मुंबईत मंत्रालयातील दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्या झाल्याचं समोर येत आहे. मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर पडलेली निदर्शनास आले आहे.
जालना -
मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल
भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, दोघांमध्ये अंतरवाली सराटीत भेट...
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उदय सामंत यांचे स्वागत..
मागील अर्ध्या तासापासून मनोज जरांगे पाटील आणि उद्या सामंत यांच्यामध्ये अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी चर्चा...
मंत्री उदय सामंत हे जरांगे पाटील यांच्या सदिच्छा भेटीसाठी आले असल्याची माहिती
जळगाव -
गोदा ते नर्मदा जलयात्रेचे चाळीसगावात जल्लोषात स्वागत
नागद चौफुलीवर फुलांच्या वर्षावात जलयात्रेचे भव्य स्वागत
मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल-ताशा, पारंपरिक वेशभूषेत जल्लोष
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवर
कडक उन्हातही नागरिकांचा उत्साह कायम असून संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण
आज बुलडाण्यात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
मात्र या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करत ते चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उबाठाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे.
या कारवाईत अनेक आंदोलकांना जबर मारहाण झाली असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचे सांगितले आहे.
आंदोलकांनी यावेळी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत, एका बाजूला “छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणणारेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या तत्त्वांना तिलांजली देत महिला व मुलींचा अवमान करत असल्याचा आरोप शेळके यांनी केला.
नागपूर -
- नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवशी केक आणायला निघालेल्या व्यक्तीचा भीषण अपघातात मृत्यू
- 12 दिवस दिली मृत्यूशी झुंज, अखेर प्राणज्योत मालवली
- नागपूर छिंदवाडा महामार्गावर जाताना जनावर आडवं आलं आणि झाला अपघात
- केक आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या ईश्वर वासनिक यांचा अपघातात मृत्यू
पंढरपूर -
सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारेला दिलासा नाहीच
मनोहर भोसले याचा पोलिस कोठडी मधील मुक्काम वाढला, 2 मे पर्यंत राहणार कोठडीमध्ये
माढा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिली पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी
मनोहर भोसले यांच्या अडचणी वाढल्या
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून अनेक इच्छुक आहेत. यातच रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव पुढे आले होते. मात्र आपण आत्ता पक्षामध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक नाही. आपल्याला संधी नको आहे. असे व्यक्तिगत मत आपण प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असल्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.
भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ग्रोथ सेंटरचा टिडिआर महापालिका क्षेत्रात वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी केली आहे.म्हात्रे यांनी सांगितले की, जेव्हा पासून ग्रोथ सेंटरचा टिडिआर कल्याण डोंबिवलीत वापरायला परवानगी दिली आणि त्याचा जीआर काढण्यात आला.
तापमानाचा पारा वाढल्यानं बदलापूर नगरपालिकेनं दुचाकीस्वारांना मोठा दिलासा दिलाय. उद्यापासून दुपारच्या सत्रात बदलापुरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्याभरापासून बदलापुरात तापमानाच्या पाऱ्यानं चाळीशी पार केलीये.
खडवली नदी परिसरात आढळलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा टिटवाला पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.
भोंदू गणेश शिंदेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. गणेश शिंदे याला महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये राजू कोडापे (वय 40), अर्पिता कोडापे (वय 12) पिता पुत्री आणि प्रियांका मडावी (वय 14) या भाचीचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरीसिंह येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत २२ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा हा दररोज उच्चांक गाठत आहे. काल वर्ध्याचंं तापमान 46.5 अंशावर पोहचले होते तर आजचे तापमान सुद्धा 46 अंशच्या वर आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गत चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत आहे यातून बाहेर पडताना नागरिकांकडून खबरदारी बाळगली जाताहेत दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मुंबई विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मागील सहा दिवसाचे इशारा आंदोलन आंदोलन करून शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केली.
मात्र शासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने आज पासून मुंबई विभागाचे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचं सांगितलं.
पुण्यात चंदन नगर पोलिस ठाण्याच्या २ कर्मचाऱ्यांची कामगिरी
दरवाजा तोडून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला वाचवले
पोलिस कॉन्स्टेबल अनिल तलवारे आणि पोलिस कॉन्स्टेबल सतीश कतारी असे कर्मचाऱ्यांचे नाव
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तब्बल 210 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाच्या मध्यभागीच भला मोठा खड्डा पडल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे भरदिवसा घडलेल्या मंगळसूत्र चोरीने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी क्षणार्धात हातचलाखी करत दागिना लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हवामान विभागाने 29 आणि 30 एप्रिल साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा "यलो अलर्ट" जारी केलाय
तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊसही होईल, अशी शक्यता व्यक्त केलीये
पेण खोपोली मार्गावर डंपरला आग लागल्याची घटना घडली आहे. हा डंपर महामार्गालगत माती भरावाचे काम करीत होता. भरावा करता डंपरचे मागील बकेटवर उचलले असता डंपरचे बकेट विज वितरण कंपनीच्या ओव्हरहेड लाईनला टच झाले आणि डंपरला आग लागली.
मतदानावेळी एक महिला चक्कर येऊन कोसळली
कडाक्याच्या उन्हात मतदानासाठी आलेल्या महिलेची प्रकृती बिघडली
42 अंश तापमानाचा परिणाम मतदान केंद्रावर महिला बेशुद्ध अवस्थेत
उष्णतेच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम
बेशुद्ध पडलेल्या महिलेला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला दाखल
तिकडे विदर्भ उष्णतेमुळे तापला असताना मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने झिरो ते पाच वर्ष वय असलेल्या चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सद्या हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे त्रास जाणवत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकले उपचारासाठी भरती होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे
मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सेल्फ रॅडिकलायझेशनचे प्रकरण असल्याचे दिसतंय. पुस्तके, साहित्य आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर आरोपीने केलाय. आरोपी स्वतःच कट्टरतेकडे वळलाय. जिहादच्या उद्देशाने आणि इतर धर्मीयांची हत्या करण्याच्या हेतूने त्याने हा गुन्हा केलाय. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने एटीएस आणि एनआयएच्या मदतीने या रॅडिकलायझेशनमागे आणखी कोण आहे, याचा शोध घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
-जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट,
दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढताच शहरातील रस्ते सामसूम होण्यास सुरुवात
तापमानाचा पारा 42 अंशाच्या वर जाण्याची शक्यता,
सिंधुदुर्गातील १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू
सरपंच पदासाठी ५ ग्रामपंचायती तर सदस्य पदासाठी ९ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक
एकूण १४ हजार २१० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार
आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहरे डाव्या संघटनांचं आंदोलन करत आहे. कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढायला सुरुवात
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ५२ टक्के पाणीसाठा
तर जिल्ह्यातील अन्य २६ प्रकल्पांत ४१.६१ टक्के पाणी शिल्लक
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे धरण साठ्यात मागील १० दिवसांत ३.४२ टक्क्यांची घट
वाघाड आणि पुणेगाव धरणात जलसाठा दहा टक्क्यांच्या खाली, काही भागांत पाणीटंचाईची चाहूल
वाढते तापमान, बाष्पीभवन आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी यामुळे प्रशासन सतर्क
मनोहर भोसले अटक प्रकरण, आज न्यायालयात हजर करणार
कुर्डूवाडी पोलिस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात तिसरा आरोपी पोलिसांनी अटक केला आहे
मनोहर भोसले याच्या शिव सिद्धी ट्रस्टचे सदस्य
नरेंद्र बाळासाहेब सांगळे याला पोलिसांनी अटक केले आहे.
मनोहर भोसले याचे सर्व आर्थिक व्यवहार सांगळे माध्यमातून होतात
पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत चा डबा घसरल्यानंतर अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. रेल्वे स्टेशन वरती दोन दोन तास उशिराने ट्रेन धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे ट्रॅक चे काम पूर्ण झाला असून काही ट्रेन सुरळीत सुरू आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे
पुणे ते लोणावळा लोकल आज पुणे स्टेशन वरून सुटणार नाहीत
दुपारी १ पर्यंत सगळ्या लोकल या शिवाजीनगर स्टेशन वरून सुटणार
सगळ्या लोकल १ वाजे पर्यंत पुणे स्टेशन वरून नाही तर शिवाजी नगर स्टेशन वरून सुटणार आहेत
नंदुरबार जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींमधील 80 रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असून ग्रामीण राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती तुलनेने कमी दिसून येत आहे. अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः नवापूर तालुक्यातील खांडबारा सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, आमदार शिरीष नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांची प्रतिष्ठा या लढतीत पणाला लागली आहे. मतदारराजा नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष , नगरसेवक , सभापती आणि नगराध्यक्षांचा सत्कार करून मार्गदर्शन करणार आहेत. भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री सोलापूरसाठी अजून काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये सभेची तयारी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आठवड्यावरपासून तापमानाचा कहर कायम....
आज तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर...
जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून 18 ठिकाणी उष्माघाती कक्षाची उभारणी....
उन्हाचा तीव्रतेमुळे वीज वितरक कंपनीला देखील बसतोय फटका....
वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफार्मर हिट होत असल्याने वारंवार विष पुरवठा होतोय खंडित....
वाढत्या उन्हामुळे कुलर आणि एसी खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ...
उन्हाचा तीव्रतेमुळे थंड पेयांच्या मागणीत देखील वाढ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीन निगडी जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळ आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे0तसेच उद्याही सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा,अस आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीन करण्यात आलय.
पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या नुसार ती आज केली जाणार आहे.
अमरावतीच्या परतवाडा मध्ये उद्या नितेश राणे यांची सभा...
मात्र नितेश राणेंच्या पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्याची माहिती..
परवानगी नाकारली असली तरी मात्र सभा होणारच आयोजकांची भूमिका...
अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरक ताज असतानाच दुसरीकडे उद्या नितेश राणेंची सभा..
रायगडच्या महाड शहरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये दोन दुकान ज्वेलर्सची तर एक दुकान फर्निचरच आहे. तीनही दुकानांचे लोखंडी शटर्स तोडण्यात आले आहेत. घरफोडीच्या या घटनांमुळे परिसरातील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीनही घटनांची अद्याप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसून किती मुद्देमाल चोरीला गेला या बाबत माहिती समजू शकलेली नाही.
यवतमाळ जिल्ह्यात मागील दहा वर्षांमध्ये 44.3 अंश सेल्सिअस उच्चतम तापमानाची नोंद होती यंदा तापमानाच्या पाऱ्याने हा रेकॉर्ड मोडीत काढलाय.सध्या जिल्ह्यात 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली असून हामान विभागाने पूर चक्रीवादळ आणि अवकाळी चा इशारा दिलाय
ओला उबेर आणि रॅपिडो यांच्यासारख्या ॲप आधारित टॅक्सी कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात तसेच बेकायदेशीर टॅक्सी सेवावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी स्थानिक टॅक्सी चालकांनी लोणावळ्यात साखळी उपोषण सुरू केले आहे. पुणे आणि मुंबई येथील ऑनलाईन टॅक्सी चालक लोणावळा खंडाळा परिसरात प्रवासी सोडण्यासाठी येतात, मात्र परतीच्या प्रवासात अल्पशा दरात भाडे स्वीकारून जात असल्याचा आरोप टॅक्सी चालकाने केला आहे.
- सीआयएसफच्या जवानाकडून नाना पटोले यांना आयकार्ड मागवण्यात आलं होतं, त्यामुळे ते काही काळ गेटवर थांबले होते
वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून वर्धेच कालच तापमान 46.5 अंश सेल्सिअस होते. सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे उष्णतेचा फटका बसलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे.
बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेला 7.30 सुरुवात झाली असून 59 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. तसेच केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.. तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील स्वरूपानंद देशमुख हे स्पर्ती स्पर्धेत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत.. गेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या नऊ मताने पराभव झाला होता.
चाकण परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून २० लाख रुपयांच्या अॅल्युमिनियम प्लेट चोरी प्रकरणात चाकण उत्तर पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली असून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार आहेत.राक्षेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या २१० घरांच्या साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरी झाली होती. चोरीचा माल कात्रज, चाकण आणि शिक्रापूर येथील भंगार मार्केटमध्ये विक्रीस नेल्याचे उघड झाले. पोलिसांनी सात जणांना अटक करून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसीची मुदत जून २०२६पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी एप्रिल-मे वेतन रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. परीक्षांचे काम व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे अडचणी येत असल्याने निर्णय घेण्यात आला. मात्र, ही अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारचा दिवस अपघातांचे भीषण सत्र घेऊन आला. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहिली घटना वैजापूरच्या बाभूळगाव येथील सलमान शेख (३३) यांच्याबाबत घडली; नांदगावजवळ कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, करमाड येथील लहुकी फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जगन्नाथ दांडगे (३६) या दुचाकीस्वाराचा अंत झाला. तिसरी दुर्घटना बिडकीन-पैठण महामार्गावर घडली, जिथे भरधाव रिक्षा उलटून छाया कोथिंबिरे या महिलेचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाच दिवशी झालेल्या या मृत्यूंच्या तांडवामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन.
शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी केली होती शिवीगाळ त्याचा निषेध म्हणून आज बुलढाण्यात आमदार रोहित पवार हे संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आज मोर्चा
शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अर्वाची शिवीगाळ करत दिली होती धमकी
करमाळ्याचा भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने घोटी गावातील शासकीय पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीमध्ये अतिक्रमण करून सहा एकर जमिनीवर कब्जा मिळवला आहे. या अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये फार्महाऊस ,जनावरांचा गोठा, नारळाची बाग आणि भलीमोठी विहीर खोदली आहे. यात आणखी कहर म्हणजे पाझर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करून तो स्वतःच्या शेततळ्यात साठवतो अशी माहिती स्थानिक शेतकर्यांनी दिली आहे.
राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नव्याने सूचना आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केल
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण करावी लागणार
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बुलढाण्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पुस्तकाचे शीर्षक बदलावे, अन्यथा त्यावर बंदी आणावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी केली आहे.
उद्याच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाचे स्वागत असल्याचे सांगत, मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज असा सन्मानपूर्वक उल्लेख करूनच पुस्तकाचे वाचन करावे, अशी अटही त्यांनी घातली आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळत असल्याचा दावा करत, जर आमदार गायकवाड यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य झाले तर त्याला मोर्च्यातच जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजपूत यांनी दिला आहे
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सविस्तर आढावा घेतला.वन विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक आणि अधिकारी वर्ग उपस्थितीत होते.बैठकीदरम्यान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शासकीय कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.