Milk Price, RadhaKrishna Vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Milk Price : शेतकऱ्यांनाे ! शिंदे-फडणवीस सरकारनं दूधाचा किमान दर केला निश्चित; जाणून घ्या आदेश

सरकारी योजना सामान्य लोकांच्या घरापर्यंत घेऊन चाललोय असे विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका केली.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Radhakrishna Vikhe Patil News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारने दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत राज्य शासनाने आदेश काढल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Maharashtra News)

भेसळखाेरांना माेक्का लावणार

दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले हा निर्णय सहकारी सह खाजगी दूध संघांनाही लागू करण्यात आला आहे. प्रत्येक तीन महिन्यांनी दूध दराबाबत आढावा घेतला जाईल. दरम्यान दूध भेसळखोरांना मोक्का लावण्यासह कठोर कारवाई करणार असल्याचेही विखे-पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान पशुखाद्याच्या दरातही पंचवीस टक्के कपात करण्याच्या संबंधित कंपन्यांना सूचना केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले पशुखाद्याच्या गोंण्यावर घटकांचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

'मविआ' त फक्त नेते राहिलेत

मविआमधील दोन पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्या दोन्ही पक्षात फक्त नेते उरलेत. काँग्रेसची अवस्था वेगळी नाही. त्यांचही आऊटगोइंग सुरू होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले मविआ सरकार विश्वासघाताने तयार करण्यात आलं होतं.

त्रिशूल सरकार

राज्याची अधोगती होत होती म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा बाहेर पडले. मविआच्या रूपाने राज्यावर जे संकट आलं होतं ते दूर झालं आहे. त्यामुळे महायुती सरकारचा उल्लेख त्रिशूल म्हणून होत आहे असेही विखे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

SCROLL FOR NEXT