Maharashtra IMD news Heatwave in Mumbai, Thane, Pune; Know What is the temperature in which district of the state sbk90 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather News: मुंबई, ठाणे, पुणे तापलं; राज्यभरात उष्णतेची लाट; कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान? जाणून घ्या

Mumbai, Pune, Nagpur, Pimpri Chinchwad Weather (Temprature) News in Marathi: राज्यात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवार हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यामध्येच उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Satish Kengar

Maharashtra Weather Update:

राज्यात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवार हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यामध्येच उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळले आहेत.

अशातच राज्यात मंगळवारही सर्वात उष्ण दिवस ठरताना दिसत आहे. आज राज्यात कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये सर्वाधिक ४२अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. Accuweather या हवामानाबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईटवर तापमानासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. Accuweather तापमानाची नोंद वेळेनुसार सतत बदलत असते. दुपरी 4 वाजता या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यातच राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान, हे जाणून घेऊ...

कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

Accuweather या वेबसाईटवर राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत. यानुसार, मुंबई (Mumbai Temprature) ३६ अंश सेल्सियस, नवी मुंबई ३५, ठाणे ३९, पुणे (Pune Weather) ३५, पिंपरी चिंचवड ३८, अहमदनगर ३७, सोलापूर ४०, अमरावती ३८ आणि नागपूर (nagpur temperature) ३८ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

तसेच मुंबई आणि उपनगरीय भागांबद्दल बोलायचं झालं तर, अंधेरी पूर्व ३८, अंधेरी पश्चिम ३८, भांडुप पूर्व ३७, भांडुप पश्चिम ३७ आणि भिवंडी येथे ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यभरात तीव्र उष्णेतची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवशी अशीच परिस्थिती राहू शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अशातच जर तुम्ही दुपारी 1 ते 3 दरम्यान घराबाहेर पडणार असाल तर, स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा. तसेच तहान लागली नसेल, तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT