या १ जानेवारीपासून भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आलाय... मंदिर प्रशासनाकडून ड्रेस कोर्डसंदर्भात बोर्ड देखील लावण्यात आलेत.

Manoj Jarange यांच्या शिवराळ भाषेवर महायुती आक्रमक; आमदार-खासदारांची CMकडे नाराजी? | Maratha Protest

कोडोली अतिक्रमणधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून अतिक्रमणधारकांना मालकी हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी कोडोलीतून थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय मुलकीपड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे, आंदोलकांनी गळ्यात लोटके आणि कंबरेला फेसाटी बांधून पायी मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले.

12 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार.

12 वर्षीय मुलीवर एका 28 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात उघडकीस आलीय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाजीनगर हद्दीतील एका नगरात राहणाऱ्या मतिमंद चिमुकलीवर त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने 13 सप्टेंबर रोजी अत्याचार केला. पीडितेच्या आईला संशय आल्यावर अधिक चौकशी केली असता मुलीवर अत्याचार केल्याचे समजले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीसांनी अत्याचार, पोकसो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलीसांनी आरोपी आदिनाथ जाधव याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून धमक्या देत असल्याची तक्रार पीडितेच्या आईची आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या आईने केलीये.

तरीही मराठ्यांना ओबीसींमधूनच आरक्षण का हवंय? Chhagan Bhujbal यांचा सवाल

शिंदे गट की ठाकरे गट? पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज काय घडणार?

Supreme Court : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या २०२४ मधील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. या याचिकेत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी घटनेच्या १० व्या अनुसूचीअंतर्गत शिवसेना एकनाथशिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास दिलेल्या नकाराला आव्हान देण्यात आले आहे.

खंडपीठ: सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना.

याशिवाय, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी दुसरी याचिकाही आजच्या सुनावणीच्या यादीत समाविष्ट आहे.

आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा

यवतमाळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानावर विविध मागण्या करिता भव्य मोर्चा काढण्यात आला. वडगाव येथील बलवंत कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.मोर्चामुळे वडगाव ते आर्णी नाका दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.मोर्चादरम्यान आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,असा इशारा जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी दिला.

नितीन नबीन यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली.

यावेळी त्यांचे शिंदे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने अतिशय हृद्य स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय महासचिव (संघटन) श्री शिव प्रकाश, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

छगन भुजबळ यांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरील भूमिका काय?

मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करत आहेत, ज्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणाचा हा प्रश्न वारंवार आंदोलन होऊनही सुटत का नाही, न्यायालयाच्या चौकटीत हे टिकणारे आहे का, आणि मतपेटीच्या भीतीमुळे राजकीय नेते यावर उघडपणे बोलायला का घाबरतात, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी यावर भूमिका मांडताना सांगितले की, आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला संविधानाची मर्यादा आणि वस्तूस्थिती काय आहे हे समजले पाहिजे. यापूर्वी बीडमध्ये झालेल्या हिंसक घटना, आमदारांची घरे व हॉटेल्स जाळण्याच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी या आंदोलनाच्या पद्धतीवर व त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणावर भाष्य केले आहे.

पश्चिम विदर्भात ठाकरे सेनेकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची हाक

पश्चिम विदर्भातील शेतकरी कोरड्या दुष्काळात होरपळत असताना सरकारची भूमिका उदासीन असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेच्या वतीने पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यात सहा ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे..शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात 21 सप्टेंबरला वाशिम जिल्ह्यातून होणार आहे,त्यानंतर अकोला येथे 22 तर 23 तारखेला यवतमाळ, अमरावती येथे 28 सप्टेंबरला,बुलढाणा येथे 29 आणि खामगाव येथे 30 सप्टेंबरला ठाकरे सेनेच्या वतीने आंदोलनाची हाक दिली ची माहिती ठाकरे सेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राजगुरुनगरच्या शासकीय कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच; मद्यपींचा अड्डा बनलाय का?

राजगुरुनगर शहरातील तहसीलदार कार्यालय, मोजणी कार्यालय, बँक आणि न्यायालय परिसरातील रस्त्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत… त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या लगतच मद्यपींचा अड्डा बनलाय का, असा सवाल उपस्थित होतोय.

जरांगेंनी उपोषण करू नये, मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी विनंती असल्याचे विखे म्हणाले. मनोज जरांगेंच्या मागण्यावर आम्ही सकारात्मक विचार केला. पण आमच्याबद्दल केलेली वक्तव्य चुकीची आहेत. फडणवीस आणि शिंदे यांनी केलेलं काम आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस अथवा शिंदे यांच्याबद्दल तशी वक्तव्य करू नयेत, अशे विखे पाटील म्हणाले.

Beed Latest news : जरांगे पाटलांच्या भेटीला नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, बंकट स्वामी संस्थानचे मठाधिपती मेंगडे महाराज दाखल.

युपीआय व्यवहारांवर शुल्क, पुण्यातील व्यापाऱ्यांचा विरोध

२ हजारपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे याला पुण्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे..व्यापाऱ्यांना आता 2 हाजारापेक्षा जास्त व्यवहारासाठी 0.4 टक्के लागणार आहे.व्यापारी सगळे कर भरत असतो त्यात अजून एक नवीन वाढ झाली आहे.दुसरीकडे जो हा निर्णय झाला आहे त्याचा पुनर्विचार सरकारने करावा.आमचा याला विरोध आहे.हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला नाही या निर्णयाचा पुनर्विचार करावा.याचा परिणाम व्यवहारावर होणार आहे. एकीकडे कॅशलेस व्यवहार करा म्हणता तर दुसरीकडे हा विरोध भास दिसतो आहे. वन नेशन वन टॅक्स करायला हवा.याचा फटका सर्वांनाच बसणार आहे

- नाशिक महापालिकेच्या सभेत गोंधळ

- रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मुद्द्यावर कारवाईच्या मागणीसाठी गोंधळ

- विरोधकांचा गोंधळ, संवेदनशील प्रश्नावर आधी चर्चा करण्याची आणि कारवाईची मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्यावर  उपचार सुरू

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.

मनोज रंगे यांची बीपी शुगर लेवल लो झाल्याने त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले आहे की मनोज जरांगे पाटील यांना icu विभागामध्ये उपचार करण्याची गरज आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या वरती बीडच्या पाटोद्यामध्ये उपचार सुरू आहेत.

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

मनमाड येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी 2025 मध्ये वेतनवाढीचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवला होता. मात्र, 20 महिने उलटूनही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

भंडारा जिल्ह्याच्या महिलांच्या गाडीला मध्यप्रदेशच्या सौसरजवळ अपघात; चालकाचा मृत्यू, ४ महिला जखमी

ऋषीपंचमीनिमित्त मध्य प्रदेशातील सौसर येथे गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील सावरी येथील महिलांच्या झायलो गाडीला भीषण अपघात झाला आहे. पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास मौजे तीनखेडा (ता. सौसर, जि. पांढुर्णा) येथे हा अपघात घडला.

वसई-विरारमध्ये गणेश विसर्जनावरून तणाव! तलावाचा गेट तोडून ग्रामस्थांनी केले गणरायाचे विसर्जन

वसई-विरारमध्ये पारंपरिक गणेश विसर्जनावरून भक्त आणि प्रशासन आमनेसामने आले. विरार पूर्व कोपरी गावातील नैसर्गिक तलावात दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनास महापालिका व पोलिसांनी विरोध केला. यामुळे संतप्त गणेशभक्त आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. प्रशासनाने तलावाचा गेट बंद केल्यानंतर ग्रामस्थांनी तो तोडून गणेशमूर्तींचे तलावात विसर्जन केले. कृत्रिम तलावांच्या पर्यायावरही भक्तांनी नाराजी व्यक्त केली.

जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटला; भीषण अपघात

टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; दोन हमालांचा जागीच मृत्यू

जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील यांचा अपघातात दुर्दैवी अंत

पोषण आहाराच्या पोत्यांवर बसलेले असताना दोघेही बाहेर फेकले गेले

मनोज जरांगे यांच्या स्वागताची श्रीगोंद्यात जय्यत तयारी!

बाजारतळ परिसरात भव्य व्यासपीठासह मुक्कामाची व्यवस्था केली आहे. 5 लाख मराठा बांधवांच्या वाहनांसाठी पार्किंग, जेवणाचीही सोय केली आहे. श्रीगोंदा परिसरातून 50 हजारांहून जास्त समर्थक सहभागी होणार आहेत.

चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा भीषण अपघात; विद्या प्रतिष्ठानचे ३० ते ४० विद्यार्थी जखमी, सुनेत्रा पवारांचे तातडीच्या उपचारांचे निर्देश 

चौफुला-सुपे रस्त्यावर आज सकाळी एसटी बसला भीषण अपघात होऊन विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील ३० ते ४० विद्यार्थी जखमी झाले. घटनेची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.

नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात

- नागपुरात महिला कार चालकाचा भरधाव कारने धुमाकूळ, गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ भीषण अपघात

- सेल्टॉस कार चालक महिलेने सात जणांना उडवल्याची घटना, तीन चिमुकल्यांसह सात जण अपघातात जखमी

पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात

पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

दर्शनाला येताना हार तुरे नको, वही पेन आणा! पुण्यातील "या" गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम

पुण्यातील गणेशोत्सवात अनेक देखावे किंवा गणेश मंडळांकडून समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केलेले पाहायला मिळतात अशातच पुणे शहरातील कसबा पेठेत असणाऱ्या नवग्रह मंडळाने या वर्षी गणपतीच्या दर्शनाला येताना हार फुलं घेऊन न येता एक वही एक पेन आणा असा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे. गणेश भक्तांनी बाप्पाच्या दर्शनाला येताना घरी असलेली एक वही किंवा एक पेन आणावा असे आवाहन मंडळाने केलं आहे.

‘एमपीसीबी’तर्फे पुण्यात २०० ठिकाणी ‘वॉच’

‘एमपीसीबी’तर्फे पुण्यात २०० ठिकाणी ‘वॉच’

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई

गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी आता प्रशासनानेही ‘डेसिबल वॉच’ सुरू

ऐन पावसाळा आणि गणेशोत्सवात महाड तालुक्यातील पाच गाव आणि 12 वाड्यांना पाणी टंचाईच संकट

ऐन पावसाळा आणि गणेशोत्सवात महाड तालुक्यातील पाच गाव आणि 12 वाड्यांना पाणी टंचाईच संकट

10 दिवसांपासून गावचा पाणी पुरवठा बंद

गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

मुरलीधर मोहोळ यांच्या गाड्यांचा ताफा भाविकांच्या गर्दीतून मार्गस्थ

नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी SIT चौकशीला तीन महिन्यांची मुदतवाढ

- नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी SIT चौकशीला तीन महिन्यांची मुदतवाढ

- म्हाडाच्या नाशिक महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित २० टक्के सदनिकांच्या अंमलबजावणीत कथित अनियमितता

- अनियमिततेच्या चौकशीसाठी नियुक्त समितीला शासनाकडून आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ

Manoj Jarange : मुंबई दौऱ्याबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

मुंबई दौऱ्याबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा..

मला पुढचा दौरा आता शक्य होत नाही .

मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून मुंबईला जाईल.

उपोषणात दौरा चांगला नाही

त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो..

आरक्षण महत्त्वाचे आहे दौरा महत्त्वाचा नाही

बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ मानांकन

बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ मानांकन

मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव शासकीय प्रयोगशाळा

घाटंजीत दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

यवतमाळच्या घाटंजी येथे दीड दिवसाच्या गणरायाचे वाघाडी नदीत थाटात विसर्जन करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला

गणपतीपुळे मंदिरात 1 जानेवारी 2027 या दिवसापासून भाविकांसाठी वस्त्र संहिता बंधनकारक

गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर वस्त्र संहिता बंधनकारक असल्याचे सांगणारे लागले बोर्ड

भाविकांनी वस्त्र संहिता म्हणजे ड्रेस कोड संदर्भातले नियम पाळण्याचे मंदिर प्रशासनाचे निर्देश

यापूर्वी भाविकांसाठी वस्त्र संहितेबाबत आवाहन करणारे लागले होते बोर्ड

पण आता 1 जानेवारी 2027 या दिवसापासून वस्त्र संहिता बंधनकारक

नागपुरात १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण

नागपुरात १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण मिळून आले आहे.

यातच गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्ग वाढण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागाकडून खबरदारीचे आवाहन

नागपूर जबलपूर हायवेवर ट्रेलरची दुचाकीला धडक, महिला ठार

- नागपूर जबलपूर हायवेवर ट्रेलरची दुचाकीला धडक, महिला ठार

- काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खरबीहून मौदाच्या दिशेने जात असताना जबलपूर हायवेवर भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

अमरावतीच्या बागडे ले-आऊटमध्ये बिबट्याचा वावर

अमरावती शहरातील वडाळी परिसरातील बागडे ले-आऊटमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे.

एका कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला.

Yavatmal : यवतमाळ जिल्हाधिकारी मीना यांनी लिपिकला केले निलंबित

यवतमाळ जिल्हाधिकारी मीना यांनी लिपिकला केले निलंबित

कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक निकाली काढण्यात दिरंगाई भोवली

जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

SCROLL FOR NEXT