महाराष्ट्रातून कॅन्सरला हद्दपार करण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललंय...कारण, आता सरकारच कॅन्सरवरील लस मोफत देणार आहे...मुलींना ही लस मोफत देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलीय...देशात कॅन्सरने अनेकांचा मृत्यू होतोय...त्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे...त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींसाठी कॅन्सरवरील मोफत लस देण्याची घोषणा केलीय...
कॅन्सर रुग्णांसह मुलींसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे...जशी सरकार लाडक्या बहिणींची काळजी घेतंय...तशीच काळजी महाराष्ट्रातील लेकींची घेतली जातेय...
कॅन्सरवर मोफत लस
14 वयापर्यंतच्या मुलींसाठी लस मोफत
ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच लस दिली जाणार
महिलांसाठी पुढच्या 5 ते 6 महिन्यांत लस उपलब्ध होईल
कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर लस बाजारात आल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळालाय...
कॅन्सरमुळे दरवर्षी लाखोंचे बळी
भारतात दरवर्षी 90 हजारहून अधिक महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू
दरवर्षी 1 लाख 70 हजार महिलांना कॅन्सर होत असल्याचं आढळलं
WHO च्या माहितीनुसार 2022 मध्ये जगभरात 6 लाख 70 हजार महिलांना ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू
लॅन्सेट कमिशनच्या अहवालानुसार, 2020 साली जगभरात 6.85 लाख महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू
2050 पर्यंत जगभरात 11 लाख महिलांचा कॅन्सरने मृत्यू होऊ शकतो
हा दावा गंभीर आहे...त्यामुळे सरकारने मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आरोग्य विभागाकडूनही करण्यात आलंय...
त्यामुळे आता महाराष्ट्रातून कॅन्सर हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही...सरकारच्या या निर्णयामुळे लाखो मुलींना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.