Bhandara News  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News : शासन सेवेतून तीन बडे अधिकारी निलंबित; पोलिस पाटील, कोतवाल पद भरती रद्द

दरम्यान शासनाने पदभरती देखील रद्द केल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरतीत अनियमतीतता आढळल्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल दिला. स्कृत दर्शनी अनियमतीतता आढळल्याने राज्य शासनाने तीन अधिका-यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे. यामध्ये भंडारा उपविभागीय अधिकारी, भंडारा तहसीलदार तसेच पवनी तहसीलदार यांचा समावेश आहे. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरती घेण्यात आली होती. तर भंडारा पवनी तालुक्यात या भरती प्रकरणी घोळ झाला असल्याची तक्रार तक्रारदार प्रेमानंद मेश्राम यांनी केली होती.

ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत जास्त गुण असून सुध्दा त्यांची निवड न करता ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत कमी गुण असून त्यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण करून माैखिक परीक्षेत जास्त गुण दिले होते असे मेश्राम यांचे तक्रार हाेती.

या प्रकरणात प्राथमिक चाैकशी अंती जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल सादर केला. त्यानूसार राज्य शासनाने भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड (Ravindra Rathod), भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे (Arvind Hinge) व पवनीचे तहसीलदार नीलिमा रंगारी (Neelma Rangari) यांना निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश शासनाने काढले आहेत. दरम्यान शासनाने पदभरती देखील रद्द केल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT