Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Flood Alert : पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी भयान अवस्था, पूरस्थितीचा व्हिडिओ

Pandharpur News : उजनी आणि वीर धरणातून तब्बल एक लाख २५ हजार क्युसेक पाणी सोडल्याने पंढरपूरात भीमा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Alisha Khedekar

  • उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे.

  • पंढरपूरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

  • सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे.

  • मे महिन्यापासून सहाव्यांदा भीमा नदी धोकादायक पातळीवर आहे.

भीमा आणि नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपार पासून भीमानदी पात्रात तब्बल एक लाख 25 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.

दोन दिवसांपासून भीमेसह नीरा नदी खोर्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रणीत ठेवण्यासाठी सोमवारी उजनीतून भीमा नदी पात्रात एक लाख 25 क्युसेक इतका विसर्ग सुरू केला आहे.

माळशिरस तालुक्यातील संगम येथून पुढे भीमानदीमध्ये एकूण विसर्ग 1 लाख 34 हजार 437 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. सायंकाळी पाच वाजता पंढरपुरात 1लाख 5 हजार 708 क्युसेक इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित झाली आहे.

पंढरपूर मध्ये भीमा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे नदीकाठच्या सखल भागातील व्यास नारायण व अंबाबाई झोपडपट्टीतील काही पत्र्याच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. उजनी आणि वीर धरणाच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसानंतर दोन्ही धरणातून पाणी भीमा आणि नीरा नदीमध्ये सोडले आहे. भीमा नदीत एक लाख 25 हजार क्युसेक तर वीर धरणातून आठ हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मे महिन्यापासून सहाव्यांदा पंढरपूर मध्ये भीमा नदी धोकादायक पध्दतीने वाहताना दिसते. नदी काठावर असणारे घाट पाण्यात बुडाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT