Maharashtra Assembly Election  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : २४ तासात राज्यात आचारसंहिता लागणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election Date : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक -

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी राज्यात निर्णायांचा सपाटा सुरु आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक निर्णय आज सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असेल. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर येणा-या २४ तासात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी माहिती वरीष्ठ प्रशासकीय सूत्रांने साम टीव्हीला दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहवर दाखल झाले आहेत.

कोणत्याही क्षणी आचारसंहिता -

राज्यात पुढील २४ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करु शकते. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी २८८ मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी केली जाऊ शकते. त्यामुळे २४ तासांनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर तर झारखंडमध्ये ८१ जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT