muharram tajiya 
महाराष्ट्र

मोहरमला मिरवणुका नकाे; काेविडच्या पार्श्वभुमीवर नियमावली जारी

Siddharth Latkar

सातव्या शतकात करबलाच्या युद्धात हजरत इमाम हुसेन यांच्या हुतात्माबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लिमांनी मोहरम वर्ज्य आणि प्रार्थनेने साजरा केला जाताे. हे इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या आणि पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा १८ आणि १९ ऑगस्टला राज्यात माेहरम आहे.

सातारा : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य सरकारने माेहरम muharram साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले आहे. मुस्लिम बांधवांनी यंदा १८ आणि १९ ऑगस्टला साजरा केला जाणारा माेहरम हा काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांच्या covid-19 guideliness नियमांचे पालन करुनच साजरा करावा. राज्याच्या गृह विभागाने याबाबत काही सूचना निर्गमीत केल्या आहेत. हे सलग दुसरे वर्ष आहे राज्यातील कोणत्याही समाजासाठी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमातील सार्वजनिक मिरवणुकीस procession परवानगी देण्यात आलेली नाही.

काेराेनाच्या पार्श्वभुमीवर गतवर्षी पासून राज्यात सण, उत्सव, समारंभ यावर निर्बंध आणले गेले आहेत. गर्दीचे कार्यक्रम टाळून नागरिकांनी आपले आराेग्य जपावे या हेतुने राज्य शासन सार्वजनिक रित्या काढल्या जाणा-या मिरवणुकांना बंदी घालत आले आहे. यंदा देखील आषाढी एकादशी निमित्त काढण्यात येणा-या पालख्यांवर निर्बंध घालण्यात आले हाेते. बेदूंर नंतर राज्यात सण, उत्सवांना प्रारंभ हाेता. येत्या १८ आणि १९ ऑगस्टला माेहरम आहे. यंदा देखील माेहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना गृह विभागाने केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने या वर्षी मिरवणुकांना परवानगी दिली जाणार नाही. लोकांनी त्यांच्या घरात दुखवटा करावा असे परिपत्रकात म्हटले आहे. कत्ल की रात याबराेबरच याेम-ए-आशुरा या निमित्त काढण्यात येणा-या मातम मिरवणुका काढू नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुस्लिम बांधवांनी घरामध्येच माेहरमचा muharram tajiya दुखवटा पाळावा, पेठांमध्ये, काॅलनीमध्ये, साेसायट्यांमध्ये एकत्रित येऊन मातम अथवा दुखवटा करु नये, वाझ-मजलीसचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावा, प्रशासनाच्या परवानगी शिवाय सबील-छबील बांधू नये, ताजिया काढू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT