Sanjay Rathod and Chitra Wagh Saam TV
महाराष्ट्र

आतापर्यंत मी शांत होतो, कदाचित चित्रा वाघ यांना माहित नसेल, संजय राठोड यांचा सणसणीत इशारा

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर तोफ डागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्या (Chitra Wagh) चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला कडाडून विरोध दर्शवला. परंतु, आता खुद्द संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला पून्हा संधी दिलीय. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांना कागदपत्रे पाठवू. कादाचित चित्रा वाघ यांना माहीत नसेल, माझा सुद्धा परिवार आहे, माझे कार्यकर्ते आहेत. आतापर्यत मी शांत होतो, पण यापुढे मी आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करील, असं म्हणत वाघ यांना राठोड (Sanjay Rathod) यांनी सणसणीत इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राठोड म्हणाले, मी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता.मला पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. मागील १५ महिने मानसिक तणावात मी आणि माझे कुटुंब राहत होतो. गेली ३० वर्ष राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहे. माझे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणाची चौकशी झाली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला पून्हा संधी दिली. लोकशाहीत सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्रा वाघ यांना माहीत नसेल. आम्ही त्यांना कागदपत्रे पाठवू.माझा सुद्धा परिवार आहे माझे कार्यकर्ते आहेत.पण अशा गोष्टीने किती त्रास होतो, आतापर्यत मी शांत होतो पण यामुळे मी कायदेशीर कारवाई करील.

लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण काय बोललं पाहिजे हे समजलं पाहिजे. यापुढे कुणी आरोप केले तर मी कायदेशीर कारवाई करील.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत.दोघांनी कागदपत्रे बघूनच मला मंत्रिपद दिले. आमचे सर्व आमदार सहकारी म्हणून काम करतात. अधिवेशन झाल्यानंतर बाकीच्यांना संधी मिळेल, असंही राठोड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार काल मंगळवारी पार पडला. सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.दरम्यान,महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT