विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनची पडताळणी सुरू झाली आणि लाडक्या बहिणी अपात्र ठरू लागल्या....निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींनी अर्जात दिलेली माहिती खरी मानून सरसकट सर्वांनाच आर्थिक लाभ दिला. मात्र, जेव्हा कागदपत्रांची आणि ई-केवायसीची कडक तपासणी सुरू झाली, तेव्हा तब्बल 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र निघाल्या..
लाडकी बहीण योजनेत कोण अपात्र?
KYC अपडेट न केलेल्या 62 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत... तर 10 लाख आयकर भरणाऱ्या लाडकीलाही अपात्र ठरवण्यात आलं...5 लाख सरकारी कर्मचारी असणाऱ्या आणि 2 लाख महिलांकडे चार चाकी वाहनं असल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं....तसचं 2 लाख महिलांचं वय 65 वर्षांहून अधिक असल्यानं आणि 74 हजार महिलांचं वय 21 वर्षापेक्षा कमी असल्यानं त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलंय...त्याशिवाय पुरुष लाभार्थी असणाऱ्या 16 हजार जणांनाही अपात्र ठरवलं.
जूलै २०२४ मध्ये ही योजना सुरू झाली..आणि नंतर 23 महिन्यांनी जर 81 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.याचाच अर्थ या लाडक्या बहिणींनी सरकारी तिजोरीतील पैशावर डल्ला मारलाय... म्हणजेच 81 लाख अपात्र महिला महिन्याला 1500 रुपये घेत होत्या म्हणजे महिन्याला तब्बल 1 हजार 215 कोटी रुपये.... म्हणजे 23 महिन्यात 81 लाख महिलांनी सरकारी तिजोरीतील तब्बल 27 हजार 945 कोटी रुपयांवर डल्ला मारलाय... दुसरीकडे 81 लाख नव्हे तर 1 कोटी 25 लाख महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय...त्यामुळे इतके महिने लाडक्या बहिणींच्या नावाखाली कुणाला पैसे दिले? याची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय....
आता या 27 हजार 945 कोटी रुपयांची लूट करणाऱ्या अपात्र लाडकीक़डून वसुली होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय मात्र महिलांच्या योजनेत घुसखोरी करणाऱ्या 14 हजार भावांकडून मात्र वसूली केली जाणार आहे. सरकारनं आता निकष अधिक पारदर्शक करत खऱ्या आणि गरजू लाडक्या बहिणींपर्यंतच हा लाभ पोहोचवण्याचा निर्धार केलाय... मात्र आतापर्यंत गेल्या 23 महिन्यात अपात्र लाडक्या बहिणींनी डल्ला मारलेल्या कोट्यवधी रूपयांच काय.... 27 हजार कोटी रुपये जर अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर गेले , तर करदात्यांच्या पैशांच्या या लूटीला सरकार सूट तरी का देतय..सरकारचा ढिसाळ कारभारचं या लूटीला कारणीभूत नाही का...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.