अखेर फरार आरोपी डॉ . सय्यद शेख फाजील नूर सय्यद एम एच बी कॉलनी पोलिसांच्या ताब्यात
भारत CSR कंपनीचा मालक” असल्याचे भासवून विश्वास संपादन
उष्णतेचा पारा सध्या वाढू लागला आहे, अनेक ठिकाणी जलसाठ्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत.. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील शिपोशी गावातल्या जाधववाडी येथील डोंगरभागात असणाऱ्या एका झऱ्यातून भर उन्हाळ्यात पाणी वाहू लागलं आहे.. या पाण्याचा उपयोग रानातील पशु पक्षी यांना होत आहे.. यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा भर उन्हाळ्यात या झऱ्यातून पाणी वाहू लागलं होतं.. आता देखील ऐन उन्हाळ्यात या झऱ्यातून पाणी वाहू लागल्याने जंगलातील पशु, पक्षी, जनावरे यांना या पाण्याचा मोठा आधार मिळत आहे..
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात चारही बाजूंनी रस्ते असलेल्या चौकात दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एक चालक जखमी झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या खाद्यातून लोखंडी तुकडे, खिळे, तारांचे तुकडे थेट जनावरांच्या पोटात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे बैल आणि इतर पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, आता यावर काही ठिकाणी चुंबक वापरून लोखंड बाहेर काढण्याचा धोकादायक उपाय केला जात असल्याचंही समोर आलंय.
- आज सकाळी 11 वाजता एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारोहास मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती उपस्थित असतील
- तर संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार
- उद्या राष्ट्रपती वर्ध्याच्या सेवाग्राम मधील गांधी आश्रमाला भेट देणार
- राष्ट्रपती सोबतच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे देखील नागपूर दौऱ्यावर असतील.
पुणे आणि अस्पताच्या परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे परंतु पुण्यातील शिवाजीनगर पाषाण चिंचवड मगरपट्टा कोरेगाव पार्क येथील कमल तापमानाचा पारा 40°c आणि त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे पुणे पाषाण चिंचवड मगरपट्टा कोरेगाव पार्कमध्ये बुधवारी कमाल 41 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.
- राज्य शासनाकडून घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची झालीय स्थापना
- नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT काम करणार
- SIT ची पहिली बैठक आज होणार, संबंधित यंत्रणांकडून सर्व माहिती मागवली जाणार
- त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात होणार
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांमध्ये नियमभंग झाल्याची शक्यता
- विकसक आणि काही शासकीय यंत्रणा ‘रडार’वर
कुख्यात गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी आरोपी वकील संजय उधाण यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. गुन्ह्यातील कटात सहभाग व आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनेनंतर उधाण यांनी मुख्य आरोपींसोबत संपर्क साधून त्यांना पळून जाण्यास मदत व पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे.
महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि सोनसाखळ्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नेरळ पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. प्रवीण पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने कर्जत तालुक्याबरोबरच ठाणे जिल्ह्यातही असे गुन्हे केले आहेत. आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे.
नेरळ माथेरान रस्त्यावर बिबट्याच दर्शन झाले आहे. बिबट्या रस्त्यावर मुक्त संचार करीत असतानाचा व्हिडिओ येथील टॅक्सी चालकाने मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. रस्त्यावर मुक्तपणे संचार करीत रस्त्यावरील कठड्यावरून हा बिबट्या दरीत उतरला. माथेरानच्या जंगल भागात बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चा होत्या, रस्त्यावर मुक्त संचार करणाऱ्या या बिबट्यामुळे पुन्हा एकदा माथेरानमधील बिबट्याचे वास्तव्य अधोरेखीत झाले आहे.
अकोल्यात घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग. अकोला शहरातील चिखलपुरा परिसरात टीनाच्या घराला भीषण आग. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी आली आग आटोक्यात. चिखलपुरा परिसरातील नागसेन ऐका घराला घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग आहे. बंडू इंगळे यांच्या घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याचे समजताच कुटुंबंयांनी घराबाहेर पळ काढला.. तितक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागलीय... स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलंये.. यात सुदैवाने कुठलेही जीवितहानी झाली नाहीए, मात्र इंगळे कुटूंबीयांची संसाराची राख रांगोळी होत संसार उघड्यावर पडलाय...
- निवडणूकीच्या काळात तिकीट मिळणे तसंच तिकिट मिळण्यावरुन झालेला वाद या मारामारीचे कारण असल्याची चर्चा
- तसंच निवडणूकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरुन भांडणे झाल्याचा पोलिसांना संशय
- पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल
- याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय
हिंगोलीत रात्री बारा वाजेपर्यंत भीम जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यात ढोल ताशाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी केली आहे हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर परिसरात भीमसैनिक डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात थिरकताना पाहायला मिळाले, या जयंती मध्ये महिला व चिमुकल्यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला होता तर मिरवणूक संपेपर्यंत हिंगोली चे पोलीस अधीक्षक निलाव रोहन मिरवणूक परिसरात रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेऊन होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.