Maharashtra Heatwave Alert Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Heatwave : अलर्ट! पुढील ४-५ दिवस होरपळ, उष्णतेची लाट येणार; कुठे-कुठे बसणार तडाखा?

Mumbai Pune Rising Temperature 2025: येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात थंडी ओसरत चालली आहे. हळूहळू उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह पुण्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बहुतांश जिल्ह्यांत भडका उडाला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. येत्या ४-५ दिवसांत मुंबई, पुणे, विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आगामी काही दिवसांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार आहे. वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केले आहे. त्यामुळे घराबाहेर निघताना स्वत: ची काळजी घ्या. आरोग्य जपणं गरजेचं आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही!

पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये नोंदवण्यात आलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT